गर्भधारणेनंतर स्तनांमधून दूध बाहेर येणं सामान्य आहे. प्रेग्नंसीत अनेक शारीरिक बदल जाणवतात यावेळी स्तनांमधील ग्रंथी विकसित होऊन त्यातून दूध बाहेर येतं. काहीवेळा प्रेग्नंसीशिवायही महिलांच्या स्तनांमधून दूध बाहेर येतं. अशावेळी महिलांना आपल्या आरोग्याकडे अधिक लक्ष देण्याची गरज असते. डिलिव्हरीच्यावेळी निपल्समधून पांढरा स्त्राव बाहेर येतो. ज्याला निपल्स डिस्चार्ज असं म्हणतात. (Breast discharge without pregnancy)
काही प्रकरणात प्रेग्नंसी नसतानाही निपल्स डिस्चार्ज होतो. एमबीबीएस डॉ. तनाया यांनी इंस्टाग्राम व्हिडिओद्वारे दिलेल्या माहितीनुसार प्रेग्नंसीशिवाय किंवा ब्रेस्ट फिडींग सुरू नसतानाही स्तनांमधून दूध बाहेर येत असेल याच अर्थ असा की प्रोलॅक्टिन हार्मोनचे प्रमाण वाढले आहे. (Nipple discharge without pregnancy may mean something)
तज्ज्ञांच्यामते जास्त प्रोलॅक्टिनमुळे गर्भवती नसलेल्या किंवा स्तनपान करत नसलेल्या महिलांमध्ये आईच्या दुधाचे जास्त उत्पादन होऊ शकते. स्त्रियांमध्ये जास्त प्रमाणात प्रोलॅक्टिनमुळे मासिक पाळीच्या समस्या आणि वंध्यत्वही उद्भवू शकते. आजकालच्या चुकीच्या जीवनशैलीमुळे महिलांमध्ये वंध्यत्वाची समस्या खूप वाढली आहे. गर्भधारणेशिवाय स्तनातून दूध बाहेर पडणे हे देखील वंध्यत्वाच्या समस्येचे लक्षण असू शकते.
ओघळलेल्या स्तनांना परफेक्ट शेप येण्यासाठी घरीच करा २ व्यायाम; सुडौल, आकर्षक दिसाल
डॉक्टरांना दाखवून उपचार केले तर ही समस्याही दूर होऊ शकते. चेहऱ्यावर नको केस, केस गळणे, दीर्घकाळापर्यंत गर्भधारणा करण्यास असमर्थता, अनियमित मासिक पाळी, स्तनाच्या ऊतींची वाढ, मुरुम, डोकेदुखी, केस गळणे अशा समस्या जाणवल्यास त्वरीत तज्ज्ञांचा सल्ला घ्या.