Lokmat Sakhi >Health >Gynaecology Disorder > पीसीओडीमुळे वजन वाढते, चेहऱ्यावर अनावश्यक केस, पिंपल्स येतात? यात कितपत तथ्य? तज्ज्ञ सांगतात...

पीसीओडीमुळे वजन वाढते, चेहऱ्यावर अनावश्यक केस, पिंपल्स येतात? यात कितपत तथ्य? तज्ज्ञ सांगतात...

Problem of PCOD Weight gain Pimples and unwanted hair growth : शरीरात नेमके काय बदल होतात आणि कोणत्या उपाययोजना केल्याने ही समस्या दूर करता येते पाहूयात.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2023 05:55 PM2023-08-22T17:55:45+5:302023-08-22T18:07:46+5:30

Problem of PCOD Weight gain Pimples and unwanted hair growth : शरीरात नेमके काय बदल होतात आणि कोणत्या उपाययोजना केल्याने ही समस्या दूर करता येते पाहूयात.

PCOD causes weight gain, unwanted facial hair, pimples? How much truth in this? Experts say... | पीसीओडीमुळे वजन वाढते, चेहऱ्यावर अनावश्यक केस, पिंपल्स येतात? यात कितपत तथ्य? तज्ज्ञ सांगतात...

पीसीओडीमुळे वजन वाढते, चेहऱ्यावर अनावश्यक केस, पिंपल्स येतात? यात कितपत तथ्य? तज्ज्ञ सांगतात...

पीसीओडी म्हणजेच पॉलिसिस्टीक ओव्हरी सिंड्रोम. या समस्येत शरीरातील हार्मोन्समध्ये बदल झाल्याने विविध समस्या निर्माण होतात. पुरुषांमध्ये असणाऱ्या अँड्रोजन नावाच्या हार्मोन्सचे प्रमाण महिलांच्या शरीरात वाढते आणि त्यामुळे वजन वाढणे, चेहऱ्यावर अनावश्यक केस येणे, पुरळ येणे या समस्या निर्माण होतात. पीसीओडी ही गेल्या काही वर्षात तरुणींना भेडसावणारी अतिशय सामान्य समस्या झाली आहे. प्रसिद्ध स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. गीता वडनप याविषयी काही महत्त्वाच्या गोष्टी आपल्याला सांगतात. यामध्ये शरीरात नेमके काय बदल होतात आणि कोणत्या उपाययोजना केल्याने ही समस्या दूर करता येते पाहूयात (Problem of PCOD Weight gain Pimples and unwanted hair growth). 

नेमकं होतं काय? 

१. नियमित पाळीचे चक्र बिघडणे हे या समस्येचे सर्वात महत्त्वाचे लक्षण असते. वयात आलेल्या महिलेच्या शरीरात साधारण पाळीनंतर १४ दिवसांनी अंडे तयार होते आणि त्यानंतर एकतर गर्भधारणा होते किंवा १४ दिवसांनी म्हणजेच साधारण २८ दिवसांनी ते अंडे फुटते आणि मासिक पाळी येते. अशाप्रकारे दर २८ ते २० दिवसांनी महिलेला पाळी येणे आवश्यक असते. पण पीसीओडीमध्ये हे चक्र बिघडते. 

(Image : Google)
(Image : Google)

२. पीसीओडीमुळे खूप जास्त प्रमाणात वजन वाढते. व्यायाम किंवा आहारावर नियंत्रण ठेवून वजन कमी करावे लागते. किमान २० टक्के वजन कमी केले तरी पीसीओडीची समस्या नियंत्रणात येऊ शकते. 

३. पुरुषी हार्मोन्स तयार झाल्याने चेहऱ्यावर केसांची वाढ होणे, पिंपल्स येणे यांसारख्या समस्या निर्माण होतात. 

४. ज्यांना पीसीओडी असतो त्यांच्यात प्रमाणापेक्षा जास्त अंडी तयार होतात आणि ती ओव्हरीजमध्ये साठून राहतात. त्याला आपण सिस्ट किंवा फ्लुईड साचले असे म्हणतो. काहीवेळा अंडीच तयार होत नाहीत. तर काहीवेळा तयार झालेली अंडी अपरीपक्व असतात. त्यामुळे या समस्येसाठी उपाय करणे आवश्यक असते.

 

५. अन्यथा हार्मोन्स कंट्रोल करणारी औषधे दिली जातात. ज्यामुळे हार्मोन्सचे संतुलन होण्यास मदत होते आणि पाळी नियमित येण्यास सुरुवात होते. पण काही वेळा औषधे चालू असेपर्यंत ही समस्या नियंत्रणात राहते आणि एकदा औषधे बंद केली की समस्या पुन्हा सुरू होते. त्यामुळे ताणतणावाचे नियमन, जीवनशैली संतुलित असणे हेच यावरील उत्तम उपाय आहेत हे लक्षात घ्यायला हवे. 
 

Web Title: PCOD causes weight gain, unwanted facial hair, pimples? How much truth in this? Experts say...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.