Join us   

सेक्स करताना लघवी होण्याची समस्या डिलिव्हरीनंतर जास्त का जाणवते? स्त्री रोग तज्ज्ञ सांगतात..

By manali.bagul | Published: December 29, 2022 7:16 PM

Peeing During Sex : अनेक महिलांना हा त्रास होतो, आत्मविश्वास कमी होतो आणि संबंधातला रस उडतो, यावर उपाय काय?

सेक्स करताना अचानक लघवी होऊन जाणं ही समस्या अनेक महिलांना त्रास देते. लाजीरवाणे वाटते, काहींचा आत्मविश्वास आणि संबंधातला रसही कमी होतो. मात्र  हा महिलांमधला खूपच कॉमन इश्यू आहे. ही मुख्यत: महिलांची समस्या आहे कारण पुरुषांच्या शरीरात एक नैसर्गिक यंत्रणा असते जी त्यांना सेक्सुअल इंटरकोर्सच्यावेळी लघवीला प्रतिबंध करते. मात्र त्याउलट संबंध ठेवत असताना जवळपास ६० टक्के महिलांना असा त्रास जाणवतो. (Peeing During Sex)

काही स्त्रियांना संबंध ठेवण्याआधीच लघवी होईल की काय अशी भिती वाटते. वास्तविक त्यांना खरोखर लघवी होत नाही. पण असा भास होतो. महिलांचा हा त्रास कशामुळे उद्भवतो. यावर काही उपाय करता येऊ शकतात का याबाबत स्त्री रोगतज्ज्ञ आणि प्रसुतीतज्ज्ञ डॉ. गौरी करंदीकर यांनी लोकमत सखीशी बोलताना अधिक माहिती दिली आहे. 

सेक्स करण्याआधी अनेकांना हा त्रास उद्भवत असल्यानं लैंगिक संबंध व्यवस्थित होऊ शकत नाहीत किंवा लघवी येण्याच्या भितीनं संबंध ठेवण्यासाठी संबंधांत टाळाटाळ केली जाते. डिलिव्हरीनंतर संबंध ठेवताना हा त्रास जास्त जाणवू शकतो. 

असं का होतं?

सगळ्यात सामान्य कारण म्हणजे बेसलाईन युरिन इन्फेक्शन, युरिन इन्फेक्शनमुळे हा त्रास होऊ शकतो. जनरली बायका हा त्रास उद्भवल्यानंतर २ दिवस गोळ्या घेतात नंतर बंद करतात. यामुळे इन्फेक्शन पूर्णपणे बरं होत नाही. याशिवाय सर्वाइकल इन्फेक्शनमुळे युरिन बॅग्सना सुज येते. या त्रासामुळे यामुळे युरिन इन्फेक्शन नसतानाही युरिन पास होते. इन्फेक्शन हे सगळ्यात मूळ कारण आहे.

नॉर्मल डिलिव्हरीच्यावेळी पेल्विक पार्ट स्ट्रेच होतो. अन्ड्यू स्ट्रेच म्हणजेच गरजेपेक्षा जास्त स्ट्रेच झाल्यानं असं होऊ शकतं. डिलिव्हरीनंतर सेक्सदरम्यान युरीन पास होत असल्याचा त्रास अगदी कमी म्हणजेच १ टक्के महिलांनाच उद्भवतो. सिजेरियन डिलिव्हरीमध्ये युरिन बॅग बाजूला करून गर्भाशयावर टाके घेतले जातात. याशिवाय ऑपरेशन्स झाले असतील तर (Adhesion) म्हणजेच एकमेकांना अवयव चिकटतात. त्यामुळे असा प्रॉब्लेम येऊ शकतो. यात टिश्यूजच्या लूजनेसमुळे व्यवस्थित कंट्रोल राहत नाही.

मानसिक ताण या त्रासाला कारणीभूत ठरू शकतो. कारण काहीजण सतत तणावाखाली असल्यास सतत लघवीला जातात. ओव्हर एक्टिव्ह ब्लॅडर वयस्कर लोकांमध्ये उद्भवते. डायबिटीस किंवा इतर आजारांमुळे सतत लघवी येते असं वाटतं. 

स्ट्रेस इन्कॉन्टीनस (Stress Incontinence)

जोरात शिंकल्यानंतर, जड वजन उचलल्यानंतर किंवा सेक्सदरम्यान पोटावर वजन पडल्यानंतर लघवी येते

 अर्ज इन्कॉन्टीनस (urge incontinence)

लघवीला आल्यानंतर अजिबात कंट्रोल होत नाही आणि कोणत्याहीवेळी होऊ शकते. त्यामुळे सेक्सदरम्यानही अशी स्थिती येऊ शकते. 

काळजी कशी घ्यायची

१) युरिन इन्फेक्शन, गर्भाशयाच्या मुखाशी जखम नाहीये याची खात्री करा

२) पेल्विक एक्सरसाईज करा.

३) सेक्सआधी लघवीला जाऊन या.

४) सेक्स आधी जास्त पाणी पिऊ नका

५) सध्या या त्रासांवर वर पीआरपी, लेजर उपचारपद्धतीही आहेत. तुम्हाला होणाऱ्या त्रासाची तीव्रता ओळखून तज्ज्ञांचा सल्ला घ्या आणि उपचार सुरू करा.

६) काही स्त्रियांना शस्त्रक्रिया करण्याची गरज असते आणि ती केल्यानी त्यांना चांगला बदल जाणवतो

टॅग्स : स्त्रियांचे आरोग्यहेल्थ टिप्स