सतत घाम आल्यामुळे किवा एलर्जीमुळे शरीराच्या अनेक भागांवर खाज येते. अशा स्थितीत व्यवस्थित एका ठिकाणी बसणंही कठीण होतं. महिलांना ब्रेस्टमध्ये खाज येण्याची समस्या उद्भवते त्याची अनेक कारणं असू शकतात.(Reasons for Itchy Nipples and Breasts) जास्त घट्ट कपडे घालणं, न धुतलेली ब्रा वापरणं, यामुळे इरिटेशन आणि खाज येते. याकडे दुर्लक्ष करण्यापेक्षा याच्या कारणांकडे लक्ष देणं अधिक गरजेचं आहे. स्त्रीरोगतज्ज्ञ डॉक्टर रितू सेठी यांनी ओन्ली माय हेल्थशी बोलताना अधिक माहिती दिली आहे. (Breast Itching Explaines by experts)
त्वचेचा कोरडेपणा वाढू शकतो
अनेकदा त्वचेत कोरडेपणा आल्यामुळे खाज येते. अशात स्तनाच्या खालच्या भागात एक पांढरा थर तयार होतो. ज्यामुळे खाज आणि इरिटेशन वाढतं. यामुळे घाम येणं डिहायड्रेशन होणं केमिकल्सयुक्त उत्पादनांचा वापर यांचा समावेश आहे.
एलर्जी आणि हिट रॅशेज
छातीच्या खाली एलर्जी किंवा हिट रॅशेज येणं यामुळे त्वचेवर लाल दाणे किंवा रेडनेस येतो. छातीच्या भागात घाम जास्त आल्यामुळे त्वचेवर एलर्जी जास्त प्रमाणात होते.
सेक्सनंतर जोडीदार समाधानी आहे की असमाधानी? वैवाहिक नात्यातले असमाधान कसे समजणार
यीस्ट इन्फेक्शन
ब्रेस्टच्या खालच्या भागात नेहमी मॉईश्चर तयार होते. अशा स्थितीत घाम जास्त आल्यामुळे ब्रेस्टमध्ये बॅक्टेरिया वाढतात जे यीस्ट इन्फेक्शन आणि बॅक्टेरियल इन्फेक्शनचं कारण ठरतात. वेळीच स्वच्छतेची काळजी घेतल्यास यीस्ट इन्फेक्शन वाढत नाही.
छातीच्या आकारात बदल
स्तनांच्या वाढत्या आकारामुळेही त्वचेवर खाज येते. टिनएज, हार्मोनल बदल, प्रेग्नंसी या किंवा वजन वाढल्यामुळे छातीत खाज येऊ शकते. हे नैसर्गिक आहे त्यात काळजी करण्यासारखं काही नाही.
बायकांसाठी वेगळा कंडोम असतं का? फिमेल कंडोमविषयी माहिती हव्या ५ गोष्टी, तरच वापरणं सोपं
स्तनांच्या खाजेवर आराम कसा मिळवाल?
१) घाम जास्त जमा होऊ देऊ नका.
२) घाम आल्यानंतर क्लिजिंग वाईप्सच्या मदतीने स्वच्छ करा.
३) कॉटन क्लोथ्स किवा कंफर्टेबल कपड्यांचा वापर करा. जेणेकरून स्किन एलर्जी होणार नाही.
४) छातीच्या भागात जास्त खाज येऊ नये यासाठी डॉक्टरांच्या सल्ल्याने एंटी फंगल क्रिमचा वापर करा.