Join us   

शमिता शेट्टीला झालेला एंडोमेट्रिओसिस हा आजार काय असतो? महिलांना कशाने होतो, पाहा लक्षणं आणि उपाय

By ऑनलाइन लोकमत | Published: May 15, 2024 12:58 PM

Know Endometriosis Symptoms And Prevention : आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून व्हिडीओ शेअर करत शमिताने  इंडोमेट्रिओसिसबाबत सांगितले आहे.  

बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीची (Shilpa Shetty) लहान बहिण  शमिता शेट्टी सध्या एंडोमेट्रियोसिस (Endometriosis ) या आजाराशी लढत आहे. ही एक गंभीर समस्या आहे अलिकडेच समिताला सर्जरी करावी लागली.  याबाबत   शमिताने स्वत: सोशल मीडियावर माहिती दिली आहे. आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून व्हिडीओ शेअर करत समिताने  इंडोमेट्रिओसिसबाबत सांगितले आहे.  याची लक्षणं आणि बचावाचे उपाय समजून घ्यायला हवेत. भारतात  सर्वाधिक महिलांना हा आजार उद्भवतो. (Shamita Shetty Undergoes Surgery for Endometriosis Know Endometriosis Symptoms  And Prevention)

एंडोमेट्रिओसिस हा गंभीर आजार, लाखो महिला या आजाराच्या जाळ्यात

जागतिक आरोग्य संघटनेच्या रिपोर्टनुसार (WHO) एंडोमेट्रियोसिस हा एक गंभीर आजार असून भारतील २.५ कोटी महिलांना झाला आहे. हा असा आजार आहे ज्यामुळे पिरिएड्स वेळेवर न येणं, वेदनादायक संभोग, मल त्याग करण्यास  त्रास होणं, लघवीला वेदना, क्रोनिक पेल्विक वेदना, पोटात सूज, उलट्या होणं, थकवा, चिंता या समस्या उद्भवतात.

एंडोमेट्रिओसिस हा आजार काय आहे?

एंडोमेट्रिओसिसला सोप्या शब्दात सांगायचे झाले तर गर्भाशयाच्या लायनिंगला एंडोमेट्रियम असं म्हणतात. जेव्हा ओव्हरी,बाऊल किंवा पेल्विसच्या लायनिंगवर टिश्यू विकसित  होऊ लागतात तेव्हा एंडोमेट्रोयोसिसची समस्या उद्भवते. यामुळे महिलांना गर्भधारणेत समस्या येऊ शकतात.

या आजाराची लक्षणं

मासिक पाळीदरम्यान वेदना होणं, पोटाच्या खालच्या भागात दुखणं, जास्त रक्तस्त्राव होणं,संभोग करताना वेदना होणं, मल किंवा लघवी करताना मल पास करताना वेदना होणं, चक्कर येणं, उलट्या होणं. एंडोमेट्रियमचा धोका अशा महिलांना जास्त असतो ज्यांच्या कुटुंबात याची हिस्ट्री असते. कमी वयातच पिरिएड्स येणं या समस्येचं मोठं कारण आहे. या आजाराची लक्षणं ओळखून तुम्ही या आजारावर नियंत्रण मिळवू शकता.

इंदिरा आव्हीएम आणि फर्टिलिटी सेंटरच्या  रिपोर्टनुसार एंडोमेट्रोयोसिस वंध्यत्वाचं (Infertility) मुख्य कारण आहे. एनसीबीआयच्या रिपोर्टनुसार जवळपा २५ ते ५० टक्के महिला ज्यांना  गर्भधारणेच्या समस्या उद्भवतात त्यांना हा  आजार उद्भवतो. एंडोमेट्रियोसिस रक्तात जमा होते आणि गर्भाशय आणि अंडाशयांच्या आजूबाजूला तसंच इतर अवयवांना चिकटते.

टॅग्स : हेल्थ टिप्सआरोग्यलाइफस्टाइल