पुरूषांमध्ये इन्फर्टिलिटी उद्भवण्याची अनेक कारणं असू शकतात. लठ्ठपणा हे इन्फर्टिलिटीचं (वंध्यत्व) सगळ्यात मोठं कारण आहे. लठ्ठपणामुळे टेस्टोस्टेरॉनवर परिणाम होतो त्यामुळेच स्पर्म काऊंट कमी होतो. लठ्ठपणा स्पर्म काऊंट कमी करण्यासोबतच त्यांची गतिशीलताही कमी करतो.
बदलती जीवनशैली, हाय कॅलरी फूड, लो फायबर जंक फूड आणि फिजिकल एक्टिव्हिटीज, लठ्ठपणा वेगानं वाढवतात. १० हजार पुरूषांवर करण्यात आलेल्या २०१२ च्या एका अभ्यासात वजन कमी असलेल्यांच्या तुलनेत लठ्ठ लोकांमध्ये स्पर्म काऊंट कमी प्रमाणात असल्याचं दिसून आलं होतं.
संशोधकांनी लठ्ठपणा आणि फर्टिलिटी कमी होण्याचा संबंध लावला. संशोधकांच्या म्हणण्यानुसार फॅटी टिश्यूज पुरूषांमधील सेक्स हार्मोन टेस्टोस्टेरोन कमी करतात. महिलांमध्ये फॅटी टिश्यूज जितके जास्त वाढतील तितकंच एक्सट्रोजनचं प्रमाण वाढतं.
२०१३ च्या अभ्यासानुसार ३७ इंचाच्या तुलनेत ४० इंच किंवा त्यापेक्षा जास्त इंचाची कंबर असलेल्या पुरूषांमध्ये टोटल स्पर्म काऊंट कमी होता. अभ्यासात असं दिसून आलं की, एजोस्पर्मियाची स्थिती हेल्दी वजन असलेल्यांच्या (२.६%) तुलनेत लठ्ठपणाचा सामना करत असलेल्या लोकांमध्ये (६.९%) जास्त होती. एजोस्पर्मियात सीमेनमध्ये एक्टिव्ह स्पर्मचा अभाव असतो.
लठ्ठपणामुळे पुरूषांमध्ये इरेक्टाईल डिसफंक्शनची समस्या उद्भवते. असं होतं कारण लठ्ठपणामुळे ब्लड प्रेशरही वाढते. त्यामुळे पुरूषांच्या प्रायव्हेट पार्ट्समधील रक्ताभिसारणावर परिणाम होतो. परिणामी पुरूषांमध्ये इरेक्शन होत नाही. इरेक्टाईल डिस्फंक्शचा सामना करावा लागतो. फर्टिलिटी वाढवण्यासाठी पुरूषांनी काही खास उपाय करायला हवेत.
हेल्दी खा
पुरूषांनी आपल्या लाईफस्टाईलकडे लक्ष देणं गरजेचं आहे. आहारात फळं, भाज्या, प्रोटीन्स, डेअरी प्रॉडक्ट्स, भाज्या यांचा समावेश करा.
कॅफेनचे सेवन कमी प्रमाणात करा
कॅफिनचे जास्त प्रमाणात सेवन करणं स्पर्म काऊंट कमी करते. याशिवाय त्याची क्वालिटीसुद्धा खराब होते. पुरूषांनी जास्त प्रमाणात कॅफेनचे सेवन करू नये. एका दिवसात ३०० मिलीग्राम पेक्षा जास्त कॅफेनचे सेवन करू नका.
व्यायाम करा
जास्त ताण घेतल्यानं स्पर्म प्रोडक्शनवर परिणाम होतो. शारीरिक आणि मानसिक रूपात फिट राहण्यासाठी व्यायाम करायला हवा. योगा, बाहेर चालायला जाणं, सायकल चालवणं, स्विमिंग या व्यायाम प्रकारांनी स्पर्म क्वालिटी चांगली होते.
स्मोकिंग करू नका
सिगारेट ओढल्यानंही स्पर्म काऊंट कमी होतो आणि त्याची गतिशिलता कमी होते. आरोग्य तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार जर तुम्ही फॅमिली प्लॅनिंग करण्याचा विचार करत असाल तर सगळ्यात आधी मादक पदार्थांचे सेवन करणं बंद करा.
फॉलेट्सचे प्रमाण वाढवा
शरीरात फॉलिक एसिड्च्या कमतरतेमुळे स्पर्म असामान्य होतात. त्यामुळे मिसकॅरेज किंवा जन्माच्यावेळी बाळाला त्रासाचा सामना करावा लागू शकतो. फॉलेट्ससाठी आहारात बीन्स, हिरव्या पालेभाज्या, कडधान्य आणि आंबट फळांचा समावेश करा. दिवसातून कमीत कमी ४०० मिलीग्राम फॉलिक एसिड्चे सेवन करा.