Lokmat Sakhi >Health >Gynaecology Disorder > सॅनिटरी नॅपकिन्सच्या वापरामुळे खरंच कॅन्सर होतो का? डॉक्टर सांगतात, काय खरं आणि काय गैरसमज..

सॅनिटरी नॅपकिन्सच्या वापरामुळे खरंच कॅन्सर होतो का? डॉक्टर सांगतात, काय खरं आणि काय गैरसमज..

Can Sanitary Napkins Cause Cancer : दीर्घकाळ एकाच सॅनिटरी नॅपकीनचा वापर केल्यानं संक्रमणाचा धोका वाढतो. 

By ऑनलाइन लोकमत | Published: February 14, 2023 04:32 PM2023-02-14T16:32:45+5:302023-02-14T16:53:27+5:30

Can Sanitary Napkins Cause Cancer : दीर्घकाळ एकाच सॅनिटरी नॅपकीनचा वापर केल्यानं संक्रमणाचा धोका वाढतो. 

Use of sanitary napkins causes fatal cancer : High amounts of harmful chemicals found in sanitary napkins | सॅनिटरी नॅपकिन्सच्या वापरामुळे खरंच कॅन्सर होतो का? डॉक्टर सांगतात, काय खरं आणि काय गैरसमज..

सॅनिटरी नॅपकिन्सच्या वापरामुळे खरंच कॅन्सर होतो का? डॉक्टर सांगतात, काय खरं आणि काय गैरसमज..

चुकीच्या सॅनिटरी पॅड्सच्या वापरानं कॅन्सर होऊ शकतो याबाबत अनेक समज गैरसमज प्रचलित आहेत. सॅनटरी पॅड्सबाबत  झालेल्या एका संशोधनात भारतभरातील जवळपास १० ब्रॅण्डच्या सॅनिटरी नॅपकिन्सचे परिक्षण करण्यात आले. या रिसर्चमध्ये दिसून आलं की, पॅड्सची लवचिकता, सुगंध दरवळत राहण्यासाठी त्यात केमिकल्सचा वापर करण्यात आला होता. यामुळे कॅन्सरचा धोका वाढण्याची शक्यता होती. पिरिएड्स दरम्यान महिला या पॅड्सचा वापर करतात. केमिकल्सच्या संपर्कात आल्यानं कॅन्सरचा धोका वाढतो. (Can Sanitary Napkins Cause Cancer)

डॉक्टर तनाया सांगतात, ''सॅनिटरी नॅपकिन्स पूर्णपणे मानवी आरोग्यासाठी धोकादायक नाही. याव्यतिरिक्त, त्या अभ्यासात अनेक गणिती चुका आहेत (ज्या संशोधकांनी स्वीकारल्या आहेत, परंतु स्पष्ट केल्या नाहीत). आणि हे संशोधन कोणत्याही मुख्य वैज्ञानिक जर्नलमध्ये प्रकाशित केलेले नाही. रिसर्चनुसार भारतात जवळपास  ६४ टक्के महिला सॅनिटरी नॅपकिन्स वापरतात.  बऱ्याच महिलांना परिएड्समध्ये ठेवल्या जाणाऱ्या स्वच्छतेबाबत कल्पना नाही. (Can Sanitary Pads give You Cancer)

मासिक पाळीदरम्यान स्वच्छता न पाळल्यामुळे महिलांमध्ये अनेक आजार होऊ शकतात, त्यात कॅन्सरचाही समावेश आहे असे संशोधनात म्हटले आहे. मासिक पाळीच्या काळात महिलांच्या प्रायव्हेट पार्टची पीएच पातळी बदलते. यामुळे बॅक्टेरियाचा संसर्ग होण्याची शक्यता वाढते. मासिक पाळीदरम्यान काही नियमांचे पालन केल्यास महिला अनेक आरोग्य समस्यांपासून स्वत:ला दूर ठेवू शकतात.

पिरिएड्सदरम्यान या गोष्टींची काळजी घ्या

१) मासिक पाळीच्या  दिवसात वैयक्तीक स्वच्छतेची काळजी घ्या.

२) सॅनिटर पॅडचा वापर करत असाल तर ३ ते ४ तासांनी बदलत राहा.

३) दीर्घकाळ एकाच सॅनिटरी नॅपकीनचा वापर केल्यानं संक्रमणाचा धोका वाढतो. 

४) सॅनिटरी पॅड्सबदण्याबरोबर अंडरवेअरसुद्धा बदला.

बीपी अचानक वाढते? हाय ब्लडप्रेशरचा त्रास आहे? -१ आयुर्वेदिक उपाय- जीवनशैलीतला बदलही आवश्यक

५) कॉटनचे आणि लूज अंडरविअरर्स वापरता

६) प्रायव्हेट पार्ट्स आणि आसपासची जागा नेहमी स्वच्छ ठेवा.

७) साफसफाईसाठी कोणत्याही उत्पादनांचा वापर न करता कोमट पाण्याचा वापर करा. 

Web Title: Use of sanitary napkins causes fatal cancer : High amounts of harmful chemicals found in sanitary napkins

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.