Lokmat Sakhi >Health >Gynaecology Disorder > यूट्रस फायब्रॉईड - गर्भाशयात गाठी आहेत? त्रास अंगावर काढताय?तज्ज्ञ सांगतात..

यूट्रस फायब्रॉईड - गर्भाशयात गाठी आहेत? त्रास अंगावर काढताय?तज्ज्ञ सांगतात..

गर्भाशयातील गाठींकडे वेळीच लक्ष दिले नाही तर उद्भवतात गंभीर परिणाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 29, 2022 01:01 PM2022-06-29T13:01:45+5:302022-06-29T13:27:05+5:30

गर्भाशयातील गाठींकडे वेळीच लक्ष दिले नाही तर उद्भवतात गंभीर परिणाम

Uterine Fibroids - Have Nodules in the Uterus? Do you suffer from it? Experts say .. | यूट्रस फायब्रॉईड - गर्भाशयात गाठी आहेत? त्रास अंगावर काढताय?तज्ज्ञ सांगतात..

यूट्रस फायब्रॉईड - गर्भाशयात गाठी आहेत? त्रास अंगावर काढताय?तज्ज्ञ सांगतात..

Highlightsआयुर्वेदात औषधोपचार, आहार आणि जीवनशैलीमधील बदल यांच्या माध्यमातून या समस्येवर उपचार करता येऊ शकतात.हा त्रास अंगावर काढणे आरोग्यासाठी अजिबात चांगले नाही, त्यामुळे वेळीच योग्य ते उपाचार करायला हवेत..

फायब्रॉईडस म्हणजे स्रीच्या गर्भाशयाच्या भिंतीत वाढणारे हे ट्यूमर्स असतात. हे ट्यूमर्स कॅन्सरचे नसतात, मात्र त्यांच्यामुळे जास्तीचा रक्तस्राव, वेदना आणि इतर त्रासदायक लक्षणं दिसू शकतात. हे फायब्रॉइड्स सामान्यतः स्त्रीच्या मुलं होण्याच्या (प्रजननक्षम) वयात तयार होतात कारण हे फायब्रॉइड्स बीजांडकोषातून स्रवणाऱ्या इस्ट्रोजेन आणि प्रोजेस्टेरॉन या हार्मोन्सवर पोसले जातात. मात्र काही स्रियांना रजोनिवृत्तीनंतरही त्याचा त्रास होऊ शकतो. रजोनिवृत्तीनंतर गर्भाशयाचे काम कमी झाल्यामुळे हार्मोन्सचा स्राव कमी होत असल्याने लहान आकाराचे फायब्रॉइड्स आक्रसू शकतात. फायब्रॉइड्सचा प्रजननक्षम वयातल्या आणि रजोनिवृत्तीनंतरच्या वयातल्या स्रियांना वेगवेगळ्या प्रकारचा त्रास होऊ शकतो. सामान्यतः प्रजननक्षम वयातील स्रियांमध्ये जास्त तीव्र लक्षणं आढळतात. 

(Image : Google)
(Image : Google)

प्रसिद्ध आयुर्वेदतज्ज्ञ डॉ. रेखा राधामोनी यांनी नुकतीच आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर या फायब्रॉइडच्या त्रासासंबंधीची एक पोस्ट केली आहे. आपण कोणताही त्रास झाला की सामान्यपणे अॅलोपॅथीच्या डॉक्टरांकडे जातो. हे फायब्रॉईडस जास्त प्रमाणात वाढलेले असतील तर डॉक्टर आपल्याला शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला देतात. फायब्रॉईडस असल्याची काही लक्षणे असली तरी काही वेळा कोणतीच लक्षणे दिसत नाहीत. मात्र सोनोग्राफी केल्यानंतर आपल्याला असा त्रास आहे हे समजते. आयुर्वेदात याला दोष धातूचे असंतुलन झाले असे आम्ही म्हणतो असे डॉ. राधामोनी सांगतात. इन्स्टाग्रामवर त्या नेहमी काही ना काही महत्त्वाच्या विषयांवर माहिती देत जागरुकता निर्माण करण्याचे काम करत असतात. 

डॉ. रेखा सांगतात आयुर्वेदात औषधोपचार, आहार आणि जीवनशैलीमधील बदल यांच्या माध्यमातून या समस्येवर उपचार करता येऊ शकतात. शस्त्रक्रिया न करता गाठींचा आकार लहान करणे शक्य असते. मात्र रुग्णांनी या गाठी लहान असतानाच आमच्याकडे येणे आवश्यक असते. अनेकदा रुग्ण शस्त्रक्रिया करायची नाही म्हणून शेवटचा सल्ला घेण्यासाठी आयुर्वेदीक डॉक्टरांकडे येतात. मात्र तेव्हा गाठींचा आकार वाढलेला असल्याने कितीही निष्णात आयुर्वेदतज्ज्ञ असला तरी तो काहीही करु शकत नाही. त्यामुळे रुग्णांनी अशाप्रकारचा त्रास आहे हे कळल्यावर सुरुवातीच्या टप्प्यातच आयुर्वेदीक तज्ज्ञांचा सल्ला घेतल्यास उपचार करणे सोपे जाते. आयुर्वेदाला पहिले प्राधान्य द्या असेही त्या सांगतात. 

Web Title: Uterine Fibroids - Have Nodules in the Uterus? Do you suffer from it? Experts say ..

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.