Lokmat Sakhi >Health >Gynaecology Disorder > UTI Preventions : युरिन इंफेक्शनमुळे लघवीच्यावेळी तीव्रतेनं त्रास होतो? ऋजुता दिवेकरनं सांगितले UTI पासून बचावाचे उपाय

UTI Preventions : युरिन इंफेक्शनमुळे लघवीच्यावेळी तीव्रतेनं त्रास होतो? ऋजुता दिवेकरनं सांगितले UTI पासून बचावाचे उपाय

UTI Preventions : प्रसिद्ध पोषणतज्ञ  ऋजुता दिवेकर यांनी यूटीआयची कारणं आणि त्यावर मात करण्यासाठी काही घरगुती उपाय सांगितले आहेत. 

By ऑनलाइन लोकमत | Published: August 17, 2021 08:15 PM2021-08-17T20:15:17+5:302021-08-17T20:27:40+5:30

UTI Preventions : प्रसिद्ध पोषणतज्ञ  ऋजुता दिवेकर यांनी यूटीआयची कारणं आणि त्यावर मात करण्यासाठी काही घरगुती उपाय सांगितले आहेत. 

UTI Preventions : Troubled with uti nutritionist rujuta diwekar shares a complete guide to deal with uti at home | UTI Preventions : युरिन इंफेक्शनमुळे लघवीच्यावेळी तीव्रतेनं त्रास होतो? ऋजुता दिवेकरनं सांगितले UTI पासून बचावाचे उपाय

UTI Preventions : युरिन इंफेक्शनमुळे लघवीच्यावेळी तीव्रतेनं त्रास होतो? ऋजुता दिवेकरनं सांगितले UTI पासून बचावाचे उपाय

मूत्रमार्गात संसर्ग ही स्त्रियांमध्ये उद्भवणारी  एक सामान्य समस्या आहे. याचा परिणाम दरवर्षी लाखो महिलांवर होतो. UTI एक संसर्ग आहे, जो मूत्रपिंडाच्या कोणत्याही भागामध्ये होतो जसे कि मूत्रपिंड, मूत्राशय, मूत्रमार्ग. बॅक्टेरिया हे यूटीआय चे सर्वात सामान्य कारण आहे, परंतु काहीवेळा फंगस आणि व्हायरस देखील याला कारणीभूत ठरू शकतात. Escherichia coli आणि Staphylococcus saprophyticus सारखे बॅक्टेरिया सुमारे 80 टक्के आजारांसाठी जबाबदार असतात.

जर तुम्हाला लघवी करताना वेदना होत असेल किंवा खाज, जळजळ होत असेल तर याचा अर्थ तुमच्या मूत्र मार्गाध्ये काहीतरी त्रास आहे.  त्यावर एंटीबायोटिक्सच्या मदतीने उपचार केले जातात, परंतु काही उपाय आपल्याला या स्थितीपासून बचाव करण्यासाठी  मदत करू शकतात. प्रसिद्ध पोषणतज्ञ ऋजुता दिवेकर यांनी यूटीआयची कारणं आणि त्यावर मात करण्यासाठी काही घरगुती उपाय सांगितले आहेत. 

ऋजुता दिवेकर यांनी दिलेल्या माहितीनुसार हार्मोनल असंतुलन यूटीआयचा धोका वाढवते. परंतु जीवनशैलीमध्ये काही छोटे बदल करून ते दुरुस्त केले जाऊ शकते. स्वच्छतेच्या दृष्टीने, लघवी करण्यापूर्वी किंवा शौच करण्यापूर्वी आणि नंतर हात धुणे महत्वाचे आहे. यूटीआय टाळण्यासाठी स्वच्छ अंडरगारमेंट्स वापरणे देखील महत्वाचे ठरते.

जीवनशैलीत हे बदल करा

1) जास्त दबाव  देऊ नका

यूटीआयची समस्या असताना लघवीला जाण्यात खूप अडचण येते. अनेक स्त्रियांना लघवी पास करण्यासाठी जास्त दबाव द्यावा लागतो. पण पोषणतज्ज्ञांच्या मते, लघवी करताना दबाव देऊ नका. ती सामान्यपणे बाहेर येऊ द्या.

2) लघवी थांबवून ठेवू नका

जेव्हा तुम्हाला लघवीला जावंस वाटेल तेव्हा थांबवू नका. यामुळे मूत्रमार्गाच्या आसपास खूप जास्त ओलावा येतो आणि या ओलावामुळे बॅक्टेरिया वाढतात, ज्यामुळे संक्रमणाची शक्यता देखील वाढते.

3) भरपूर पाणी प्या

ज्या महिलांना अनेकदा UTI ची समस्या असते, त्यांनी जास्तीत जास्त पाणी प्यावे. तज्ज्ञांच्या मते, पाण्याची कमतरता मूत्रमार्गात जळजळ आणि खाज सुटण्याचे कारण आहे. ही स्थिती अतिशय वेदनादायक आहे, त्यामुळे या समस्येने ग्रस्त महिलांनी दिवसभरात 8-10 ग्लास पाणी पिण्याची सवय लावली पाहिजे.

4) नीरा/ ताडाचा रस घ्या

नीरा किंवा ताडाचा रस घेणे देखील एक चांगला पर्याय आहे. यामुळे वेदना आणि जळजळ पूर्णपणे थांबेल आणि लघवी देखील योग्यरित्या बाहेर जाऊ शकेल.

5) नारळपाणी किंवा लिंबू पाण्याचे सेवन करा

जर तुम्हाला लघवीच्या संसर्गापासून त्वरीत सुटका मिळवायची असेल तर ऋतूनुसार पेय पिण्याचा प्रयत्न करा. उन्हाळ्यात तुम्ही नारळाचे पाणी, लिंबूपाणी आणि उसाचा रस पिऊ शकता. हे सर्व पेय मूत्रमार्गातून खराब पदार्थ बाहेर काढण्यात मदत करतात.

6) कोकम आणि आवळ्याच्या रसाचे सेवन करा

 रुजुता दिवेकर यांच्या मते, युटीआयने ग्रस्त लोकांनी कोकम, आवळा, बेल, रोडोडेंड्रॉनचा रस सेवन करावा. ही पेये अत्यावश्यक जीवनसत्वे, खनिजे, इलेक्ट्रोलाइट्स आणि अँटीऑक्सिडंट्स प्रदान करतात. परंतु हे लक्षात ठेवा की यूटीआयच्या स्थितीत ही पेये संध्याकाळ होण्यापूर्वी घ्यावीत.

१) पोषणतज्ज्ञांच्या मते, जर कोणाला मूत्रमार्गात संक्रमणाची तक्रार असेल तर प्रोसेस्ड फूड आणि जंक फूड खाणे देखील टाळावे.

२) जर तुम्ही व्यायाम करत असाल तर नेहमी गियर घाला जे मूत्रमार्ग क्षेत्राभोवती जास्त ओलावा निर्माण करत नाही.

३) व्यायामानंतर ताबडतोब आंघोळीला जावे आणि स्वतःला पूर्णपणे स्वच्छ करावे. यूटीआयपासून आराम मिळवण्यासाठी जीवनशैलीच्या सवयी बदलण्याच्या या टिप्समुळे काही प्रमाणात तुमची समस्या दूर होईल.  यूटीआय असलेल्या महिलांनाही चांगली झोप आवश्यक असते. म्हणूनच 6-7 तासांची झोप घेणे गरजेचं आहे.

Web Title: UTI Preventions : Troubled with uti nutritionist rujuta diwekar shares a complete guide to deal with uti at home

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.