Join us   

UTI Solutions : थंडीत सतत लघवीला लागते, आग होते? तज्ज्ञ सांगतात, ५ उपाय

By ऑनलाइन लोकमत | Published: January 19, 2023 12:31 PM

UTI Solutions : थंडीत वारंवार लघवी होत असली तरी ती थांबवणे टाळावे. मूत्राशयाच्या संसर्गाचा धोका कमी करण्यासाठी, वॉशरूममध्ये जावेसे वाटताच लघवी करा.

 थंडीच्या  दिवसात रोगप्रतिकारकशक्ती कमकुवत  होत असल्यानं संक्रमणाचा धोका वाढतो. याचं सगळ्यात मोठं कारण म्हणजे इम्यून सिस्टिम कमकुवत होणं. तापमान कमी  होणं आणि थंड हवा वातावरणात असल्याने श्वास घ्यायला त्रास होणं, त्वचेच्या समस्या वाढतात.   युरिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शन म्हणजेच युटीआयची समस्या खूपच कॉमन आहे. 

लघवी येते आणि कधी कधी पाणी जास्त न प्यायल्यासही लघवी येते. लोक याला थंडीचा प्रभाव मानतात पण ही  समस्या UTI ची देखील असू शकते. हिवाळ्यात लघवीमुळे यूटीआयचा धोकाही वाढतो. ही अशी स्थिती आहे ज्यामध्ये किडनी शरीरातील पाणी जास्त फिल्टर करते. यामुळे तुम्हाला जास्त वेळा लघवी होऊ लागते. (Gynecologists dr rana told symptoms causes treatment and prevention tips of uti during winter)

UTI च्या लक्षणांमध्ये लघवी येणं, मूत्राशय अपूर्ण रिकामे होणे, दुर्गंधीयुक्त लघवी, जळजळ, लघवीचा रंग बदलणे आणि ताप यांचा समावेश होतो. डॉ. राणा चौधरी (सल्लागार प्रसूती आणि स्त्रीरोग तज्ज्ञ, अपोलो स्पेक्ट्रा हॉस्पिटल) मुंबई  यांनी एनबीटीशी बोलताना हिवाळ्यात लघवीची ही गंभीर समस्या कशी टाळायची ते सांगितले आहे.

1) UTI टाळण्यासाठी, आपण स्वच्छतेची विशेष काळजी घेतली पाहिजे. टॉयलेटमध्ये गेल्यानंतर तुमचे प्रायव्हेट पार्ट्स पूर्णपणे स्वच्छ करा.

2) व्हिटॅमिन सी समृध्द अन्न खाल्ल्याने रोगप्रतिकारक शक्ती वाढू शकते आणि तुमच्या लघवीतील आम्लता पातळी वाढू शकते, ज्यामुळे संसर्ग निर्माण करणारे बॅक्टेरिया नष्ट होऊ शकतात. संत्री, किवी आणि द्राक्षे यांचे सेवन करा.

3) थंडीत जास्त  पाणी प्यायले जात नाही पण त्यामुळे तुमचा UTI चा धोका वाढू शकतो. हायड्रेटेड राहिल्याने तुमच्या मूत्र प्रणालीला विषारी कचरा अधिक प्रभावीपणे बाहेर काढण्यास आणि मूत्रमार्गातील संक्रमण दूर ठेवण्यास मदत होऊ शकते.

4) थंडीत वारंवार लघवी होत असली तरी ती थांबवणे टाळावे. मूत्राशयाच्या संसर्गाचा धोका कमी करण्यासाठी, वॉशरूममध्ये जावेसे वाटताच लघवी करा.

5) UTI साठी क्रेनबेरी हे उत्तम उपायांपैकी एक आहे. या फळामध्ये प्रोअँथोसायनिडिन भरपूर प्रमाणात असते. हे एक रासायनिक संयुग आहे जे E. coli जीवाणूंना मूत्राशयात जाण्यापासून प्रतिबंधित करते, ज्यामुळे संसर्गाचा धोका असतो.

 

टॅग्स : हेल्थ टिप्सआरोग्यस्त्रियांचे आरोग्य