Lokmat Sakhi >Health >Gynaecology Disorder > योनीभागाचा कर्करोग या आजाराची लक्षणं वेळीच ओळखा, जीवाचा धोका टळेल..

योनीभागाचा कर्करोग या आजाराची लक्षणं वेळीच ओळखा, जीवाचा धोका टळेल..

योनीभागाच्या कॅन्सरचे अनेक धोके आहेत. त्यामुळंच शरीरातील कोणताही बदल बारकाईनं न्याहाळणं अतिशय आवश्यक आहे. कुठलाही वेगळा भाग अथवा बदल शरीरात/योनीभागात जाणवत असेल तर लक्षणं बळावण्या अगोदर डॉक्टरांना गाठणं हिताचं आहे.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2021 02:05 PM2021-05-12T14:05:35+5:302021-05-12T14:35:33+5:30

योनीभागाच्या कॅन्सरचे अनेक धोके आहेत. त्यामुळंच शरीरातील कोणताही बदल बारकाईनं न्याहाळणं अतिशय आवश्यक आहे. कुठलाही वेगळा भाग अथवा बदल शरीरात/योनीभागात जाणवत असेल तर लक्षणं बळावण्या अगोदर डॉक्टरांना गाठणं हिताचं आहे.

Vaginal cancer is a rare disease. Need to identify symptoms on early stage For avoid further complication narikaa | योनीभागाचा कर्करोग या आजाराची लक्षणं वेळीच ओळखा, जीवाचा धोका टळेल..

योनीभागाचा कर्करोग या आजाराची लक्षणं वेळीच ओळखा, जीवाचा धोका टळेल..

Highlightsजेव्हा योनीभागात कॅन्सर होतो तेव्हा त्याला व्हजायनल कॅन्सर म्हटलं जातं. वल्वर कॅन्सर म्हणजे स्त्रीच्या जननेंद्रियाचा बाह्यभागात होणारा कॅन्सर.शरीरातील कोणताही बदल बारकाईनं न्याहाळणं अतिशय आवश्यक आहे. गर्भाशयाच्या मुखाचा (सर्व्हायकल) कॅन्सर होऊन गेला असेल तर व्हजायनल कॅन्सर होण्याचं प्रमाण आढळतं.

निरोगी पेशींची अनियंत्रित वाढ होण्यातून किंवा पेशींमध्ये होणार्‍या असाधारण बदलांमधून कॅन्सर होतो. जेव्हा योनीभागात कॅन्सर होतो तेव्हा त्याला व्हजायनल कॅन्सर म्हटलं जातं. वल्वर कॅन्सर म्हणजे स्त्रीच्या जननेंद्रियाचा बाह्यभागात होणारा कॅन्सर. मूत्रमार्गाजवळ बाह्यअंग असणारा भाग म्हणजे वल्वा. तिथली त्वचा मूत्रमार्ग, योनीभाग, लेबिया व क्लिटोरिस (योनीचा ओठांसारखा पाकळ्यांचा भाग आणि शिश्‍निका) अशा सगळ्यांना व्यापून असते. या भागात पेशींची अनियंत्रित वाढ होते. ती छोट्या छोट्या फोडांसारखी दिसते, तोच कॅन्सर. तिथं आग होते, दुखतं. हा दुर्मिळ प्रकारचा कॅन्सर आहे, पण योग्य वेळी लक्षणं ओळखता आली की पहिल्या काही टप्प्यांतच त्यावर नियंत्रण आणता येणं शक्य असतं.

एचपीव्ही प्रकारातला संसर्ग म्हणजे ह्यूमन पॅपिलोमा व्हायरस. त्यातूनही कॅन्सरकडे मार्गक्रमण होण्याची शक्यता असते. गर्भाशयाच्या मुखाचा (सर्व्हायकल) कॅन्सर होऊन गेला असेल तर व्हजायनल कॅन्सर होण्याचं प्रमाण आढळतं.

योनीभागाच्या कॅन्सरची लक्षणं
लघवी होताना जळजळ, योनीभागातली त्वचेमध्ये घट्टपणा जाणवणं, काही प्रमाणात रक्तस्राव व टोचल्याची भावना, त्या भागाची संवेदनशीलता वाढून तिथं चामखीळासारखी वाढ होणं ही या आजाराची काही ठळक लक्षणं आहेत.

व्हजायनल कॅन्सर स्क्रीनिंग टेस्ट

पीएपी टेस्ट : स्त्री जननेंद्रियाभवताली असणारी कॅन्सरच्या पेशींची वाढ ओळखण्यासाठी या चाचणीनं मदत होते. या चाचणीत योनीभागाच्या पृष्ठभागावरील पेशी थोड्या खरडून परिक्षणासाठी घेतल्या जातात. यामुळं थोडंफार दुखतं, पण ते कमीही होतं. गर्भाशयाच्या मुखाचा कॅन्सर ओळखण्यासाठी या चाचणीची मदत होते, त्याच पद्धतीनं योनीभागाचा कॅन्सरही ओळखता येतो.

कॉल्पोस्कोपी : यामध्ये मॅग्निफाईंग साधनं वापरली जातात. त्यामुळे योनीभागाच्या आवरणाचा स्तर दुर्बिणीच्या सहाय्यानं मोठा करून बघता येतो. इतक्या बारकाईनं योनाभागाची परिक्षा करता आल्यामुळं पेशींची चुकीच्या पद्धतीनं वाढ झालेली नाही ना याचा लगेचच अंदाज घेता येतो. योनीभाग, गर्भाशयाचं मुख आणि जननेंद्रियांची बाह्यांग यांची स्थिती बिनचूकपणे पाहता येण्यासाठीच कॉल्पोस्कोपी असते. पेशंटची पीएपी चाचणी पुरेशी समाधानकारक नसली तर डॉक्टर या स्कोपीचा सल्ला देतात. या चाचणीच्यावेळी पेशींबाबतीत शंका घेण्यास वाव असेल तर त्वचेचा थोडासा भाग काढून तो पुढे बायोस्कोपीसाठी पाठवला जातो. जननेंद्रियाच्या ठिकाणी वाढलेले चामखीळासारखे भाग किंवा गाठी यांच्याबाबतीतलं योग्य निदानही कॉल्पोस्कोपीमध्ये करता येतं. गर्भाशयाच्या अंत:स्तरावर होऊ घातलेला कॅन्सर व योनीभागातील कॅन्सरपूर्व बदल या स्कोपीने वेळेवर ओळखता येतात.

एचपीव्ही टेस्ट : ह्यूमन पॅपिलोमा व्हायरस टेस्टमुळे योनीभागात झालेल्या गाठींमध्ये असणारा व्हायरस हा कॅन्सरच आहे का हे ओळखता येऊ शकतं. पीएपी टेस्टमधून नेमकं निदान हाती आलं नाही तर डॉक्टर ही टेस्ट करायला सांगतात किंवा ही आणि पॅप स्मिअर टेस्ट अचूक निदानासाठी एकाचवेळी केली जाते. ही टेस्ट फक्त स्त्रियांबाबतीत करता येते.
बायोप्सी : स्त्रीच्या योनीभागात वाढलेल्या वेगळ्या तर्‍हेच्या पेशी किंवा उती नेमक्या निदानासाठी काही प्रमाणात खरडल्या अथवा काढल्या जातात व त्या पुढील परिक्षणासाठी पाठवल्या जातात. त्यातून योग्य निदानास मदत होते.

ओटीपोटाची (पेल्विक) तपासणी : योनीमार्गाच्या कॅन्सरचा धोका आहे का याचा पडताळा घेण्यासाठी ही तपासणी उपयोगी ठरते. या तपासणीत डॉक्टर अत्यंत बारकाईनं जननेंद्रिये व त्या आसपासचा संपूर्ण भाग तपासतात. त्याशिवाय गर्भाशय आणि बीजांड कोशाचा भागही नीट पाहिला जातो. स्पेक्युलम नावाचं साधन योनीमार्गातून आत सरकवून डॉक्टर आतील भाग पाहतात. त्यामुळं योनीमार्ग, गर्भाशयाचं मुख व आसपासचा भाग या ठिकाणांवर पेशींची अवास्तव वाढ आहे का याचा डॉक्टरांना नेमका अंदाज येतो.
योनीभागाच्या कॅन्सरचे अनेक धोके आहेत. त्यामुळंच शरीरातील कोणताही बदल बारकाईनं न्याहाळणं अतिशय आवश्यक आहे. कुठलाही वेगळा भाग अथवा बदल शरीरात/योनीभागात जाणवत असेल तर लक्षणं बळावण्या अगोदर डॉक्टरांना गाठणं हिताचं आहे. व्यक्तिगत पातळीवर काय उपायोजना करावी व कॅन्सरबद्दलच्या कुठल्या प्रतिबंधात्मक उपायांचा अवलंब करावा याबाबत  डॉक्टर योग्य तो सल्ला देऊ शकतात.
 

Web Title: Vaginal cancer is a rare disease. Need to identify symptoms on early stage For avoid further complication narikaa

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.