स्त्रियांच्या योनी आरोग्याबाबत खूप कमीवेळा बोललं जातं. पण अशा अनेक समस्या आहेत ज्याबद्दल खुलेपणाने बोलणे आवश्यक आहे. अशीच एक समस्या म्हणजे बार्थोलिन सिस्ट. स्त्रियांच्या शरीरात योनीमार्गात एक ग्रंथी असते, ज्याला आपण बार्थोलिन ग्रंथी म्हणून ओळखतो. या ग्रंथीचे कार्य द्रव स्राव करणे हे आहे, या ग्रंथीतील गाठीची समस्या आपल्याला बार्थोलिन सिस्ट या नावाने माहित आहे. (Bartholins cyst symptoms causes prevention tips)
जर तुम्हाला बार्थोलिनची गाठ झाली असेल किंवा त्यात संसर्ग झाला असेल तर तुम्हाला वेदना जाणवेल. बार्थोलिन सिस्टवर औषध आणि किरकोळ शस्त्रक्रियेच्या मदतीने उपचार केले जातात, परंतु ते होऊ नये म्हणून तुम्हाला प्रतिबंधात्मक उपाय, कारणे आणि लक्षणे सविस्तरपणे माहित असणे आवश्यक आहे. झलकारीबाई हॉस्पिटलमधील स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. दीपा शर्मा यांनी ओन्ली माय हेल्थशी बोलताना अधिक माहिती दिली आहे.
बार्थोलिन सिस्ट म्हणजे काय? (What is bartholin’s cyst))
महिलांमध्ये बार्थोलिन सिस्टची समस्या उद्भवते. सोप्या शब्दात समजून घेतल्यास, ही एका प्रकारची गाठ आहे. जी योनिमार्गात होते. याचा आकार वाढल्याने वेदना जाणवू शकतात तसेच तुम्हाला चालताना किंवा उठताना त्रास होऊ शकतो. यावर वेळेवर उपचार करणे आवश्यक आहे, अन्यथा संसर्ग वाढतो.
बार्थोलिन सिस्टची लक्षणं (Symptoms of bartholin’s cyst)
१) सिस्ट इंफेक्शन झाल्यानंतर व्हज्यानल पार्टच्या सुरूवातीला वेदना जाणवतात.
२) बसताना आणि चालताना अस्वस्थता वाटते.
३) सिस्ट इन्फेक्शन झाल्यानंर तापसुद्धा येऊ शकतो.
४) जोपर्यंत सिस्ट लहान असतो तोपर्यंत त्याकडे अनेक महिलांचं लक्ष जात नाही.
बार्थोलिन सिस्टची कारणं (Causes of bartholin’s cyst)
१) बार्थोलिन सिस्ट दुखापतीमुळे होऊ शकते.
२) बॅक्टेरियाच्या संसर्गामुळे बार्थोलिनचे सिस्ट होऊ शकते.
३) गोनोरिया आणि क्लॅमिडीयामुळे देखील सिस्ट होऊ शकतात.
४) सिस्ट संक्रमित झाल्यानंतरही गाठ येऊ शकते.
सिस्टची लक्षणं दिसल्यानंतर काय करायचं? (How to treat bartholin’s cyst)
बार्थोलिन ही स्राव ग्रंथी आहे. या ग्रंथीतील सिस्टमुळे ग्रंथीचे दार बंद होते आणि द्रव बाहेर पडू शकत नाही. जेव्हा बार्थोलिन सिस्टची लक्षणे दिसतात तेव्हा शारीरिक तपासणी केली जाते. याशिवाय CCD स्क्रीनिंग, लघवी चाचणी आणि रक्त तपासणीद्वारे सिस्ट तपासणीच्या मदतीने तुम्ही सिस्ट्स होण्याची भीती दूर करू शकता. अँटिबायोटिक्सच्या मदतीने देखील सिस्टचा उपचार केला जातो. याशिवाय, सिस्ट्स शस्त्रक्रियेच्या मदतीने देखील बरे केले जातात, ज्याला आपण मार्सुपियालायझेशन सर्जरी म्हणून ओळखले जाते. आणखी एक शस्त्रक्रिया म्हणजे सर्जिकल ड्रेनेज.
बार्थोलिन सिस्टपासून बचावाचे उपाय (How to prevent bartholin’s cyst)
१) योनीमार्गाच्या स्वच्छतेची काळजी घ्या.
२) तुम्ही सकस आहार घ्या.
३) समतोल आहारासोबत पुरेसे पाणी पिणे गरजेचे आहे.
४) रोजच्यारोज अंडरवेअर बदला, योनी स्वच्छ ठेवणे महत्वाचे आहे.
५) योनी कोरडी ठेवा, आवश्यक असल्यास, तुम्ही दिवसातून दोनदा अंडरगारमेंट बदलू शकता.