Join us   

कॅन्सरचं कारण ठरू शकतात प्रायव्हेट पार्ट्सवरच्या गाठी; डॉक्टर सांगतात लक्षणं आणि उपाय

By ऑनलाइन लोकमत | Published: June 01, 2021 5:30 PM

Vaginal Health Tips : समस्या वाढल्यानंतर योनीवर बंप तयार होतात आणि जखम आणि अल्सर होऊ शकतात. योनीच्या सभोवताली गाठी का उद्भवतात याबाबत आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

प्रायव्हेट पार्ट्समध्ये गाठी येणं हे नॉर्मल आहे का? फक्त तुम्हीच नाही तर मोठ्या संख्येनं महिलांना असा प्रश्न पडतो की, योनी मार्गाजवळ जर समजा गाठी तयार झाल्या तर त्यांच्यापासून कितपत धोका असतो. योनिमार्गाची त्वचा अत्यंत संवेदनशील असते. परंतु योनीवरील प्रत्येक गाठ ही धोक्याचे नसते. अनेक महिला जोपर्यंत तीव्रतेनं वेदना होत नाहीत तोपर्यंत  सर्रास दुर्लक्ष करतात. वेळीच लक्ष दिलं नाही तर त्रास वाढून उपचार गुंतागुतीचे होऊ  शकतात. 

कोलंबिया एशिया हॉस्पिटलच्या स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. रंजना बेकन यांनी ओन्ली माय हेल्थशी बोलताना दिलेल्या माहितीनुसार निरनिराळ्या कारणांसाठी योनीच्या सभोवताली गाठी येऊ शकतात. जोपर्यंत आपल्याला त्या भागावर जळजळ होत नाही तोपर्यंत योनीतील समस्या जाणवत नाही. समस्या वाढल्यानंतर  योनीवर बंप्स तयार होतात त्यामुळे जखम, अल्सर होऊ शकतो. योनीच्या सभोवताली गाठी का उद्भवतात याबाबत आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. 

तेलाच्या ग्रंथींमध्ये वाढ 

महिलांच्या योनीच्या आसपासच्या त्वचेत तेलाचे प्रमाण खूप असते.  तैल ग्रंथीच्या गाठीत जास्त प्रमाणात तेल तयार होणं गाठींचं कारण ठरू शकते. ७० ते ८० टक्के वयस्कर महिलांना या प्रकारच्या समस्यांचा सामना करावा लागतो. या गाठीकडे दुर्लक्ष केल्यास तरल पदार्थ जमा होऊ लागतात.  सूज येते आणि गंभीर स्थितीत हीच गाठ कँन्सर आणि ट्यूमरच कारण ठरू शकते. 

इनग्रोथ हेअर्स

योनीच्या बाहेरचा भाग आणि त्याच्या आसपासच्या भागात प्लॅकिंग आणि वॅक्सिंगमुळे बहुतेकदा केस बाहेर पडतात. परंतु केसांची वाढ आतल्या बाजूनं जास्त होते तेव्हा समस्या वाढते आणि गाठी होतात. हे वेदना आणि  खाजेचे कारण ठरू शकते. योनीच्या आसपासच्या भागात काही स्किन टॅगमुळे असू शकतात. त्वचा जास्त मऊ असते अशावेळी ही समस्या उद्भवू शकते. 

जखम

पाण्यानं भरलेल्या लहान लहान दाण्यांमुळे मुत्र बाहेर येताना जळजळ आणि वेदना होतात.  याचे उपचार एंटीबायोटिक औषधांनी केले जाऊ शकतात. हे एक प्रकारचं STI संक्रमण आहे. HSV हर्पीज सिंप्लेक्स व्हायरसमुळे हे संक्रमण वाढत जातं. हा आजार रोखण्यासाठी लस तयार केलेली नाही. 

कॅन्सरचा धोका

योनीतील गाठी होण्याची समस्या जीवघेणा असू शकते. यामुळे लघवी किंवा पेल्विक वेदना सारख्या समस्या उद्भवू शकतात. आपणासही अशीच काही लक्षणे येत असल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या. कारण या गाठी कॅन्सरचं रूप घेऊ शकतात. १० पैकी ६ महिलांना या समस्येचा सामना करावा लागतो. तज्ज्ञांच्या मते, स्त्रियांमध्ये गाठ होण्याची समस्या सामान्य आहे. परंतु या सामान्य समस्या जीवघेणा होण्यापूर्वी, त्यांच्यावर उपचार करणे फार महत्वाचे आहे.

परंतु जर एचएसव्ही किंवा एचपीव्हीमध्ये समस्या उद्भवली असेल आणि वेदनासह पस वाहत असेल तर आपण त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. कारण योग्य निदानासह योग्य वेळी योग्य उपचार आपले जीव वाचवू शकतात. जे तुमच्या आरोग्यासाठी खूप महत्वाचे आहे. 

अशी घ्या काळजी

प्रायव्हेट पार्ट्स साफ करण्यासाठी पाण्याचा वापर उत्तर पर्याय आहे. पाण्यानं स्वच्छ केल्यास बॅक्टेरियाजचा प्रसार होण्यापासून रोखता येऊ शकतं. प्रत्यक्ष हाताचा संपर्कही पाण्याच्या वापरानं टाळता येऊ शकतो म्हणून हे अधिक सुरक्षित आहे. लघवी केल्यानंतर पाण्यानं स्वच्छ करत असाल तर लगेचच टॉवेलनं पुसून घ्या. टॉयलेट पेपर आणि पाणी स्वतःच्या प्रायव्हेट पार्ट्सना स्वच्छ ठेवण्याचा सोपा उपाय आहे. या दोन्ही उपायांचा ताळमेळ बसवून योगी मार्गाची योग्य पद्धतीनं साफ सफाई करणं चांगले ठरेल.

टॅग्स : हेल्थ टिप्सआरोग्यमहिला