Lokmat Sakhi >Health >Gynaecology Disorder > उन्हाळ्यात अंगावर पांढरं पाणी जाण्याचा त्रास वाढला? खाज येते? -ही इन्फेक्शनची लक्षणं तर नाहीत..

उन्हाळ्यात अंगावर पांढरं पाणी जाण्याचा त्रास वाढला? खाज येते? -ही इन्फेक्शनची लक्षणं तर नाहीत..

What is abnormal white or vaginal discharge : व्हाईट डिस्चार्जचे अनेक प्रकार आहेत. त्यातील काही प्रकार सामान्य आहेत. महिलांना पिरिएड्सच्या आधी, व्हजायनल बॅक्टेरिअल इन्फेक्शन आणि फंगल इन्फेक्शनमुळेही व्हाईट डिस्चार्जचा त्रास होतो.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 2, 2023 12:51 PM2023-03-02T12:51:29+5:302023-03-02T16:40:44+5:30

What is abnormal white or vaginal discharge : व्हाईट डिस्चार्जचे अनेक प्रकार आहेत. त्यातील काही प्रकार सामान्य आहेत. महिलांना पिरिएड्सच्या आधी, व्हजायनल बॅक्टेरिअल इन्फेक्शन आणि फंगल इन्फेक्शनमुळेही व्हाईट डिस्चार्जचा त्रास होतो.

What is abnormal white or vaginal discharge in women know symptoms causes treatment | उन्हाळ्यात अंगावर पांढरं पाणी जाण्याचा त्रास वाढला? खाज येते? -ही इन्फेक्शनची लक्षणं तर नाहीत..

उन्हाळ्यात अंगावर पांढरं पाणी जाण्याचा त्रास वाढला? खाज येते? -ही इन्फेक्शनची लक्षणं तर नाहीत..

अजूनही महिला आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतात.  अनेकदा लहान वाटणाऱ्या समस्या मोठ्या आजाराचं कारण ठरतात. शरीरात उष्णता वाढल्यानं किंवा अशक्तपणा वाढल्यास अंगावरून पांढरं पाणी जाण्याची समस्या उद्भवते. व्हाईट डिस्चार्जला ल्युकोरिया (Leucorrhoea) असंही म्हणतात. व्हाईट डिस्चार्ज होणं सामान्य आहे. (What is abnormal white or vaginal discharge)

मासिक पाळीच्या आधी ओव्हूलेशनच्यावेळी हा स्त्राव होणं सामान्य आहे. अनेकदा व्हाईट डिस्चार्जच्यावेळी खाज येणं,  पिवळ्या रंगाचा स्त्राव बाहेर येणं, दुर्गंधी जाणवते. फोर्टिस हॉस्पिटलच्या ऑब्सटेट्रिशियन एंड गायनेकोलॉजिस्ट डॉ. सुषमा तोमर यांनी एका हिंदी वेबसाईटशी बोलताना व्हाईट डिस्चार्जची कारणं आणि लक्षणांबद्दल अधिक माहिती दिली आहे. (Vaginal Discharge Causes, Colors, What's Normal & Treatment)

व्हाईट डिस्चार्ज का होतो?

व्हाईट डिस्चार्जचे अनेक प्रकार आहेत. त्यातील काही प्रकार सामान्य आहेत. महिलांना पिरिएड्सच्या आधी ओव्हुलेशनच्यावेळी स्त्राव होतो. याव्यतिरिक्त व्हजायनल बॅक्टेरिअल इन्फेक्शन आणि फंगल इन्फेक्शनमुळेही व्हाईट डिस्चार्जचा त्रास होतो. जर या डिस्चार्जचा दुर्गंध येत असेल, पांढरा किंवा पिवळा स्त्राव असेल आणि एक महिन्यापर्यंत हा स्त्राव  तसाच असेल तर त्वरीत डॉक्टरांचा सल्ला घ्या. तपासणीद्वारे हा स्त्राव होण्याचं कारण माहित करून घेता येऊ शकतं.

कोण म्हणतं व्हेज अन्नात प्रोटीन नसतं? भरभरून प्रोटीन्स देतात ५ आयुर्वेदीक पदार्थ, आजपासूनच खा 

व्हाईट डिस्चार्जचे प्रकार

पांढरा स्त्राव होत असताना खाजही येत असेल तर डॉक्टरांच्या सल्ल्यानं वेळीच ट्रिटमेंट सुरू करा. जर पिवळा व्हजायनल डिस्चार्ज होत असेल तर हे अजिबात नॉर्मल नाही हे इन्फेक्शनमुळे हे असू शकतं. अनप्रोटेक्टेड  लैगिंक संबंध ठेवल्यानंही असा त्रास उद्भवतो. हिरवा स्त्राव बॅक्टेरिअल, सेक्शुअल इन्फेक्शनमुळे होतो. अशावेळी त्वरीत डॉक्टरांचा सल्ला घ्या.

कारणं 

सतत व्हाईट डिस्चार्ज होणं हे यीस्ट इंफेक्शन, युटरस इन्फेक्शन, कॅन्सरचे लक्षण असू शकते. 

व्हाईट डिस्चार्जची लक्षणं

योनीत जळजळ होणं,  खाज, लघवी सतत येणं, लघवी करताना वेदना जाणवणं, संबंध ठेवताना त्रास होणं, पेल्विक पार्ट्समध्ये वेदना, ताप येणं, कंबरदुखी, प्रायव्हेट पार्ट्समध्ये वेदना.

उपाय

वैयक्तीक स्वच्छता  ठेवून तुम्ही ल्युकोरियाची समस्या टाळू शकतो. कॉटनचे आणि सैल आरामदायक कपडे वापरा. आपले कपडे, डेटॉल किंवा गरम पाण्यानं स्वच्छ करा. टॉयलेट सीट टिश्यू पेपरनं स्वच्छ केल्यानंतर वापरा. 

Web Title: What is abnormal white or vaginal discharge in women know symptoms causes treatment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.