Lokmat Sakhi >Health >Gynaecology Disorder > Women's health : प्रेग्नंसीशिवाय स्तनांमधून दूध, पांढरं पाणी येणं ठरू शकतं 'या' आजाराचं कारण; वेळीच लक्ष द्या

Women's health : प्रेग्नंसीशिवाय स्तनांमधून दूध, पांढरं पाणी येणं ठरू शकतं 'या' आजाराचं कारण; वेळीच लक्ष द्या

Women's health : डिलिव्हरीनंतर महिलांच्या निप्पल्समधून पांढरा तरल पदार्थ बाहेर येतो. त्याला निप्पल्स डिस्चार्ज असंही म्हटलं जातं.

By ऑनलाइन लोकमत | Published: July 23, 2021 01:31 PM2021-07-23T13:31:41+5:302021-07-23T14:10:08+5:30

Women's health : डिलिव्हरीनंतर महिलांच्या निप्पल्समधून पांढरा तरल पदार्थ बाहेर येतो. त्याला निप्पल्स डिस्चार्ज असंही म्हटलं जातं.

Women's health : Breast milk before delivery causes, symptoms by experts | Women's health : प्रेग्नंसीशिवाय स्तनांमधून दूध, पांढरं पाणी येणं ठरू शकतं 'या' आजाराचं कारण; वेळीच लक्ष द्या

Women's health : प्रेग्नंसीशिवाय स्तनांमधून दूध, पांढरं पाणी येणं ठरू शकतं 'या' आजाराचं कारण; वेळीच लक्ष द्या

Highlightsगर्भधारणेशिवाय दूध, पांढरे पाणी बाहेर येणं मुळीच सामान्य गोष्ट नाही. परंतु काही महिलांना या परिस्थितीचा सामना करावा लागतो.प्रेग्नंसीशिवाय दूध बाहेर येणं ग्लेक्टोरिया या आजारचे संकेत आहेत. ब्रेस्ट टिश्यू वाढणं,  अस्वस्थ वाटणं, पुळ्या येणं, डोकेदुखी, केस गळणं, अनियमित पीरियड्स पिंपल्स, शरीरसंबंध ठेवण्यास फारसा उत्साह नसणं अशी लक्षणं दिसून येऊ शकतात.

प्रसुतीनंतर स्तनातून दूध बाहेर येणे सामान्य गोष्ट आहे. प्रत्येक महिलेच्या प्रसूतीनंतर स्तनातून दूध बाहेर पडते, परंतु काही स्त्रियांमध्ये, गर्भधारणा नसतानाही स्तनातून दूध, पांढरे पाणी बाहेर येऊ लागते. सामान्य समजून याकडे दुर्लक्ष करणं मोठ्या आजाराचं कारण ठरू शकतं. डिलिव्हरीनंतर महिलांच्या निप्पल्समधून पांढरा तरल पदार्थ बाहेर येतो. त्याला निप्पल्स डिस्चार्ज असंही म्हटलं जातं. वॉकहार्ट रुग्णालय, मुंबई सेंट्रल प्रसूति एवं स्त्री रोग विशेषज्ञ डॉक्टर गंधाली देवरुखकर  यांनी याबाबत अधिक माहिती दिली आहे. 

प्रसुती नसताना स्तनांमधून दूध बाहेर येण्याची कारणं

डॉ. गंधाली स्पष्ट करतात की, ''जास्त प्रोलॅक्टिनमुळे गर्भवती किंवा स्तनपान न झालेल्या स्त्रियांमध्ये दूधाचे उत्पादन होऊ शकते. प्रोलॅक्टिन जास्त प्रमाणात स्त्रियांमध्ये मासिक पाळीच्या समस्या आणि वंध्यत्वाच्या समस्यांसाठी  कारणीभूत ठरू शकते. प्रोलॅक्टिनोमा पिट्यूटरी ग्रंथीचा एक नॉनकेन्सरस ट्यूमर आहे. या ट्यूमरमुळे पिट्यूटरीला प्रोलॅक्टिन नावाचं संप्रेरक जास्त प्रमाणात तयार होतो. प्रोलॅक्टिनोमाचे मुख्य परिणाम म्हणजे काही सेक्स हार्मोन्सची पातळी कमी होते. स्त्रियांमध्ये इस्ट्रोजेन आणि पुरुषांमध्ये टेस्टोस्टेरॉन. जरी प्रोलॅक्टिनोमा जीवघेणा नसला तरी  दृष्टीस अडचणी, वंध्यत्व आणि इतर समस्या उद्भवू शकतात. प्रोलॅक्टिनोमा हा सर्वात सामान्य प्रकारचा संप्रेरक-उत्पादक ट्यूमर आहे जो आपल्या पिट्यूटरी ग्रंथीमध्ये विकसित होऊ शकतो.''

या आजारांचा असू शकतो धोका

गर्भधारणेशिवाय दूध, पांढरे पाणी बाहेर येणं मुळीच सामान्य गोष्ट नाही. परंतु काही महिलांना या परिस्थितीचा सामना करावा लागतो.  आजकाल अनियमित पिरिएड्स ही एक सामान्य समस्या बनली आहे. मासिक पाळीच्या समस्येमुळे अनेक स्त्रियात्रस्त आहे. मासिक पाळीच्या अनियमिततेमुळे आरोग्याला अनेक समस्या उद्भवू शकतात. परंतु पीरियड्स अनियमित असतात तेव्हा अशी काही लक्षणं दिसून येतात.पिंपल्स येणं, सूज येणं, स्तनांमध्य वेदना, वजन वाढणं, डोकेदुखी, थकवा येणं, अस्वस्थता, डिप्रेशन वाटणं. 

वंधत्व

आजकाल चुकीच्या जीवनशैलीमुळे महिलांमध्ये वंध्यत्वाची समस्या खूप वाढली आहे. अशा परिस्थितीत ते खूप अस्वस्थ आणि उदास राहतात. गर्भावस्थेशिवाय स्तनांमधून दूध बाहेर येणे देखील वंध्यत्व समस्येचे लक्षण असू शकते. परंतु जर डॉक्टरांना दाखवून त्यावर उपचार केले तर ही समस्या देखील दूर होऊ शकते. तोंडावर नको असलेले केस येणं,  केस गळणं, अनिमित पाळी  अशी लक्षणं दिसून येतात. 

गॅलेक्टोरिया (Galactorrhea)

प्रेग्नंसीशिवाय दूध बाहेर येणं ग्लेक्टोरिया या आजारचे संकेत आहेत. ब्रेस्ट टिश्यू वाढणं,  अस्वस्थ वाटणं, पुळ्या येणं, डोकेदुखी, केस गळणं, अनियमित पीरियड्स पिंपल्स, शरीरसंबंध ठेवण्यास फारसा उत्साह नसणं अशी लक्षणं दिसून येऊ शकतात. तुम्हालाही त्याचप्रकारची लक्षणं दिसत असतील तर त्वरित डॉक्टरांच्या सल्ल्यानं उपचार घ्यायला हवेत. 
 

Web Title: Women's health : Breast milk before delivery causes, symptoms by experts

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.