एचआयव्ही एड्सबद्दल (World Aids Day 2021 ) जनजागृती करण्यासाठी दरवर्षी १ डिसेंबर रोजी जागतिक एड्स दिन साजरा केला जातो. एड्स हा एक अतिशय धोकादायक आजार आहे, ज्यावर आतापर्यंत कोणताही उपचार सापडलेला नाही. महिलांसह पुरूषांमध्येही या आजाराबाबत अनेक गैरसमज आहेत. हा रोग इम्युनोडेफिशियन्सीमुळे होतो. यामध्ये बहुतेक लोकांचे अवयव काम करणे बंद करतात आणि लवकर संसर्ग होतो. एचआयव्ही बाधित प्रत्येकालाच एड्स होत नाही. (world aids day)
मात्र, वेळीच औषधोपचार आणि काळजी घेतल्याने रुग्णांची स्थिती गंभीर होण्यापासून वाचवता येऊ शकतं. एड्स ग्रस्त लोकांमध्ये, संसर्गामुळे मल्टीसिस्टम अवयव निकामी होतात. WHO च्या मते, 2020 च्या अखेरीस अंदाजे 37.7 दशलक्ष लोक एचआयव्हीसह जगत होते. त्याच वर्षी, 680,000 लोक एचआयव्ही-संबंधित कारणांमुळे मरण पावले आणि 1.5 दशलक्ष एचआयव्हीग्रस्त झाले.
सेंटर्स फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेन्शन (CDC) नुसार, एचआयव्हीच्या सुरुवातीच्या टप्प्यात लक्षणे फार लवकर दिसून येत नाहीत, परंतु लवकर ओळखल्यास व्हायरसवर नियंत्रण ठेवण्यास आणि स्टेज 3 पर्यंत पोहोचण्यापासून रोखू शकते. स्टेज 3 एचआयव्ही सामान्यतः एड्स म्हणून ओळखले जाते.
एड्सची सुरूवातीची लक्षणं (Symptoms of AIDS)
सुरुवातीला, प्रभावित लोकांमध्ये कोणतीही विशिष्ट लक्षणे दिसत नाहीत, परंतु काही लोकांमध्ये, ताप, डोकेदुखी, थकवा आणि घसा खवखवणे यासारखी लक्षणे दिसू शकतात. ही लक्षणे सहसा संसर्ग झाल्यानंतर एक किंवा दोन महिन्यांत विकसित होतात, तर काही लोकांमध्ये ती दोन आठवड्यात दिसू शकतात.
महिनाभरात झरझर कमी होईल Belly fat; फिटनेस एक्सपर्ट्सनी सांगितलं वजन कमी करण्याचं सिक्रेट
मळमळ, डोकेदुखी, थकवा, अशक्तपणा, सुजलेल्या ग्रंथी, घसा खवखवणे, स्नायू आणि सांधेदुखी, रात्री घाम येणे,अतिसार ही एचआयव्हीची सुरुवातीची लक्षणे आहेत. ही एचआयव्हीची लक्षणे देखील सामान्य रोग आणि आरोग्य परिस्थितीशी संबंधित आहेत.
रोगप्रतिकारकशक्ती कमकुवक होते
जसजशी स्थिती बिघडते तसतशी एचआयव्ही असलेल्या लोकांची प्रतिकारशक्ती कमकुवत होते. काहीवेळा माऊथ कॅन्सर, दातांमधील फोड यासारख्या किरकोळ संसर्गामुळेही एचआयव्ही होतो. डॉक्टरांच्या मते, एचआयव्ही ग्रस्त लोकांसाठी या संसर्गातून बरे होणे थोडे कठीण असू शकते.
सतत कोणत्याही संक्रमणाचा सामना करावा लागू शकतो
वारंवार होणारे किरकोळ संक्रमण हे देखील एचआयव्हीचे प्रारंभिक लक्षण आहे. एखाद्या व्यक्तीला वारंवार सर्दी किंवा यीस्टचा संसर्ग होऊ शकतो. याशिवाय अनेकांना दीर्घकाळ आजारी वाटू शकते. जे लोक सहसा जीवाला धोका नसलेल्या संसर्गामुळे वारंवार आजारी पडतात. जर तुम्हाला कधी असे वाटत असेल तर तुम्ही लवकरात लवकर डॉक्टरांशी संपर्क साधावा.
हिवाळ्यात चांगल्या तब्येतीसाठी सुपर फूड ठरते पालक; ही घ्या पालक पनीरची स्वादिष्ट रेसेपी
एचआयव्ही आटोक्यात आणता येतो, परंतु त्यावर उपचार न केल्यास ते तिसऱ्या टप्प्यापर्यंत पोहोचू शकते. म्हणूनच लक्षणे ओळखणे आणि शक्य तितक्या लवकर चाचणी घेणे महत्वाचे आहे, कारण एचआयव्ही ग्रस्त व्यक्ती जी उपचार घेत नाही ती व्हायरस पसरवू शकते, कोणतीही लक्षणे असली किंवा नसली तरीही.