आळशीच्या बीयांचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत. आळशीच्या बीयांचा आहारात समावेश केल्यास गंभीर आजारांपासून लांब राहता येते. सकाळी चहा, कॉफी पिऊन दिवस सुरू करण्याऐवजी तुम्ही आळशीचे पाणी प्यायलात तर तब्येतीत चांगला फरक जाणवेल. आळशीत कार्ब्स, थियामीन, फॅट्स, फायबर, कॉपर मॅग्नेशियम, फॉस्फरस, जिंक, व्हिटामीन बी-६, फॉलेट आणि ओमेगा ३ फॅटी एसिड्स असतात. (Benefits Of Drinking Flaxseed Water Every Morning) सकाळी रिकाम्यापोटी हे पाणी प्यायल्यानं आर्थरायटिस, अस्थमा, हायब्लड प्रेशर, हॉर्मोनल इम्बॅलेंस आणि कार्डिओवॅस्कुलर आजारही लांब रहतात. भिजवलेल्या आळशीच्या बियांचं पाणी प्यायल्यानं आरोग्याला बरेच फायदे मिळतात. (flaxseeds water benefits)
१) पचनासंबंधित कोणत्याही समस्या असल्यास आळशीचे पाणी फायदेशीर ठरते. हे पाणी सकाळी रिकाम्या पोटी प्यायल्यानं तसंच या बीया चावून खाल्ल्यानं फायबर्स, ओमेगा-३ फॅटी एसिड्स मिळतात. जे एक लॅक्सेटिव्हप्रमाणे काम करतात आणि गॅस, अपचनाची समस्या दूर करतात. डायटरी फायबर्स अधिक असतात. आळशीच्या बीयांचे पाणी ब्लड ग्लूकोज लेव्हल रेग्युलेट करण्यासाठी आणि आजारांची रिस्क कमी करण्यासाठी फायदेशीर ठरतात.
२) या बिया पाण्यात भिजवून प्यायल्यानं ओमेगा-३ फॅटि एसिड्स, व्हिटामीन बी, एंटीऑक्सिडेंट्स, व्हिटामीन ई मिळते. ज्यामुळे केस मजबूत होतात आणि वाढ होते. यामुळे फ्री रॅडिकल्स तयार होऊन केसांच्या विकासास चालना मिळते. यातील एंटी इफ्लेमेटरी गुण आणि एंटी ऑक्सिडंट्स प्रॉपर्टिजमुळे अवेळी केस पांढरे होत नाही आणि केसांचा टेक्स्ट मऊ, शायनी राहतो आणि हेअर फॉलिकल्स मजबूत राहतात.
३) जर तुमची त्वचा कोरडी पडली असेल आणि डाग असतील तर रिकाम्या पोटी आळशीच्या बीयांचे पाणी प्यायला हवे. यात हेल्दी फॅट्स, अँटिऑक्सिडंट्स, प्रोटीन, फायबर असतात. रात्रभर पाण्यात भिजत ठेवा आणि सकाळी रिकाम्या पोटी याचे सेवन करा. यामुळे त्वचा मुलायम, निरोगी आणि चमकदार दिसेल. मुरुमांसाठी जबाबदार असलेल्या एंड्रोजन हार्मोन्सचे उत्पादन संतुलित करते.
४) उच्च कोलेस्टेरॉलची पातळी हृदयासाठी तसेच एकूण आरोग्यासाठी चांगली नसते. जवसाच्या बिया पाण्यात मिसळून खाल्ल्याने कोलेस्टेरॉलची पातळी बर्याच प्रमाणात कमी करता येते. आहारातील फायबरने समृद्ध असलेले हे पाणी प्यायल्याने आतड्याची हालचाल योग्य होते. खराब कोलेस्ट्रॉल कमी करता येते.
५) तुमचं वजन सतत वाढत असेल तर सकाळी आळशीच्या बीयांचे पाणी प्यायला सुरूवात करा. रात्रभर या पाण्यात आळशीच्या बीया बुडवून ठेवा. सकाळी या बिया फुलल्यानंतर या पाण्याचे सेवन करा. या पाण्यामुळे अधिक कॅलरीजयुक्त पदार्थ खाण्यात येत नाहीत. वजन नियंत्रणात राहतं. याशिवाय सर्वच शारीरिक समस्यांसाठी आळशीचं पाणी गुणकारी ठरते.