Lokmat Sakhi >Health > शेवग्याच्या शेंगा आहेत जीवनदान देणारं अमृत, आठवड्यातून एकदा खा- ठणकणारी हाडं कायमची होतील बरी

शेवग्याच्या शेंगा आहेत जीवनदान देणारं अमृत, आठवड्यातून एकदा खा- ठणकणारी हाडं कायमची होतील बरी

Health Benefits Of Moringa Drumsticks From Bones to Brain : शेवग्याच्या शेंगा खाण्याचे फायदे समजून घेऊ. (Health Benefits Of Moringa Drumsticks From Bones to Brain)

By ऑनलाइन लोकमत | Published: November 15, 2024 02:09 PM2024-11-15T14:09:34+5:302024-11-15T18:21:44+5:30

Health Benefits Of Moringa Drumsticks From Bones to Brain : शेवग्याच्या शेंगा खाण्याचे फायदे समजून घेऊ. (Health Benefits Of Moringa Drumsticks From Bones to Brain)

Health Benefits Of Moringa Drumsticks From Bones to Brain Moringa Drumsticks Benefits | शेवग्याच्या शेंगा आहेत जीवनदान देणारं अमृत, आठवड्यातून एकदा खा- ठणकणारी हाडं कायमची होतील बरी

शेवग्याच्या शेंगा आहेत जीवनदान देणारं अमृत, आठवड्यातून एकदा खा- ठणकणारी हाडं कायमची होतील बरी

आयुर्वेदानुसार शेवग्याच्या शेंगा आपल्या आरोग्यासाठी अनेकदृष्ट्या फायदेशीर ठरतात (Benefits Of Moringa Drumsticks). शेवगा वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या नावांनी ओळखला जातो. जसं की मोरिंगा, ड्रमस्टिक इत्यादी. ही एक प्रकारची हिरवी भाजी आहे. ज्याचं वैद्यकिय नाव मोरिंगा ओलिफेरा आहे. हे खायला जितकं स्वादीष्ट असते तितकंच याचे फायदेही मिळतात. शेवग्याच्या शेंगा खाण्याचे फायदे समजून घेऊ. (Health Benefits Of Moringa Drumsticks From Bones to Brain)

मोरिंगा शरीराच्या अनेक पोषक तत्वांनी परीपूर्ण असते. यात एंटी इंफ्लेमेटरी, एंटी डायबिटीक, एंटी बायोटिक, एंटी ऑक्सिडेंट, एंटी व्हायरल, एंटी एजिंग आणि एंटी फंगल गुण असतात. याव्यतिरिक्त यात व्हिटामीन ए आणि सी असते. एंटी ऑक्सिडेंट्सयुक्त गुणांनी परीपूर्ण शेवग्याचे सेवन केल्यानं तुमचे ब्रेन सेल्स हेल्दी राहण्यास मदत होते. याचे सेवन केल्यानं स्मरणशक्ती चांगली राहते. शेवग्याच्या शेंगांमध्ये ट्रिप्टोफेन नावाचे प्रोटीन असते ज्यामुळे तुमचा मेंदू चांगला राहतो. 

शेवग्याच्या शेंगांना तुम्ही आपल्या आहाराचा एक भाग बनवू शकता. यातील एंटी ऑक्सिडेंट्स तत्व त्वचेसाठी फायदेशीर ठरतात. वाढत्या वयात तुमची त्वचा लटकते.  याच्या बचावासाठी शेवग्याचे सेवन करणं फायदेशीर ठरतं. ज्यामुळे त्वचेत बदल दिसून येतो याशिवाय फाईन लाईन्स, सुरकुत्या येत नाहीत. 

रिसर्चनुसार शेवग्याच्या शेंगांमध्ये एंटी इंफ्लेमेटरी तत्व असतात ज्यामुळे शरीराची सूज कमी होण्यास मदत होते. एक्जिमा, सोरायसिस यांसारख्या त्रासांवरही आराम मिळतो.  शेवग्याच्या शेंगा खाल्ल्यानं शरीरातील बॅड कोलेस्टेरॉल कमी होते, याव्यतिरिक्त गुड कोलेस्टेरॉल वाढते ज्यामुळे हार्ट अटॅक आणि स्ट्रोकचा धोका कमी होतो. डायबिटीसच्या रुग्णांसाठी शेवग्याच्या शेंगा फायदेशीर ठरतात. शेवगा एंटी डायबिटीक गुणांनी परिपूर्ण असते ज्यामुळे ब्लड शुगर नियंत्रणात राहण्यास मदत होते. 

हिवाळ्यात रोज खा रताळी, व्हिटामिन-फायबरचे पॉवरहाऊस-कतरिना कैफच्याही डाएटमधला खास आवडता पदार्थ

पोट आणि हाडांसाठी गुणकारी

जर तुम्हाला पोटाशी संबंधित गॅस, अपचन यांसारख्या समस्या असतील तर तुम्ही शेवग्याच्या शेंगांचे सेवन करू शकता. यातील फायबर्सयुक्त गुण पोट हेल्दी ठेवतात. ज्यामुळे मलत्याग करणंही सोपं जातं. कॅल्शियम, व्हिटामीन्सनी परिपूर्ण शेवग्याचे सेवन केल्यानं बोन्स डेंसिटी वाढते. 

थंडीत केस खूपच गळतात? मोहोरीच्या तेलात २ पदार्थ घालून केसांना लावा; घनदाट-लांब केस मिळवा

इम्यूनिटी वाढते

जर तुम्ही वारंवार आजारी पडत असाल तर शरीरातील इम्यूनिटी वाढवायला हवी.  यात व्हिटामीन सी, एंटी ऑक्सिडेंट्सयुक्त गुण असतात ज्यामुळे शरीराच्या रोगांशी लढण्याची क्षमता मजबूत होते. शेवग्याच्या भाजीचे सेवन तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीनं करू शकता. या पानांची पावडर बनवून कोमट पाण्यासोबत घ्या. याचा ज्यूस आणि सूपचा आहारात समावेश करा. काही लोक शेवग्याच्या पानांचा काढा बनवूनही पितात.

Web Title: Health Benefits Of Moringa Drumsticks From Bones to Brain Moringa Drumsticks Benefits

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.