Lokmat Sakhi >Health > हॉटेलमधली गरमागरम तंदुरी रोटी खाणं पडेल महागात- लठ्ठपणा, डायबिटीससोबतच मागे लागतील 'हे' आजार

हॉटेलमधली गरमागरम तंदुरी रोटी खाणं पडेल महागात- लठ्ठपणा, डायबिटीससोबतच मागे लागतील 'हे' आजार

Why Tandoori Roti Is Unhealthy: हॉटेलमध्ये जाऊन मसालेदार भाजी आणि त्याच्यासोबत मैद्याची गरमागरम तंदुरी रोटी खाणं हे अनेकांच्या आवडीचं. पण तेच आरोग्यासाठी किती धोकादायक ठरू शकतं पाहा.. (side effects of eating tandoori roti in hotel)

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2024 10:34 AM2024-04-20T10:34:05+5:302024-04-20T10:34:58+5:30

Why Tandoori Roti Is Unhealthy: हॉटेलमध्ये जाऊन मसालेदार भाजी आणि त्याच्यासोबत मैद्याची गरमागरम तंदुरी रोटी खाणं हे अनेकांच्या आवडीचं. पण तेच आरोग्यासाठी किती धोकादायक ठरू शकतं पाहा.. (side effects of eating tandoori roti in hotel)

health tips side effects of eating tandoori roti in hotel, why to avoid eating tandoori roti | हॉटेलमधली गरमागरम तंदुरी रोटी खाणं पडेल महागात- लठ्ठपणा, डायबिटीससोबतच मागे लागतील 'हे' आजार

हॉटेलमधली गरमागरम तंदुरी रोटी खाणं पडेल महागात- लठ्ठपणा, डायबिटीससोबतच मागे लागतील 'हे' आजार

Highlightsएका तंदुरी रोटीमध्ये ११० ते १५० कॅलरीज असतात. शिवाय त्यात कार्बोहायड्रेट्सचं प्रमाणही खूप जास्त असतं.

आजकाल बऱ्याच जणांचं हॉटेलिंग खूप वाढलं आहे. महिन्यातून दोन ते तीन वेळा तरी बहुतांश लोकांचं बाहेर खाणं होतं. त्यातही बाहेर जाऊन खायचं असेल आणि जेवण करायचं असेल तर सरळ पंजाबी डिश मागवल्या जातात. त्यात भाज्या आणि तंदुरी रोटी असा आपला मेन्यू असतो. घरी तर आपण गव्हाच्या, ज्वारीच्या पोळ्या, भाकरी खातोच. मग आता हॉटेलमध्ये आलो आहोत तर थोडं वेगळं मागवू म्हणून हौशीने अनेक जण मैद्याच्या तंदुरी रोटी मागवतात (side effects of eating tandoori roti in hotel). पण त्याच तुमच्या आरोग्यासाठी किती धोकादायक ठरू शकतात, हे एकदा बघून घ्या (why to avoid eating tandoori roti) आणि त्यानंतर तंदुरी रोटी खायची का आणि खायचीच असेल तर किती प्रमाणात खायची हे ठरवा. (Why Tandoori Roti Is Unhealthy)

 

तंदुरी रोटी खाणं का टाळावं?

एका तंदुरी रोटीमध्ये ११० ते १५० कॅलरीज असतात. शिवाय त्यात कार्बोहायड्रेट्सचं प्रमाणही खूप जास्त असतं.

"ती तर माझ्यापेक्षा खूपच जास्त....", बघा ऐश्वर्याची लेक आराध्या बच्चनबाबत बोलताना काय म्हणाली नव्या नवेली 

शिवाय तंदुरी रोटी ही मैद्यापासून तयार केलेली असते. मैदा पचायला आधीच खूप जड असतो. शिवाय तंदुरी रोटी करण्यासाठी जे पीठ मळतात त्यामध्ये तेलाचा खूप जास्त वापर केला जातो. त्यामुळे मैदा आणि फॅट्स असे दोन्ही पदार्थ एकाचवेळी भरपूर प्रमाणात आपल्या पोटात जातात. यातूनच अनेकांना अपचन, बद्धकोष्ठता असा त्रास होतो.

 

तंदुरी रोटी जास्त प्रमाणात खाल्ल्याने मधुमेहाचा धोकाही निर्माण होतो. कारण त्यातला मैदा जेव्हा आपण खातो, तेव्हा रक्तातील साखरेची पातळी लगेचच वाढते. 

वजन, शुगर वाढेल म्हणून आंबा खात नसाल तर अमेरिकन डायबेटिक असोसिशनचा हा सल्ला वाचाच....

रेस्टॉरंटमध्ये तयार होणारी तंदुरी रोटी भाजण्यासाठी कोळसा किंवा लाकडाचा वापर केला जातो. थेट भट्टीवर टाकून ती एका बाजुने भाजली जाते. याचा परिणाम हृदयाच्या आरोग्यावर होतो. 

 

Web Title: health tips side effects of eating tandoori roti in hotel, why to avoid eating tandoori roti

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.