Lokmat Sakhi >Health > पौष्टिक आहेत म्हणून हे पदार्थ चुकीच्या पद्धतीने खाताय, ऐन हिवाळ्यात बिघडेल तब्येत- वाढेल खर्च!

पौष्टिक आहेत म्हणून हे पदार्थ चुकीच्या पद्धतीने खाताय, ऐन हिवाळ्यात बिघडेल तब्येत- वाढेल खर्च!

Healthy Foods That Are Unsafe To Eat Directly : 3 Healthy Foods That Are Unsafe To Eat Directly : डाएटिशियन सांगत आहेत पौष्टिक पदार्थ कोणत्या पद्धतीने खावेत...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 15, 2024 04:40 PM2024-11-15T16:40:39+5:302024-11-15T16:45:45+5:30

Healthy Foods That Are Unsafe To Eat Directly : 3 Healthy Foods That Are Unsafe To Eat Directly : डाएटिशियन सांगत आहेत पौष्टिक पदार्थ कोणत्या पद्धतीने खावेत...

Healthy Foods That Are Unsafe To Eat Directly 3 Healthy Foods That Are Unsafe To Eat Directly | पौष्टिक आहेत म्हणून हे पदार्थ चुकीच्या पद्धतीने खाताय, ऐन हिवाळ्यात बिघडेल तब्येत- वाढेल खर्च!

पौष्टिक आहेत म्हणून हे पदार्थ चुकीच्या पद्धतीने खाताय, ऐन हिवाळ्यात बिघडेल तब्येत- वाढेल खर्च!

पौष्टिक आणि सकस आहार घेणे आपल्या चांगल्या आरोग्यासाठी गरजेचे असते. आपले आरोग्य आणि शरीर सुदृढ राहावे यासाठी आपण आवश्यक तो पोषक आहार घेतो. आपल्या चांगल्या तब्येतीसाठी हेल्दी पदार्थ खाणे गरजेचे आहे परंतु त्याचबरोबर हे पदार्थ कोणत्या पद्धतीने खावेत, हे देखील तितकेच महत्वाचे आहे. आपल्या शरीराला आवश्यक असणारे सगळे महत्वाचे पोषक घटक पौष्टिक आणि हेल्दी पदार्थांतून मिळतात. त्यामुळे असे पदार्थ खाण्यावर आपला अधिक भर असतो(3 Healthy Foods That Are Unsafe To Eat Directly).

या पदार्थांमध्ये वेगवेगळ्या प्रकारची फळे, भाज्या आणि कडधान्यांचा समावेश होतो. परंतु हे पदार्थ हेल्दी, पौष्टिक म्हणून ते कसेही खाणे योग्य नाही. असे पदार्थ खाताना आपल्याला ते योग्य पद्धतीनेच खाणे गरजेचे असते. हे पौष्टिक पदार्थ आरोग्य व शरीरासाठी आवश्यक तर असतात परंतु ते चुकीच्या पद्धतीने खाल्ल्यास आपले आरोग्य देखील बिघडू शकते. काही असे पौष्टिक पदार्थ जर आपण थेट खाल्ले तर त्यांचा आपल्या आरोग्याला फायदा होण्याऐवजी नुकसानच होते. त्यामुळे हे पौष्टिक पदार्थ नेमके कोणते ? आणि ते कसे खावेत? याबाबत अधिक माहिती घेऊयात. डाएटिशियन रमिता कौर यांनी इंस्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर करत आरोग्याला आवश्यक असणारे पौष्टिक पदार्थ कोणत्या पद्धतीने खावेत याबाबत सविस्तर माहिती सांगितली आहे(Healthy Foods That Are Unsafe To Eat Directly).

कोणते पौष्टिक पदार्थ थेट न खाता - खावेत या पद्धतीने... 

१. पालक रस :- पालक आपल्या नेहमीच्या जेवणात खातोच. पण काहीजण हेल्दी म्हणून पालकाच्या पानांचा रस देखील पितात. परंतु पालकाच्या पानांचा रस प्यायला तर ते तुमच्या शरीराला आवश्यक पोषक तत्वे शोषून घेण्यापासून रोखतात, म्हणूनच कच्च्या पालकाच्या पानांचा थेट रस न पिता सर्वातआधी पालकांना हलकेच उकळवा आणि नंतर ते मिक्सरमध्ये वाटून घ्यावे. यामुळे त्यांची पौष्टिक गुणवत्ता सुधारेल आणि त्यातील महत्वाची आवश्यक ती पोषक तत्वे शरीर  सहजपणे शोषून घेईल. यामुळे जर तुम्हाला पालक खायचाच असेल तर तो अधिक उकडवून घ्यावा आणि मगच तो खावा. 

थंडीत प्रोटीन पावडरी विकत आणताय? ‘हे’ ३ शाकाहारी पदार्थ खा, भरपूर नैसर्गिक प्रोटीन स्वस्तात मस्त...

२. कच्ची कडधान्य :-  कडधान्य पौष्टिक म्हणून जर तुम्ही ती कच्चीच खात असाल तर हे चुकीचे आहे. कच्ची कडधान्य वारंवार खाल्ल्यांस आपल्याला पचनासंबंधित अनेक समस्या निर्माण होऊ शकतात. कडधान्य खाताना त्यांना हलकेच वाफ देऊन ती उकडवून खावीत. यामुळे ही कडधान्य सहजपणे पचवणे सोपे जाते. परिणामी, पचनासंबंधिचे अनेक प्रॉब्लेम्स दूर होतात. 

३. अ‍ॅप्पल सायडर व्हिनेगर :- आजकाल भरपूर लोक अ‍ॅप्पल सायडर व्हिनेगर हेल्दी म्हणून पितात. वजन कमी करण्यासाठी अ‍ॅप्पल सायडर व्हिनेगर प्यायले जाते. परंतु जर तुम्ही ते थेट पीत असाल तर ते तुमच्या आतड्यांना हानी पोहोचवू शकते. एवढंच नाही तर दातांवरील एनॅमलच्या थराचे देखील नुकसान होऊ शकते. यासाठी अ‍ॅप्पल सायडर व्हिनेगर पिताना ते थेट न पिता पाण्यांत मिक्स करूनच प्यावे. त्याचबरोबर अ‍ॅप्पल सायडर व्हिनेगर पिताना स्ट्रॉचा वापर करावा यामुळे दातांचे संरक्षण होऊन आतड्यांवर देखील फायदेशीर परिणाम करेल.

विद्या बालनने केलेलं 'अँटी इंफ्लेमेटरी' डाएट नेमकं काय? काय खाल्लं म्हणून उतरलं वजन सरसर...

४. भरड धान्यांची चपाती :- आजकाल हेल्दी म्हणून किंवा वजन कमी करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या भरड धान्यांपासून तयार करण्यात आलेली चपाती खाल्ली जाते. या भरड धान्यांमध्ये ज्वारी, बाजरी, नाचणी यांसारख्या धान्यांचा समावेश होतो. परंतु या भरड धान्यांमध्ये ग्लूटेन आणि फायबरचे प्रमाण अधिक असते. यामुळे ही भरड धान्य पचनाला थोडी जड असतात, यामुळे आपल्याला गॅसेसचा त्रास देखील होऊ शकतो. यामुळे भरड धान्यांची चपाती खाताना नेहमी त्यावर तूप लावून मगच खावे. तूप लावल्याने असे पदार्थ सहजपणे पचण्यास मदत होते आणि ते खाताना देखील त्यांची चव अधिक चांगली लागते.


Web Title: Healthy Foods That Are Unsafe To Eat Directly 3 Healthy Foods That Are Unsafe To Eat Directly

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.