Lokmat Sakhi >Health > High bp control tips : अचानक BP हाय होतो?  ५ उपाय, कायमचा दूर होईल बीपीचा त्रास, राहाल ठणठणीत

High bp control tips : अचानक BP हाय होतो?  ५ उपाय, कायमचा दूर होईल बीपीचा त्रास, राहाल ठणठणीत

High BP control tips : दररोज 10 ते 15 मिनिटे व्यायाम करून तुम्ही उच्च रक्तदाबाचा धोका कमी करू शकता.

By ऑनलाइन लोकमत | Published: November 18, 2022 11:17 AM2022-11-18T11:17:04+5:302022-11-18T11:30:36+5:30

High BP control tips : दररोज 10 ते 15 मिनिटे व्यायाम करून तुम्ही उच्च रक्तदाबाचा धोका कमी करू शकता.

High BP control tips : Blood pressure control food : Cardiologist shared 5 easy tips to lower blood pressure naturally | High bp control tips : अचानक BP हाय होतो?  ५ उपाय, कायमचा दूर होईल बीपीचा त्रास, राहाल ठणठणीत

High bp control tips : अचानक BP हाय होतो?  ५ उपाय, कायमचा दूर होईल बीपीचा त्रास, राहाल ठणठणीत

बीपीचे  त्रास आजकाल फक्त वयस्कर लोकांनाच नाही तर तरूणांनाही उद्भवत  आहेत. भारतातील प्रत्येक चौथा व्यक्ती उच्च रक्तदाबाच्या समस्येनं ग्रासलेला आहे. उच्च रक्तदाबाची समस्या हार्ट अटॅक, क्रोनिक किडनी डिसिज, डिमेंशिया सारख्या जीवघेण्या आजारांचा धोका वाढवते. (Cardiologist shared 5 easy tips to lower blood pressure naturally)

हृदयरोगतज्ज्ञ आणि सेंटर फॉर कार्डिओव्हस्कुलरचे संचालक आर. टॉड हर्स्ट  यांच्यामते, उच्च रक्तदाब ही एक गंभीर समस्या आहे. उच्च रक्तदाब नेहमीच उपचार करण्यायोग्य असतो, परंतु तरीही बहुतेक लोकांमध्ये त्याची पातळी अनियंत्रित राहते. उच्च रक्तदाब असलेल्या 50%-90% लोकांमध्ये, जीवनशैलीतील बदल आणि कमी खर्चिक औषधांनी देखील तो बरा होऊ शकतो. नैसर्गिकरित्या बीपी नियंत्रणात ठेवण्यासाठी कोणेते उपाय आहेत ते पाहूया. 

ब्लड प्रेशरची सामान्य रेंज काय आहे?

CDC च्या रिपोर्टनुसार, सामान्य बीपी 120/80 mmHg पेक्षा कमी आहे. 90/60 mmHg ते 120/80 mmHg मधील बीपी पातळी सर्वोत्तम मानली जाते. 140/90 mmHg पेक्षा जास्त BP पातळी उच्च रक्तदाब आहे आणि 90/60 mmHg किंवा त्यापेक्षा कमी BP पातळी कमी रक्तदाब मानली जाते.

 टेंशन फ्री, आनंदी आयुष्य जगण्याचं सोपं सिक्रेट; कितीही अडचणीत असाल तरी येणार नाही स्ट्रेस

नियमित व्यायाम

तज्ज्ञांचे म्हणणे आहे की थोड्याशा शारीरिक हालचालींमुळेही तुमच्या बीपीची पातळी बदलते. अशा स्थितीत दररोज 10 ते 15 मिनिटे व्यायाम करून तुम्ही उच्च रक्तदाबाचा धोका कमी करू शकता. लक्षात ठेवा की निरोगी राहण्यासाठी आठवड्यातून फक्त 2 तास 30 मिनिटे व्यायाम करणे आवश्यक आहे.

आहार चांगला घ्या

उच्च रक्तदाबापासून सुटका मिळवण्यासाठी तज्ज्ञांनी प्रथम प्रक्रिया केलेले अन्न, साखर आहारातून काढून टाकण्याची शिफारस केली आहे. ते म्हणतात की जर तुम्हाला उच्च रक्तदाब असेल तर तुमच्या मिठाच्या सेवनावरही नियंत्रण ठेवा. फक्त बाहेरचे खाल्ल्याने शरीरात मीठ आणि साखरेचे प्रमाण वाढते हे लक्षात ठेवा. फक्त घरी शिजवलेल्याच अन्नाचे सेवन करा.

वजन कमी करा

जर तुमचे वजन आवश्यकतेपेक्षा जास्त असेल तर बीपीचे औषध घेण्यापूर्वी शरीराचे वजन कमी करा. तज्ज्ञांचे म्हणणे आहे की वजन 5% कमी केल्याने देखील तुमचा रक्तदाब नियंत्रणात राहू शकतो.

मद्यपान

अलीकडील अभ्यासात असे दिसून आले आहे की जे लोक दर आठवड्याला 7-13 अल्कोहोलिक पेये घेतात त्यांना उच्च रक्तदाब होण्याची शक्यता 53% पर्यंत असते आणि जे दर आठवड्याला 14 पेये पितात त्यांना उच्च रक्तदाबाचा धोका 69% जास्त असतो.

श्रद्धासारखी वेळ येऊ देऊ नका; लोक काय म्हणतील...', एक्सपर्ट्सचा महत्वाचा सल्ला

धुम्रपान

धुम्रपान दारूपेक्षा जास्त हानिकारक आहे. अशावेळी धूम्रपान बंद केल्याने उच्च रक्तदाब कमी होतो तसेच हृदयाशी संबंधित आजारांचा धोकाही कमी होतो.

Web Title: High BP control tips : Blood pressure control food : Cardiologist shared 5 easy tips to lower blood pressure naturally

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.