Lokmat Sakhi >Health > स्टूलवर-खुर्चीवर उभं राहून उंचावरची वस्तू काढताना पडलात तर? करा ३ गोष्टी-हाडं मोडण्याचा धोका टाळा

स्टूलवर-खुर्चीवर उभं राहून उंचावरची वस्तू काढताना पडलात तर? करा ३ गोष्टी-हाडं मोडण्याचा धोका टाळा

home accident prevention : know how to avoid falling from the hight at home - सणावारांना माळ्यावरचे किंवा कपाटात वरच्या बाजुला असलेले सामान काढताना काळजी घ्यायला हवी, नाहीतर..(most common household accidents)

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 30, 2024 06:29 PM2024-09-30T18:29:14+5:302024-09-30T18:38:24+5:30

home accident prevention : know how to avoid falling from the hight at home - सणावारांना माळ्यावरचे किंवा कपाटात वरच्या बाजुला असलेले सामान काढताना काळजी घ्यायला हवी, नाहीतर..(most common household accidents)

home accident prevention : know how to avoid falling from the hight at home : What if you fall while removing something from a height while standing on a stool or chair? Do 3 things – Avoid the risk of breaking bones | स्टूलवर-खुर्चीवर उभं राहून उंचावरची वस्तू काढताना पडलात तर? करा ३ गोष्टी-हाडं मोडण्याचा धोका टाळा

स्टूलवर-खुर्चीवर उभं राहून उंचावरची वस्तू काढताना पडलात तर? करा ३ गोष्टी-हाडं मोडण्याचा धोका टाळा

सणावारांच्या वेळी वरती ठेवलेले डेकोरेशनचे सामान असो किंवा कधी एखादी साडी नाहीतर भांडी काढणे असो. माळ्यावरुन किंवा कपाटातील वरच्या बाजुला ठेवलेल्या गोष्टी काढण्यासाठी आपण स्टूल, खुर्ची किंवा शिडीवर चढतो. वस्तू थोडी मागे किंवा आणखी उंचीवर असेल तर नकळत आपण टाचा उचलतो आणि चवड्यावर येऊन वस्तू काढण्याचा प्रयत्न करतो. पण यामुळे काहीवेळा तोल जाण्याची शक्यता असते. असा तोल जाणे आपल्याला परवडणारे नसते (home accident prevention know how to avoid falling from the hight at home most common household accidents). 

कारण काम फार लहान असतं पण त्यामुळे आपण पडण्याची शक्यता असते. अनेकदा असे अपघात घडल्याने हाता-पायाला फ्रॅक्चर होऊ शकते. इतकेच नाही तर काहीवेळा अशा प्रसंगात डोक्याला मारही लागू शकतो. त्यामुळे वरती चढून काही काढायचे असेल तर विशेष काळजी घ्यायला हवी. महिला घाईगडबडीत अशी कामे करायला जातात आणि तोल गेल्याने अपघात घडतात. हे अपघात बरेचदा गंभीरही असू शकतात. मग अशावेळी नेमकी काय काळजी घ्यावी याविषयी... 

(Image : Google)
(Image : Google)

१. मदत घ्यायला हवी

एकतर वस्तू जास्त उंचावर असेल आणि आपल्याला ती काढणे शक्य नसेल तर सरळ थांबावे. घरात कामाला येणारे मदतनीस, घरातील इतर सदस्य यांची मदत घ्यायला हवी. ते शक्य नसेल तर आपण वर चढताना किमान घरातील कोणाला आपल्या मागे, आजुबाजूला उभे राहण्यास सांगावे. यामुळे चुकून तोल गेलाच तरी बाजूला कोणीतरी असल्याने अपघात होण्यापासून आपण वाचू शकतो. 

२. साधने चांगली हवीत

वरच्या बाजुची वस्तू काढण्यासाठी शक्यतो चांगल्या प्रकारच्या शिडीचा उपयोग करावा. ती नसेल तर चांगला दणकट स्टूल वापरावा. घाईघाईत खुर्ची, एखाद्या कठड्यावर चढणे असे उपाय केले जातात. पण त्यामुळे तोल जाण्याची शक्यता जास्त असते. तसेच या गोष्टींची नियमित डागडुजी करुन घ्यायला हवी. त्यामुळे पडण्याची शक्यता कमी होते. 

(Image : Google)
(Image : Google)

३. पडलोच तर

सगळी काळजी घेऊनही आपला तोल गेलाच तर मात्र झटपट उठण्याचा अट्टाहास करु नये. कारण एखादवेळी अशाप्रकारे पटकन हालचाल केल्याने दुखणे बळावण्याचीच शक्यता जास्त असते. शांतपणे उठण्याचा प्रयत्न करावा आणि घरात शक्य असतील ते प्रथमोपचार करुन डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. कारण लागलेला भाग तेव्हा दुखत नसला तरी नंतर मुकामार लागलेले ठिकाण दुखू शकते. एखादवेळी मार जास्त लागला असेल तर रक्ताची गाठ होण्याची शक्यता असते. डोक्यावर मार लागला तर ते दुखणे काही काळाने उद्भवते. म्हणून वेळच्या वेळी योग्य त्या उपाययोजना केलेल्या केव्हाही जास्त चांगल्या. 
  
 

Web Title: home accident prevention : know how to avoid falling from the hight at home : What if you fall while removing something from a height while standing on a stool or chair? Do 3 things – Avoid the risk of breaking bones

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.