काही लोकांना कामानिमित्त नेहमी बाहेरगावी फिरावं लागतं. त्यामुळे सतत बाहेरचं जेवण घ्यावं लागतं. बऱ्याचदा आपण आवडतं म्हणून किंवा रोजच्या जेवणात काही तरी चेंज म्हणून बाहेरचे पदार्थ मागवतो किंवा बाहेर जाऊन खाऊन येतो. म्हणजेच काय तर काही ना काही निमित्ताने बऱ्याचदा बाहेरचं जेवण होतंच. काही जणांना ते पचतं तर काही जणांना लगेचच पोटाचा त्रास होतो. पोट बिघडतं किंवा ॲसिडिटी होते. असा त्रास होत असेल तर काय उपाय करावा, याचा एक अगदी सोपा उपाय अभिनेत्री भाग्यश्री हिने सोशल मिडियावर शेअर केला आहे (Home remedies for acidity). भाग्यश्री नेहमीच सोशल मिडियावर ॲक्टीव्ह असते आणि चाहत्यांना दर आठवड्यात एक फिटनेसविषयक सल्ला देत असते (best solution for reducing acidity). आताही तिने दिलेला सल्ला ॲसिडिटीचा त्रास कमी करण्यासाठी अतिशय उपयुक्त असून करायला अगदीच सोपा आहे.(How to eat curd for getting rid of acidity)
ॲसिटीडिचा त्रास कमी करण्यासाठी उपाय
ॲसिडिटीचा त्रास कमी करण्यासाठी अभिनेत्री भाग्यश्री हिने जो उपाय सांगितला आहे, तो उपाय म्हणजे दररोज वाटीभर दही खाणे. फक्त ते दही ताजं असावं, एवढी काळजी मात्र आवर्जून घ्या, असा सल्लाही तिने दिला आहे.
दह्याविषयी सांगताना भाग्यश्री म्हणते की दही प्री- बायोटिक फूड आहे. म्हणजेच दही खाल्ल्याने शरीरात चांगले बॅक्टेरिया तयार होतात, जे पचनक्रिया अधिक चांगली करण्यासाठी मदत करतात.
दह्यामध्ये असणाऱ्या कॅल्शियमचे पचन अधिक चांगले होते. त्यामुळे कॅल्शियमचा उत्तम स्त्रोत म्हणून दही ओळखले जाते.
झाडांना खत टाकायला वेळच नाही? फक्त एवढं १ काम करा- आपोआप खत मिळून झाडं राहतील सदाबहार
प्रोटीन आणि व्हिटॅमिन डी च्याबाबतीत दही अतिशय उत्तम आहे. त्यामुळे या दोन्ही गोष्टी मिळविण्यासाठी रोजच्या आहारात दही असावं.
भाग्यश्री सांगते की रोजच्या जेवणात दही खा किंवा दोन जेवणांच्यामध्ये स्नॅक्स म्हणून वाटीभर ताजं दही खाल्लं तरी चालतं.