साधारण तिशीनंतर बऱ्याच जणींच्या बाबतीत असं होतं की ओठ किंवा ओठाच्या आजुबाजुची त्वचा काळी पडत जाते. ओठांच्या कोपऱ्याकडचा भाग, ओठ आणि त्वचा जिथे एकत्र येतात तो भाग, हनुवटी अशा भागात त्वचा काळवंडण्याचं प्रमाण वाढतं. आता अशा प्रकारचं पिगमेंटेशन झालं की तो त्वचेशी संबंधित त्रास आहे, असं आपल्याला वाटतं. पण तसं नसतं. कारण बहुतांश केसेसमध्ये जर ओठांच्या आजुबाजुची त्वचा काळी पडली असेल तर त्याचा थेट संबंध तुमच्या आरोग्याशी असतो (home remedies for dark skin near lips). आरोग्याच्या कोणत्या तक्रारींमुळे ओठांच्या बाजुची त्वचा काळी पडते आणि त्यावर काय उपाय करावेत, याविषयी डॉक्टरांनी सांगितलेली ही खास माहिती... (reasons for dark lips and pigmentation around mouth)
ओठांच्या आजुबाजुची त्वचा का काळी पडते?
याविषयीचा एक व्हिडिओ डॉक्टरांनी dr.smita_peachtreeclinic या इन्स्टाग्राम पेजवर शेअर केला आहे. यामध्ये डॉक्टर सांगतात की खूप जास्त उन्हात गेल्यामुळे, तुम्ही वापरत असणाऱ्या एखाद्या कॉस्मेटिक्सची ॲलर्जी झाल्यामुळेही ओठांच्या आजुबाजुची त्वचा काळी पडू शकते.
केसांना कधी गुळाचं पाणी लावून पाहिलं का? बघा केसांच्या सगळ्या समस्यांवरचा रामबाण उपाय.....
पण असं काहीच तुमच्या बाबतीत झालेलं नसेल तर हार्मोनल इम्बॅलेन्स हे यामागचं सगळ्यात मुख्य कारण आहे. बहुतांश महिलांच्या बाबतीत ओठांच्या भोवतीची त्वचा काळी पडण्याचं प्रमुख कारण हार्मोन्सचे असंतुलन हेच असतं. त्यामुळे त्याकडे अजिबात दुर्लक्ष करू नये, लवकरच काही घरगुती उपाय सुरू करावेत, असं डॉक्टर सांगत आहेत.
ओठांच्या भोवतीची त्वचा काळवंडली असल्यास उपाय
१. चिया सीड्स किंवा सब्जाचे पाणी दररोज सकाळी नियमितपणे प्यावे. यामुळे हार्मोनल बॅलेन्स राखला जातो. शिवाय त्वचेचा पोत, आरोग्य सुधारण्यासही मदत होते.
घामामुळे अंगाला घाण वास येतो, परफ्यूम- डिओ लावूनही दुर्गंधी लपेना... ३ सोपे उपाय- राहाल फ्रेश
२. लिंबू पाणी पिणे हा देखील यावरचा एक उपाय आहे. लिंबामध्ये व्हिटॅमिन सी असतं. ते शरीरातील मेलॅनिनची निर्मिती नैसर्गिकपणे कमी करण्यास मदत करते.
३. जवसामध्ये ओमेगा थ्री ॲसिड चांगल्या प्रमाणात असते. त्यामुळे त्वचेसाठी, आरोग्यासाठी ते उत्तम असल्याने नियमितपणे खावे.
४. साखर, रिफाईंड कार्बोहायड्रेट असणारे पदार्थ, मैदा, पॅक फूड, प्रोसेस्ड फूड असे पदार्थ खाणे टाळावे.
५. सनस्क्रिनचा वापर नियमितपणे करावा.