पिवळ्या दातांमुळे फक्त सौंदर्यावरच परीणाम होत नाही तर तुमच्या हिरड्या आणि दातांशी संबंधित अनेक समस्या उद्भवतात. खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी, तोंडाची व्यवस्थित स्वच्छता न करणं यामुळे दातांवर पिवळा थर जमा होतो त्याला टार्टर असे म्हणतात. यामुळे पांढरेशुभ्र दिसणारे दात पिवळे दिसू लागतात. (Home Remedies for yellow teeth)
टार्टर स्वच्छ न केल्यास दात आणि हिरड्यांमध्ये साचून राहतात. यामुळे दात आणि हिरड्या कमकुवत होऊ लागतात. (How to whiten your teeth naturally) ही समस्या पायरिया, कॅव्हिटी, दातांमध्ये रक्त येणं, हिरड्यांमध्ये वेदना, सेंसिटिव्हीटी, तोंडातून दुर्गंध येणं याचं कारण ठरू शकते. एका दातासाठी जवळपास ४ ते ८ हजारांपर्यंत खर्च येतो. (5 Effective home remedies to get white teeth naturally) डॉक्टर कपिल त्यागी यांनी काही आयुर्वेदीक उपाय सांगितले आहेत. ज्यामुळे पिवळ्या दातांपासून सुटका मिळण्यास मदत होईल. (How to Get Rid of Yellow Teeth)
बाभूळ
दात स्वच्छ करण्यासाठी बाभूळाला एक प्रभावी आयुर्वेदीक जडी बूटी मानले जाते. आयुर्वेद बाभूळच्या फाद्यांना डिस्पोजेबल टुथब्रशच्या स्वरूपात वापरण्याचा सल्ला देते. यातील टॅनिन दात स्वच्छ करण्यास फायदेशीर ठरते.
तुळस
तुळशीच्या पानांना सुकवून त्याची पावडर बनवा आणि दातांना ब्रश करण्यासाठी याचा उपयोग करा. तुळशीची हिरवी पानं दातांना मजबूत करून त्यांना पांढरेशुभ्र बनवते. तुळस पायरिया सारख्या दातांच्या समस्यांवरही गुणकारी ठरते.
कडुलिंब
कडुलिंबाच्या पानांच्या पावडरीचा वापर आजही भारतात टूथपेस्टच्या स्वरूपात केला जातो. कडुलिंबाच्या तेलातही श्वासांचा दुर्गंध रोखणारे, दातांतील सुक्ष्मजीव नष्ट करणारे आणि दातांची घाण, कॅव्हिटीजशी लढणारे एंटीसेप्टीक गुण असतात.
त्रिफळा
मौखिक स्वच्छता ठेवण्यासाठी आणि दातांची स्वच्छता टिकवून ठेवण्यासाठी तुम्ही त्रिफळाचा वापर करू शकता. यासाठी त्रिफळा पाण्यात उकळून घ्या. पाणी अर्ध झाल्यानंतर गॅस बंद करा. पाणी थंड झाल्यानंतर या पाण्यानं गुळण्या करा.
दात स्वच्छ करण्याचे अन्य उपाय
१) तीळ किंवा नारळाच्या तेलानं ऑईल पुलिंग करा. एक झाकण तेल तोंडात ठेवून १५ ते २० मिनिटांपर्यंत तोंडात फिरवा आणि नंतर थुंका.
२) जीभ स्वच्छ करण्यासाठी टंग क्लिनरचा वापर करा.
३) रोज कमीत कमी दोन वेळा दात स्वच्छ घासा.
४) जेवल्यानंतर गुळण्या करायला विसरू नका.
५) व्हिटामीन सी युक्त फळं, स्ट्रोबेरी, अननस, टोमॅटो यांचे सेवन करा. व्हिटामीन सी दातांतील प्लाक काढून टाकण्यास मदत करेल.