दातांचा पिवळेपणा (Yellow Teeth) घालवण्यासाठी प्रत्येकजण प्रयत्न करत असतो. हसताना बोलताना आपले दात पांढरेशुभ्र, चमकदार दिसावेत असं प्रत्येकाला वाटतं. (Home Remedies for Yellow Teeth Whitening) कारण इतरांसमोर हसताना किंवा बोलताना पिवळे दात दिसले तर अघडल्यासारखं वाटतं. (Pivle dat pandhare honyasathi upay)
पिवळेपणा येऊ नये म्हणून अनेकजण सकाळी आणि रात्री असे दिवसातून २ वेळा दात घासतात पण इतकं करूनही अनेकदा दातांवर थर येतात आणि हिरड्याही काळ्या दिसू लागतात. दातांना चमकदार बनवण्यासाठी तुम्ही घरगुती उपाय करू शकता. (Home Remedies For Yellow Teeth)
जर दात पांढरेशुभ्र असतील तर पर्सनॅलिटीसुद्धा चांगली दिसते. दातांवर जमा झालेला पिवळा थर म्हणजेच कॅव्हिटीज काढून टाकण्यासाठी तुम्ही काही सोपे उपाय करू शकता. दातांमध्ये कॅव्हिटीबरोबरच दुर्गंधही येतो. अशावेळी नैसर्गिक उपाय तुमचं काम अधिक सोपं करतील. ज्यामुळे दातांचा दुर्गंध येणार नाही. (Pivle dat pandhare kase karayche)
पिवळेपणा घालवण्यासाठी कडुलिंब एक सोपा उपाय
दातांचा पिवळेपणा घालवण्यासााठी कडुलिंबाच्या पानांचा वापर एक सोपा उपाय आहे. कडुलिंब तुमच्या दातांना चमकदार बनवते. यात सूजविरोधी, एंटी फंगल, जिवाणूविरोधी गुण असतात. पिवळ्या दातांवर तुम्ही हा उपाय करून पांढरेशुभ्र चमकदार दात मिळवू शकता.
पोट कमी करायचं-व्यायामासाठी वेळ नाही? ५ मिनिटं भिंतीला पाय लावा-झरझर घटेल चरबी
कडुलिंबाची पानं कशी वापरावीत
कडवट चवीची कडुलिंबाची पानं दातांमधील प्लाक आणि टार्टर काढून टाकण्यास मदत करतात. जे दुर्गंधीचे कारण ठरतात. कडूलिंबाच्या पानांनी तुम्ही ब्रशही करू शकता.
कडूलिंबाच्या काड्या
हेल्दी दातांसाठी तुम्ही कडुलिंबाच्या काड्या चावू शकता. यामुळे दातांना रोगांशी लढण्यास मदत होते. कॅव्हिटीज तयार होण्यापासून रोखता येतं. याशिवाय दात चमकदारही राहतात.
नारळाच्या शेंड्या टाकून देता? ५ भन्नाट फायदे, पिकलेले केसही होतील काळेभोर-पूर्ण पैसे वसूल
कडूलिंबांच्या फांद्या
भारतात वापरल्या जाणाऱ्या सर्वात पुरातन उपायांपैकी एक हा उपाय आहे. हिरड्यांच्या समस्या दूर करण्यासाठी आणि दातांचा रंग पांढरा राहण्यासाठी तुम्ही कडुलिंबाच्या फांद्याचा वापर करू शकता. या काड्या तुम्हाला जवळच्या मेडिकल स्टोअरमध्ये उपलब्ध होतील.
कडूलिंबाची पावडर
कडुलिंबाची पावडर कडुलिंब वाटून तयार केली जाते. ही पेस्ट बनवण्यासाठी तुम्हाला १ चमचा कडुलिंबाच्या पावडरमध्ये १ चमचा बेकींग सोडा आणि पाणी मिसळावे लागेल. यामुळे दात , चमकदार आणि सुंदर दिसतील.