Lokmat Sakhi >Health > हिवाळ्यात १० मिनिटांत करा आंघोळ, जास्त वेळ लागला तर रक्तप्रवाहात अडथळे, डॉक्टर सांगतात..

हिवाळ्यात १० मिनिटांत करा आंघोळ, जास्त वेळ लागला तर रक्तप्रवाहात अडथळे, डॉक्टर सांगतात..

Hot Water Bath Vs Cold Water Bath - Ayurveda : हिवाळ्यात अनेकांना आंघोळीचाच कंटाळा येतो पण गरम पाण्यानं आंघोळही सुखावह वाटते, मात्र आंघोळ किती वेळ कराल?

By भाग्यश्री कांबळे | Published: December 23, 2023 02:25 PM2023-12-23T14:25:38+5:302023-12-23T14:26:26+5:30

Hot Water Bath Vs Cold Water Bath - Ayurveda : हिवाळ्यात अनेकांना आंघोळीचाच कंटाळा येतो पण गरम पाण्यानं आंघोळही सुखावह वाटते, मात्र आंघोळ किती वेळ कराल?

Hot Water Bath Vs Cold Water Bath - Ayurveda | हिवाळ्यात १० मिनिटांत करा आंघोळ, जास्त वेळ लागला तर रक्तप्रवाहात अडथळे, डॉक्टर सांगतात..

हिवाळ्यात १० मिनिटांत करा आंघोळ, जास्त वेळ लागला तर रक्तप्रवाहात अडथळे, डॉक्टर सांगतात..

भाग्यश्री कांबळे

नित्यनियमाने सकाळी आपण प्रत्येक जण आंघोळ करतो. आंघोळ केल्याने आपले मन आणि शरीर दोन्ही शुद्ध होते. काही जण एक वेळ आंघोळ करतात. तर, काही जण दिवसातून दोन वेळा आंघोळ करतात. तर, काही बाथरूम सिंगर्स तासंतास बाथरूममध्ये बसून आंघोळ करतात. आंघोळ करण्याचे अनेक फायदे आहेत.

स्किनच्या स्वच्छतेसाठी एक वेळ आंघोळ करणं गरजेचं आहे. पण दोन वेळा केल्यास किंवा जास्त वेळ करत बसल्यास, त्याचे दुष्परिणाम आरोग्य आणि स्किनला भोगावे लागते. त्यामुळे आंघोळ नेमकी थंड पाण्याने करावी की गरम? आंघोळ दिवसातून किती वेळा करावी? आंघोळ किती वेळात आटोपवावी?(Hot Water Bath Vs Cold Water Bath - Ayurveda).

हिवाळ्यात गरम पाण्याने आंघोळ करावी की थंड?

लोकमत सखीला यासंदर्भातील माहिती देताना एमडी आयुर्वेदीक डॉक्टर राजश्री कुलकर्णी सांगतात, 'भारताचे तापमान हे उष्ण असते. शिवाय आपल्या शरीराला आंघोळ करण्यासाठी कोमट पाण्याची गरज असते. कारण आपल्या शरीराच्या तापमानानुसार कोमट पाण्याने आंघोळ करणे योग्य ठरते. यामुळे ब्लड सर्क्युलेशन सुधारते. जर बाराही महिने थंड पाण्याने आंघोळ केली तर, रक्तवाहिन्या रक्तवाहिन्या आकुंचन पावतात. जे आरोग्याच्या दृष्टीने योग्य नाही.

रोज ड्रायफ्रुट्स खाल्ल्याने आजार पळतात की छळतात? वजनही वाढते? कधी -किती सुकामेवा खावा?

आंघोळ किती मिनिटांत आटोपणं योग्य?

आंघोळ करण्यासाठी १० मिनिटं पुरेशी आहेत. शरीराची स्वच्छता करण्यासाठी जास्त वेळ घेण्याची गरज नाही. आंघोळ करताना हृदयाजवळ कमी पण हाता-पायाजवळचे रक्ताभिसरण फ्लोमध्ये सुरु असते. शिवाय खूप वेळ उभं राहून आंघोळ केल्याने मेंदूकडचा रक्तप्रवाह मंदावतो. खरंतर ज्यांना ब्लड प्रेशरचा त्रास आहे, त्यांनी अधिक वेळ आंघोळ करत बसू नये. यामुळे त्यांना बाथरूममध्ये चक्कर येऊ शकते. शिवाय आंघोळ करताना नेहमी इंडियन पद्धतीने बसून करावी. यामुळे रक्ताभिसरण सुधारते.

अधिक वेळ आंघोळ करत बसल्याने रक्तप्रवाहात अडथळे येतात का?

अधिक वेळ आंघोळ करत बसल्याने रक्ताभिसरणचा फ्लो बिघडू शकते. जर ब्लड सर्क्युलेशनमध्ये अडथळे आलेत तर, याचा थेट दुष्परिणाम हृदय आणि स्किनवर होते. मुख्य म्हणजे हृदयाशी संबंधित समस्यांचा धोका वाढतो. त्यामुळे बऱ्याचदा सूजही निर्माण होते.

जास्त वेळ आंघोळ केल्याने त्वचेतील आवश्यक तेल निघते का?

आपण स्किनवर कोणत्या प्रकारचा साबण लावताय? यावर तुमची स्किन ड्राय होईल की मुलायम राहील हे अवलंबून असते. उन्हाळ्यात ज्याप्रमाणे घाम येऊन आपली त्वचा ओलसर राहते. हेल्दी ओईल त्वचेवर पसरते. तसे हिवाळ्यात होत नाही. हिवाळ्यात त्वचा कोरडी राहते. जास्त घाम येत नाही. त्यामुळे केमिकल प्रॉडक्ट्सचा वापर न करता, नैसर्गिक गोष्टींचा वापर करावा. दिवाळीत आपण अभ्यंगस्नान करतो. आयुर्वेदिक पद्धतीने अभ्यंगस्नान केल्याने याचा फायदा त्वचेला होतो. यामुळे त्वचेतील नैसर्गिक तेल निघत नाही, व हे अभ्यंगस्नान किमान मकर संक्रातीपर्यंत करावे.

गव्हाची पोळी पचत नाही? पोट डब्ब होते, कणिक भिजवताना मिसळा ‘ही’ एक गोष्ट

हिवाळ्यात आंघोळ करण्याची योग्य वेळ कोणती?

भारतातील तापमान इतर देशाच्या तुलनेत सामान्य असते. त्यामुळे आंघोळ करणे हे सकाळीच करण्याची विधी आहे. आयुर्वेदानुसार सकाळी उठल्यानंतर शरीराचं चिंतन करा. नंतर युरीनेशन, शौचास जाणे, नंतर ब्रश आणि व्यायाम केल्यानंतर आंघोळ करायला हवे.

थंडीत रक्तदाब वाढते का? यासाठी जेवणातील मिठाचे प्रमाण कमी करावे का?

ज्यांना ब्लड प्रेशरचा त्रास आहे, त्यांनी आहारात मिठाचे प्रमाण कमी करावे. कारण मिठात सोडियमचे प्रमाण जास्त असते. यामुळे रक्तवाहिन्यांमधील दाब वाढते. हिवाळ्यात सर्वसाधारण प्रत्येकाचे रक्तदाब वाढते. कारण या काळात रक्तवाहिन्या आकुंचित पावतात, ज्यामुळे ब्लड सर्क्युलेशनचा फ्लो हळूवार सुरु असते. त्यामुळे ज्यांना ब्लड प्रेशरचा त्रास नाही, त्यांनी आहारात मिठाचे प्रमाण कमी केले नाही तरी चालेल. पण अतिप्रमाणात मीठ खाऊ नये.

Web Title: Hot Water Bath Vs Cold Water Bath - Ayurveda

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.