Lokmat Sakhi >Health > हिवाळ्यात का वाढतो हार्ट ॲटॅकचा धोका? थंडी वाढली म्हणून घराबाहेरच न जाणं धोक्याचं कारण..

हिवाळ्यात का वाढतो हार्ट ॲटॅकचा धोका? थंडी वाढली म्हणून घराबाहेरच न जाणं धोक्याचं कारण..

How does cold weather affect your heart? : थंडीत हार्ट ॲटॅकचा त्रास वाढतो, असं अभ्यास सांगतात, काय काळजी घ्याल?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 12, 2024 05:48 PM2024-11-12T17:48:43+5:302024-11-12T17:49:49+5:30

How does cold weather affect your heart? : थंडीत हार्ट ॲटॅकचा त्रास वाढतो, असं अभ्यास सांगतात, काय काळजी घ्याल?

How does cold weather affect your heart? | हिवाळ्यात का वाढतो हार्ट ॲटॅकचा धोका? थंडी वाढली म्हणून घराबाहेरच न जाणं धोक्याचं कारण..

हिवाळ्यात का वाढतो हार्ट ॲटॅकचा धोका? थंडी वाढली म्हणून घराबाहेरच न जाणं धोक्याचं कारण..

दिवाळी सरली, हिवाळ्याचा (Winter Care Tips) थंडगार ऋतूही सुरु झाला. हा सिझन आरोग्यासाठी फायदेशीर मानला जातो (Health Tips). मात्र, जे लोक व्यायामाचा कंटाळा करतात, त्यांच्यासाठी घातक. आहार आणि व्यायामाकडे पुरेपूर लक्ष द्यायला हवे. पौष्टीक पदार्थांचे सेवन करायला हवे (Heart Health). कारण हिवाळ्यात इम्युनिटी कमी होते, आणि गंभीर आजारांचा धोकाही वाढतो. सर्दी - खोकला याव्यतिरिक्त हृदयरोगांचा धोकाही वाढतो.

कारण हिवाळ्यात जसजसं तापमान कमी होतं, शरीराचं तापमान कंट्रोल करण्यासाठी हृदयाला जास्त मेहनत घ्यावी लागते. हिवाळा हृदयरोगांसाठी का घातक आहे? याची माहिती डॉ बिमल छाजेड यांनी एनबीटीला दिली आहे(How does cold weather affect your heart?).

हिवाळ्यात हार्ट अटॅकचा धोका का वाढतो?

हिवाळ्यात अधिक करून बॉडी टेम्प्रेचर कमी होतं. यामुळे सिम्पेथेटिक नर्वस सिस्टम अॅक्टिव होतं आणि कॅटेकोलामाइनचा स्त्राव वाढू शकतो. अशा स्थितीत रक्तवाहिन्या आकुंचन पावतात. आणि हृदयरोगाचा धोका वाढतो.

कपाळावर काळेपणा - मुरुमांचे डाग निघतच नाहीत? दुधात १ गोष्ट कालवून लावा; त्वचेवर येईल नैसर्गिक चमक

थंडीत हृदयविकाराचा धोका वाढतो

ब्रिटिश हार्ट फाउंडेशनच्या मते, 'थंड हवामानामुळे हृदय आणि रक्ताभिसरणाच्या समस्यांचा धोका वाढतो. ज्यामुळे हृदयविकाराचा झटका आणि स्ट्रोकची अधिक प्रकरणे दिसू शकतात. यासह रक्तवाहिन्या आकुंचन पावतात. आणि कमजोर होतात. ज्यामुळे ब्लड सर्क्युलेशन योग्यरित्या होत नाही.

पाण्यावर तुळशीची रांगोळी काढण्याची हटके ट्रिक, ५ मिनिटांत रांगोळी काढा; शेजारचेही विचारतील सिक्रेट

हृदयरोग्यांसाठी सर्वोत्तम तापमान

डॉ. बिमल छाजेड यांनी मुलाखतीत सांगितले की, वैद्यकीय शास्त्रानुसार २५ ते २७ अंश सेल्सिअस तापमान सामान्य किंवा हृदयाच्या रुग्णांसाठी असते. थंडी वाढली की बाहेरची कामे, बाहेर जाणे, भेटणे कमी होते. त्यामुळे शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य बिघडू शकते. यासह वजन वाढणे, हाय ब्लड प्रेशर, यांसारख्या गंभीर समस्या उद्भवू शकतात. यामुळे हृदयविकाराचा धोका वाढतो.

रक्तवाहिन्या आकुंचन पावत असल्यास काय करावे?

हिवाळ्यात शक्यतो सूर्यप्रकाश असताना चालावे. मॉर्निंग वॉक नेहमी रिकाम्या पोटी करावे. आपल्या आहारात सॅलडचा समावेश करावा. बाहेर जाणं टाळत असाल तर, योग किंवा व्यायाम करा. या गोष्टींची काळजी घेतल्यास रक्ताभिसरण वाढेल आणि शिरा आकसण्याचा धोका कमी होईल.

Web Title: How does cold weather affect your heart?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.