Lokmat Sakhi >Health > मासिक पाळीत रक्ताच्या गाठी जास्त? टेंशन घेऊ नका, डॉक्टर सांगतात मासिक पाळीत असं होतं कारण...

मासिक पाळीत रक्ताच्या गाठी जास्त? टेंशन घेऊ नका, डॉक्टर सांगतात मासिक पाळीत असं होतं कारण...

How Much Blood Clots During Period Is Normal : Period Blood Clots : Blood Clots During The Period Is It Normal : मासिक पाळीत ब्लड क्लॉट्स पडतात, पण नेमके इतके ब्लड क्लॉट्स पडणे आहे नॉर्मल डॉक्टर सांगतात....

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 20, 2024 05:53 PM2024-11-20T17:53:10+5:302024-11-20T18:08:16+5:30

How Much Blood Clots During Period Is Normal : Period Blood Clots : Blood Clots During The Period Is It Normal : मासिक पाळीत ब्लड क्लॉट्स पडतात, पण नेमके इतके ब्लड क्लॉट्स पडणे आहे नॉर्मल डॉक्टर सांगतात....

How Much Blood Clots During Period Is Normal Blood clots during menstruation Blood Clots During The Period Is It Normal | मासिक पाळीत रक्ताच्या गाठी जास्त? टेंशन घेऊ नका, डॉक्टर सांगतात मासिक पाळीत असं होतं कारण...

मासिक पाळीत रक्ताच्या गाठी जास्त? टेंशन घेऊ नका, डॉक्टर सांगतात मासिक पाळीत असं होतं कारण...

मासिक पाळी ही प्रत्येक महिन्यात येणारी एक नैसर्गिक प्रक्रिया आहे. सामान्यतः २८ ते ३० दिवसांनी महिलांच्या मासिक पाळीची सायकल रिपीट होत असते.  साधारणपणे मासिक पाळीत ५ ते ७ दिवस रक्तस्त्राव होतो. रक्तस्त्राव व्यवस्थित योग्य प्रमाणात होऊन मासिक पाळी दर महिन्याला येत असेल तर ती एक चांगली  गोष्ट आहे. परंतु काहीजणींना या दर महिन्याला येणाऱ्या पाळीचा फार त्रास असतो. बऱ्याच महिलांना मासिक पाळीदरम्यान पोटदुखी, पाठदुखी, वेदना होणे, रक्तस्त्राव जास्त किंवा कमी होणे, ब्लड क्लॉट्स (Period Blood Clots) पडणे अशा अनेक समस्यांचा सामना करावा लागतो(Blood Clots During The Period Is It Normal).

मासिक पाळी दरम्यान ब्लड क्लॉट्स पडणे ही एक सामान्य गोष्ट आहे. याला 'मेंन्स्ट्रुअल क्लॉट्स' असेही म्हणतात. मासिक पाळीत असे ब्लड क्लॉट्स पडू लागल्यास तीव्र वेदना देखील होतात. मासिक पाळी दरम्यान असे ब्लड क्लॉट्स पडणे योग्य आहे का? ते ब्लड क्लॉट्स कसे तयार होतात? किती ब्लड क्लॉट्स पडणे योग्य आहे, या सगळ्या विषयी अधिक माहिती घेऊयात. स्त्रीरोग आणि प्रसूती तज्ज्ञ अदिती बेदी यांनी हरजिंदगी या वेबसाईटला दिलेल्या माहितीनुसार, मासिक पाळी दरम्यान ब्लड क्लॉट्स पडणे योग्य की अयोग्य ते पाहूयात(How Much Blood Clots During Period Is Normal).

मासिक पाळीदम्यान ब्लड क्लॉट्स पडणे योग्य की अयोग्य... 

जेव्हा स्त्रीला मासिक पाळी येते तेव्हा गर्भाशयात जमा झालेले रक्त आणि ऊती यांची जेलसारखी गाठ तयार होते. यामुळे मासिक पाळी दरम्यान वेदना आणि भरपूर रक्तस्त्राव होण्याची शक्यता असते. मासिक पाळीदम्यान ब्लड क्लॉट्स तयार होणे किंवा पडणे धोकादायक नसते. जर तुम्हाला जास्त रक्तस्त्राव होत असेल जो सात दिवसांपेक्षा जास्त काळ टिकून राहत असेल तर लगेच डॉक्टरांशी संपर्क साधावा. 

तज्ज्ञांच्या मतानुसार, शरीरात इस्ट्रोजेनचे प्रमाण वाढल्यामुळे मासिक पाळीच्या काळात रक्तात जास्त ब्लड क्लॉट्स दिसतात. हे ब्लड क्लॉट्स अधूनमधून होणे सामान्य आहे. परंतु, जर हे ब्लड क्लॉट्स जास्तकरुन पिरीएड्स दरम्यान होत असतील तर त्याकडे दुर्लक्ष करू नका.

सॅनिटरी नॅपकिन्सचे विंग्स चिटकवण्याची पाहा योग्य पद्धत, पॅड हलणार नाही-डागही पडणार नाहीत...

मासिक पाळीत तयार होणारे ब्लड क्लॉट्स हे गोठलेल्या रक्ताप्रमाणे आणि जेलसारखे दिसतात. जर हे ब्लड क्लॉट्स लहान असतील तर काळजी करण्यासारखे काही कारण नाही. परंतु, जर हे मोठे असतील आणि मोठ्या संख्येने येत असतील तर आपण त्यांच्याकडे वेळीच लक्ष दिले पाहिजे.

पाळीत पोट दुखतं-क्रॅम्स येतात? सेलिब्रिटी फिटनेस ट्रेनर अंशुका परवानी सांगते ५ आसनं, त्रास कमी!

या रक्ताच्या गुठळ्या होण्यामागे थायरॉईड, व्हिटॅमिन-बी १२ आणि रक्ताची कमतरता असू शकते.

याशिवाय ओव्हेरियन सिस्ट, हार्मोनल असंतुलन, पीसीओएस आणि फायब्रॉइड्समुळेही महिलांना या समस्येचा सामना करावा लागतो.

Web Title: How Much Blood Clots During Period Is Normal Blood clots during menstruation Blood Clots During The Period Is It Normal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.