Lokmat Sakhi >Health > उपवास असेल तर नेमके किती पाणी प्यावे ? केव्हा प्यावे ? कमी पाणी प्यायले तर काय होते पाहा...

उपवास असेल तर नेमके किती पाणी प्यावे ? केव्हा प्यावे ? कमी पाणी प्यायले तर काय होते पाहा...

How much water should you drink during fasting time ? : नवरात्रीत ९ दिवस उपवास करणाऱ्यांनी पुरेशा प्रमाणात पाणी प्यावे, ज्यामुळे शरीरातील पाण्याची कमतरता होणार नाही, यासाठी नेमकं किती पाणी प्यावं ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 19, 2023 07:10 PM2023-10-19T19:10:47+5:302023-10-19T19:35:58+5:30

How much water should you drink during fasting time ? : नवरात्रीत ९ दिवस उपवास करणाऱ्यांनी पुरेशा प्रमाणात पाणी प्यावे, ज्यामुळे शरीरातील पाण्याची कमतरता होणार नाही, यासाठी नेमकं किती पाणी प्यावं ?

How Much Water to Drink When Fasting, How many glasses of water should you drink when fasting? | उपवास असेल तर नेमके किती पाणी प्यावे ? केव्हा प्यावे ? कमी पाणी प्यायले तर काय होते पाहा...

उपवास असेल तर नेमके किती पाणी प्यावे ? केव्हा प्यावे ? कमी पाणी प्यायले तर काय होते पाहा...

सध्या सगळीकडेच नवरात्रीचा सण अतिशय उत्साहात साजरा केला जात आहे. या सणात खास उपवासाला फार महत्व असते. आपल्यापैकी बरेचजण या सणाला उपवास करतात. प्रत्येकाची उपवास करण्याची पद्धत ही वेगळी असते. कुणी पहिले व शेवटचे दोन दिवस उपवास धरतात. तर कुणी संपूर्ण नऊ दिवस उपवास करतात. एवढेच नाही तर या संपूर्ण नऊ दिवसांत निर्जळी उपवास करणाऱ्यांची संख्या पण अधिक असते. उपवास करत (How Much Water to Drink When Fasting) असताना आपण आपली योग्य ती काळजी घेतली पाहिजे नाहीतर याचे वाईट परिणाम आपल्या आरोग्यावर दिसून येतात(How many glasses of water should you drink when fasting?).

'पाणी' हा सगळ्यात महत्वाचा घटक आहे. दिवसभरात योग्य प्रमाणात पाणी प्यायल्याने आपले आरोग्य चांगले राहण्यास मदत होते. एरवी तर आपण पाणी पितोच पण उपवासा दरम्यान देखील पाणी पिऊन स्वतःला हायड्रेटेड ठेवणे गरजेचे असते. जर उपवासा दरम्यान आपण योग्य प्रमाणांत पाणी प्यायला नाहीत तर आरोग्यावर त्याचे वाईट परिणाम दिसू शकतात. उपवासा दरम्यान पाणी (How Much Water Do You Need To Drink While Fasting?) न प्यायल्याने थकवा येणे, चक्कर येणे, डिहाड्रेशन होणे यांसारख्या समस्या निर्माण होऊ शकतात. एवढेच नाही तर पाण्याच्या कमतरतेकडे दुर्लक्ष केले तर काही काळानंतर (How Much Water Should I Drink While Fasting) तब्येत जास्तच बिघडू शकते. त्यामुळे उपवास करताना पुरेसे पाणी प्यावे. डायट एन क्युअरच्या आहारतज्ज्ञ आणि पोषणतज्ज्ञ दिव्या गांधी यांनी उपवासा दरम्यान किती पाणी प्यावे याचा योग्य सल्ला दिला आहे(How Much Water Do You Need To Drink While Fasting?).

उपवासादरम्यान नेमके किती पाणी प्यावे ? 

उपवासा दरम्यान शरीराला हायड्रेटेड ठेवण्यासाठी पुरेसे पाणी पिणे गरजेचे असते. प्रत्येकाला पाण्याची गरज ही त्याची शारीरिक क्रिया, हवामान, शारीरिक गरजा अशा अनेक घटकांवर अवलंबून असते. तसेच प्रत्येक व्यक्तीची पाण्याची गरज वेगवेगळी असू शकते. परंतु सामान्य मार्गदर्शक तत्त्वानुसार, उपवास करताना आपण दररोज किमान ८ ग्लास म्हणजेच अंदाजे २ लिटर पाणी प्यावे. योग्य प्रमाणात पाणी प्यायल्यामुळे हे तुम्हाला हायड्रेट ठेवण्यास मदत करते. याशिवाय त्वचेवर आणि आरोग्यावरही याचा चांगला परिणाम दिसून येतो.

नवरात्रीच्या उपवासादरम्यान असे करा डाएट, नऊ दिवसात कणभरही वजन वाढणार नाही...

उपवास करताना तब्येत बिघडू नये म्हणून कोणते मीठ खावे ? तज्ज्ञ सांगतात, मीठ खाणार असाल तर...

उपवासा दरम्यान पाणी पिण्याचे फायदे :- 

१. पाणी पिऊन हायड्रेटे रहा :- जसे आपण आधी सांगितले आहे की उपवासात शरीराला पाण्याची जास्त गरज असते. जर तुम्ही कमी प्रमाणात पाणी प्यायले तर ते शरीराला डिहायड्रेट करू शकते. त्यामुळे उपवासात पाणी पिण्याबाबत निष्काळजीपणा करू नये.

२. भूकेवर नियंत्रण राहते :- नवरात्रीच्या काळात उपवास करताना आपण उपवासाचे काही पचायला जड किंवा तेलकट पदार्थ खातो. त्यासोबतच काहीवेळा उपवास असताना अनेकदा आपल्याला जास्त भूक लागते. त्याचवेळी, जर तुम्ही उपवासात पुरेसे पाणी प्याल तर ते भूक नियंत्रित करणे सोपे जाते. 

नवरात्र स्पेशल : साबुदाण्याची खिचडी - वडे नकोसे वाटतात ? ट्राय करा उपवासाची मऊ, जाळीदार इडली, झटपट रेसिपी...

३. इलेक्ट्रोलाइटच्या पातळीचे  संतुलन राखले जाते :- जर तुम्ही उपवासात पुरेसे पाणी प्यायले नाही तर शरीरातील इलेक्ट्रोलाइट संतुलन बिघडू शकते . इलेक्ट्रोलाइटच्या कमतरतेमुळे थकवा आणि स्नायू क्रॅम्पसारख्या अनेक समस्या उद्भवू शकतात. पुरेशा प्रमाणात पाणी प्यायल्याने या समस्येपासून सुटका मिळू शकते. 

४. डिटॉक्सिफिकेशन करण्यास मदत मिळते :- पाणी शरीरातील विषारी पदार्थ काढून टाकण्यास मदत करते. जर तुम्ही उपवासा दरम्यान पुरेसे पाणी प्याल तर, शरीरातील विषारी पदार्थ हे शरीराबाहेर फेकले जाण्यास मदत मिळते. 

नवरात्रात उपवास करताना थकवा आला, गळाल्यासारखं झालं तर खा ५ पदार्थ, मिळेल इन्स्टंट एनर्जी...

५. पचनशक्ती सुधारते :- नवरात्रीत नऊ दिवस उपवास केल्याने शरीरात अनेक प्रकारच्या पोषक तत्वांची कमतरता भासू शकते. त्यात फायबरचाही समावेश आहे. मात्र, फळे पुरेशा प्रमाणात खाल्ल्यास त्याची कमतरता भरून निघू शकते. परंतु, तुम्ही असे न केल्यास तुम्हाला बद्धकोष्ठतेची समस्या होऊ शकते. त्याचबरोबर पाणी प्यायल्याने बद्धकोष्ठतेची समस्या दूर होऊ शकते.

६. वजन कमी करण्यात मदत होते :- उपवासामुळे शरीरातील कॅलरीजचे प्रमाण कमी होऊ लागते. त्यामुळे वजनही आपोआप कमी होऊ लागते. यासोबतच, जर तुम्ही पुरेशा प्रमाणात पाणी प्यायले तर ते चयापचय सुधारते, ज्यामुळे शरीरातील चरबी कमी होण्यास मदत होते.

Web Title: How Much Water to Drink When Fasting, How many glasses of water should you drink when fasting?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.