Lokmat Sakhi >Health > ऑनलाईन अभ्यासाचा पाठीवर भार, मुलांच्या मागे लागू शकतात कंबरदुखीसह हाडांचे आजार

ऑनलाईन अभ्यासाचा पाठीवर भार, मुलांच्या मागे लागू शकतात कंबरदुखीसह हाडांचे आजार

How to prevent children from back and neck pain : आता ऑनलाईन शिक्षण पद्धती जास्तवेळ सुरू राहू शकते. त्यामुळे मुलांनी बसण्याचे पोश्चर आणि लर्निंग एन्व्हायरमेण्टकडे लक्ष देणं गरजेचं आहे. 

By ऑनलाइन लोकमत | Published: June 24, 2021 04:25 PM2021-06-24T16:25:45+5:302021-06-24T17:07:08+5:30

How to prevent children from back and neck pain : आता ऑनलाईन शिक्षण पद्धती जास्तवेळ सुरू राहू शकते. त्यामुळे मुलांनी बसण्याचे पोश्चर आणि लर्निंग एन्व्हायरमेण्टकडे लक्ष देणं गरजेचं आहे. 

How to prevent children from back and neck pain during online classes | ऑनलाईन अभ्यासाचा पाठीवर भार, मुलांच्या मागे लागू शकतात कंबरदुखीसह हाडांचे आजार

ऑनलाईन अभ्यासाचा पाठीवर भार, मुलांच्या मागे लागू शकतात कंबरदुखीसह हाडांचे आजार

Highlights समस्या टाळण्यासाठी, खुर्चीवर बसण्यापूर्वी पाठीमागे एक उशी ठेवून बसा

पूर्वी मोठी माणसं कंम्प्यूटरवर तासन्तास खुर्चीवर बसून काम करत असायची. ज्यामुळे त्यांना मान आणि पाठीचा त्रास असलेला पाहायला मिळायचा. कोरोनाकाळात शाळा घरी आल्याने मुलं ऑनलाईनच सर्व काही शिकत आहे.  सतत एकाच जागी बसून लहान मुलांमध्ये पाठीचा, मानेचा त्रास उद्भवू शकतो. आता ऑनलाइन वर्गात सहभागी होत असलेली पाच वर्षांपर्यंतची मुलेदेखील पाठीच्या दुखण्याने पीडित आहेत. तरूण वयातील मुलांना स्पॉन्डिलायसिस सारख्या तीव्र समस्यांचा सामना करावा लागत आहे. तज्ज्ञांच्या  म्हणण्यानुसार तासन्तास ऑनलाईन क्लासमध्ये चुकीच्या पद्धतीने बसणे आणि शारीरिक हालचाली कमी केल्यामुळे मुलांमध्ये ही समस्या वाढू शकते. बराच वेळ स्क्रिन समोर बसून राहिल्यास मुलांमध्ये पाठीच्या कण्याची  समस्या उद्भवू शकते, ज्यामुळे पाठीचा कडकपणा, थकवा आणि आरोग्याच्या इतर समस्या उद्भवू शकतात. आता ऑनलाईन शिक्षण पद्धती जास्तेळ सुरू राहू शकते. त्यामुळे मुलांनी बसण्याचे पोश्चर आणि लर्निंग एन्व्हायरमेण्टकडे लक्ष देणं गरजेचं आहे. 

डेस्क  पोजिशन

कंम्प्यूटर ज्या डेस्कवर ठेवलेला आहे तो शाळेच्या वर्गासारखाच असावा. आपल्या मुलाला डेस्क वर वाचण्यासाठी  गॅझेटस देऊ नका. खुर्ची किंवा टेबलवर बसताना त्यांचे पाय संपूर्ण जमिनीला टेकलेले असावेत. स्क्रिन डोळ्यासमोर असावी. जेणेकरून जास्त वाकावं लागणार नाही. 

स्ट्रेचिंग ब्रेक घ्या

अनेक तास स्क्रिनसमोर बसणे आपल्या शरीरासाठी वाईट ठरू शकते. कारण यामुळे डोळे, मान आणि मागच्या स्नायूंवर अनावश्यक ताण पडतो. आपली मुलं तासनतास बसल्यामुळे शारीरिकदृष्या एक्टिव्ह राहणार नाहीत. म्हणून प्रत्येक लेक्चरनंतर ब्रेक असायला हवा. या वेळात मुलं एखाद्या खोलीत चालू शकतात किंवा हाता पायांची कवायत करू शकतात. तर कंम्प्यूटरवर काम करत असलेल्या व्यक्तीनं दर तासाला ५ ते  १० मिनिटांचा ब्रेक घ्यायला हवा. 

पाठीला आराम मिळायला हवा

लॅपटॉप किंवा मोबाईल समोर बसताना स्नायू आणि कमरेच्या भागात खूप दबाव असतो. यामुळे, बहुतेक मुलं चुकीच्या पद्धतीनं बसतात. यामुळे ते नंतर अडचणीत येतात. ही समस्या टाळण्यासाठी, खुर्चीवर बसण्यापूर्वी पाठीमागे एक उशी ठेवून बसा.

मोबाईलवर अभ्यास टाळा

लहान मुलांना शक्यतो कंम्प्यूटर, लॅपटॉपवरच अभ्यास करायला सांगा. मोबाईल आणि टॅबलेट्सची स्क्रीन लहान असते. त्यामुळे डोळ्यांचं मोठं नुकसान होऊ शकतं. तुमच्या मुलांचा अभ्यास चांगला व्हावा असं तुम्हाला वाटत असेल तर त्यासाठी चांगले वातावरण असणं फार महत्वाचं असतं. 

Web Title: How to prevent children from back and neck pain during online classes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.