Lokmat Sakhi >Health > मान आणि पाठ असह्य दुखते, तुमची उशी तपासा? ‘अशी’ उशी असेल तर दुखणं छळणारच...

मान आणि पाठ असह्य दुखते, तुमची उशी तपासा? ‘अशी’ उशी असेल तर दुखणं छळणारच...

how to choose right pillow for better neck spine health cervical pain : How to Choose the Right Pillow for Neck Pain : रात्री झोपताना उशी घेण्याची योग्य पद्धत तुम्हाला माहित आहे का ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 19, 2024 09:38 PM2024-10-19T21:38:28+5:302024-10-19T21:54:40+5:30

how to choose right pillow for better neck spine health cervical pain : How to Choose the Right Pillow for Neck Pain : रात्री झोपताना उशी घेण्याची योग्य पद्धत तुम्हाला माहित आहे का ?

How to Choose the Right Pillow for Neck Pain how to choose right pillow for better neck spine health cervical pain | मान आणि पाठ असह्य दुखते, तुमची उशी तपासा? ‘अशी’ उशी असेल तर दुखणं छळणारच...

मान आणि पाठ असह्य दुखते, तुमची उशी तपासा? ‘अशी’ उशी असेल तर दुखणं छळणारच...

रात्रीची झोप पुरेशी आणि व्यवस्थित होणे खूपच गरजेचे असते. प्रत्येकाच्या झोपण्याच्या सवयी या वेगवेगळ्या असतात. काहींना झोपताना चादर, उशी, गादी असं सगळं लागत, तर काहीजण विना उशी किंवा चादर न घेताच झोपतात. काहीजण उशी न घेताच झोपतात तर, उशीशिवाय काहींना झोपच लागत नाही. झोपताना उशी घेण्याची प्रत्येकाची पद्धत वेगळीच असते. झोपताना आपण काहीवेळा मानेखाली एक किंवा दोन उशा घेऊन झोपतो. उशी घेताना आपण ती नेहमीच योग्य पद्धतीने घेतोच असे नाही. काहीवेळा चुकीच्या (Pillow for neck and shoulder pain) पद्धतीने मानेखाली उशी घेतल्याने आपल्याला अनेक प्रकारच्या शारीरिक समस्या होऊ शकतात. एवढेच नव्हे तर काहीवेळा मानेचे आणि पाठीच्या कण्याचे गंभीर आजार देखील होऊ शकतात(How to Choose the Right Pillow for Neck Pain).

आपण उशी घेऊन झोपलो की शक्यतो ती आपल्या मान किंवा पाठीखाली रात्रभर तशीच असते. अशाप्रकारे उशी रात्रभर मानेखाली घेतल्याने चुकीच्या पद्धतीने घेतल्यास आपल्याला अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. लाला लजपत राय मेडिकल कॉलेजच्या न्यूरोलॉजी विभागाच्या प्रमुख डॉ. दीपिका सागर यांनी मानेखाली चुकीच्या पद्धतीने उशी घेतल्याने नेमके कोणत्या समस्यांचा सामना करावा लागतो याबद्दल अधिक माहिती दिली आहे(how to choose right pillow for better neck spine health cervical pain).

१. डॉ. दीपिका सागर यांच्या मते, चुकीच्या आकाराच्या आणि जास्त उंचीच्या उशा दीर्घकाळ वापरल्याने मानेच्या हाडांमध्ये सूज आणि वेदना होऊ शकतात. जर ही समस्या वाढत गेली, तर स्पॉन्डिलायटिस होऊ शकतो.

दिवाळी: पोटभर मिठाई खाल्ली तरी वजन वाढणार नाही, फक्त ३ टिप्स -मन मारायची गरजच नाही...

२. त्यांनी पुढे सांगितले की जर उशी खूप उंच असेल तर मान आणि खांद्यामध्ये योग्य प्रकारे संतुलन होत नाही, ज्यामुळे खांद्यामध्ये वेदना आणि कडकपणा येतो. याशिवाय चुकीच्या पद्धतीने उशी घेतल्याने रक्ताभिसरण देखील योग्य प्रकारे होत नाही, ज्यामुळे डोकेदुखी किंवा मायग्रेनची समस्या वाढू शकते. मानेमधील नसांवर ताण आणि कडकपणा आल्याने दिवसभर थकवा आणि वेदना होतात.

३. झोपताना उशी घेत असाल तर उशीची उंची जास्त किंवा खूप कमी नसावी. मान आणि पाठीचा कणा सरळ ठेवण्यासाठी, सुमारे सहा इंच उंचीची उशी वापरणे सर्वोत्तम उपाय आहे. पोटावर झोपताना उशीचा वापर करू नये, कारण त्यामुळे मानेवर जास्त ताण येतो.

४. उशी नेहमी मऊ आणि मुलायम असणाऱ्या मटेरियलपासून तयार केलेली असावी, याचबरोबर उशी आपल्या मानेनुसार फ्लेक्सिबल होणारी असावी. मेमरी फोम पासून तयार केलेल्या उशा मानेला योग्य आधार देतात आणि त्या योग्य आकाराच्याही असतात. दर ८ ते १२ महिन्यांनी उशी बदलणे आवश्यक असते, कारण जुनी उशी योग्य आकारात राहत नाही आणि त्यात बॅक्टेरिया देखील जमा होतात, जे आरोग्यासाठी हानिकारक असतात. 

सामोसा-गुलाबजाम खाल्ले भरपूर तर तेवढ्या कॅलरी जाळायला तुम्हाला किती चालावं लागेल, माहिती आहे?

५. बऱ्याच लोकांना उशीशिवाय झोपणे अधिक आरामदायक वाटते, परंतु ते तुमच्या सवयी आणि शारीरिक रचनेवर अवलंबून असते. जर तुमच्या मानेचा आकार योग्य असेल आणि तुम्हाला उशीशिवाय झोपणे आरामदायक वाटत असेल तर ते तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते.

Web Title: How to Choose the Right Pillow for Neck Pain how to choose right pillow for better neck spine health cervical pain

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.