दूध हा आपल्या रोजच्या डाएटमधील एक महत्वपूर्ण भाग मानला जातो. आपल्यापैकी बऱ्याचजणांना सकाळी नाश्त्याला किंवा रात्री झोपायच्या आधी दूध पिण्याची सवय असते. काहींना गरम दूध प्यायला आवडते तर काहींना थंड दूध आवडते. परंतु पावसाळयात आणि थंडीत थंड दूध प्यायल्याने आपल्याला कफ होण्याची समस्या उद्भवू शकते. त्यामुळे पावसाळ्यात नेमके दूध प्यावे की पिऊ नये असा प्रश्न आपल्याला पडतो. खरं पहायला गेलं तर पावसाळा हा संसर्गाचा ऋतू आहे. या काळात आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे संसर्ग होतात. त्यामुळे पावसाळ्यात आपल्याला आपल्या आरोग्याची विशेष काळजी घ्यावी लागते.
प्राचीन आयुर्वेदानुसार, पावसाळ्यात आपली रोगप्रतिकारकशक्ती व पाचनशक्ती ही तुलनेने कमी होते. त्यामुळे या काळात पोटासाठी पचायला हलके आणि उबदार अन्नपदार्थ खाण्याचा सल्ला दिला जातो. तसेच पावसाळ्यात आपल्या डाएटमध्ये उकडलेल्या भाज्या आणि सूपचा समावेश केला तर आपले आरोग्य चांगले राहून, पाचनशक्ती मजबूत होण्यास मदत मिळते. आयुर्वेद तज्ज्ञ डॉ.नितीका कोहली यांनी पावसाळयात दूध पिण्याची योग्य पद्धत सांगितली आहे. जेणेकरून पावसाळ्यातही दूध प्यायल्याने कफ होण्याची समस्या न उद्भवता आपली पाचनशक्ती व रोगप्रतिकारकशक्ती सुधारण्यात मदत होते(How To Consume Milk Correctly According To Ayurveda During Monsoon Season).
१. दुधात पाणी मिसळण्याचा सल्ला दिला जातो.
उन्हाळ्यात आपण फ्रिजमधून बाहेर काढलेले थंड दूध पिणे पसंत करतो. परंतु पावसाळयात वातावरणातील गारव्यामुळे पावसाळ्यात फ्रिजमधील थंड दूध पिण्याची ही सवय आपल्याला बदलावी लागते. पावसाळ्याच्या दिवसात दूध नेहमी कोमट प्यावे. दुधाची ताकद वाढवण्यासाठी आपण त्यात अनेक घरगुती मसाले घालून देखील पिऊ शकता. त्यामुळे पचनक्रिया सुरळीत राहते आणि रोगप्रतिकारशक्तीही मजबूत होते. डॉ.नितीका कोहली, सांगते की दुधात एक चतुर्थांश भाग पाणी मिसळले तर त्याचे औषधी गुणधर्मही वाढतात.
२. पावसाळ्यात दूध कसे प्यावे ?
पावसाळ्यात नेहमी गरम दूध प्या. हे पचनास मदत करते, पोषक तत्वांचे शोषण सुधारते आणि शरीराच्या एकूण आरोग्यासाठी मदत करते. दूध उकळताना त्यात एक चतुर्थांश पाणी घालून ते उकळावे. असे दूध शक्ती आणि पोषण देण्याबरोबरच अनेक विकारही दूर करण्याचे काम करते.
पावसाळी नव्या - कोऱ्या चपलांमुळे शु बाईट होते ? ७ सोपे उपाय, शु बाईट पासून मिळेल मुक्ती...
३. दुधात कोणकोणत्या प्रकारचे मसाले वापरु शकता ?
पावसाळ्याच्या दरम्यान दूध पिताना दुधात आपण वेलची, दालचिनी , हळद आणि आले यांसारखे आयुर्वेदिक मसाले घालून त्याचे पाचक गुणधर्म वाढवू शकता. हे मसाले केवळ दुधाची चवच वाढवत नाहीत तर अतिरिक्त आरोग्य फायदे देखील देतात. असे मसालेयुक्त दूध प्यायल्याने आपली प्रतिकारशक्ती वाढेल आणि पावसामुळे होणाऱ्या अनेक आजारांपासून आपण दूर राहू शकता.
पावसाळ्यात अपचन, ॲसिडीटी होते? खाल्लेलं नीट पचावं तर करा १ सोपा उपाय, मिळेल आराम…
पावसाळ्यात पाण्यात भिजलेल्या चपला-बुटांना दुर्गंधी येते? ४ सोपे उपाय- कुबट वास येणार नाही...
४. पावसाळ्यात दूध पिण्याची योग्य वेळ कोणती ?
दुधातील संपूर्ण पोषक तत्व मिळविण्यासाठी, ते सकाळच्या नाश्त्यात पिणे फायदेशीर ठरेल. याशिवाय, आपण ते फक्त जेवणाच्या ऐवजी देखील पिऊ शकता. ज्यामध्ये दुधासोबत इतर कोणतेही पदार्थ खाऊ नये. यामुळे, आपली पचनशक्ती दूध सहज पचण्यास सक्षम होईल आणि आपल्या शरीराला त्याचे सर्व फायदे मिळू शकतील.
पावसाळ्यात घाण पाण्यामुळे पायांना इन्फेक्शन होऊ नये म्हणून ६ सोपे घरगुती उपाय.. पाय सांभाळा..
५. पावसाळ्यात कोणत्या प्रकारचे दूध पिऊ नये ?
१. उकळवून न घेतलेले कच्चे दूध पिणे टाळावे.
२. खारट दूध किंवा दुधासोबत खारट पदार्थ खाऊ नयेत.
३. कॉर्नफ्लेक्स किंवा तृणधान्ये दुधात मिसळून खाऊ नये.
४. दुधासोबत फळे खाणे टाळावे.