Lokmat Sakhi >Health > सकाळी उठल्या उठल्या शिंका येतात, नाक गळतं? ४ उपाय- सर्दी, खोकल्यापासून मिळेल आराम

सकाळी उठल्या उठल्या शिंका येतात, नाक गळतं? ४ उपाय- सर्दी, खोकल्यापासून मिळेल आराम

How to get rid from cough and cold : पावसाळ्यात दूषित पाण्यामुळे पाचनअग्नी बिघडते आणि त्यामुळे शरीरातील सर्व दोषांवर परिणाम होतो. न म्हणूनच या ऋतूमध्ये आपल्या आहाराची विशेष काळजी घेतली पाहिजे

By ऑनलाइन लोकमत | Published: July 9, 2023 06:18 PM2023-07-09T18:18:05+5:302023-07-09T19:37:41+5:30

How to get rid from cough and cold : पावसाळ्यात दूषित पाण्यामुळे पाचनअग्नी बिघडते आणि त्यामुळे शरीरातील सर्व दोषांवर परिणाम होतो. न म्हणूनच या ऋतूमध्ये आपल्या आहाराची विशेष काळजी घेतली पाहिजे

How to get rid from cough and cold : Best Foods to Ease Your Cough and Cold | सकाळी उठल्या उठल्या शिंका येतात, नाक गळतं? ४ उपाय- सर्दी, खोकल्यापासून मिळेल आराम

सकाळी उठल्या उठल्या शिंका येतात, नाक गळतं? ४ उपाय- सर्दी, खोकल्यापासून मिळेल आराम

पावसाळ्यात रोगप्रतिकारकशक्ती कमी होते. म्हणजेच आजारांशी लढण्याची समस्या कमी होते. जास्तीत जास्त लोकांना  ताप, सर्दी, अंगदुखी आणि पोटदुखी जाणवते. (How to Get Rid of a Bad Cough) फूड पॉजनिंगमुळे उलट्या, जुलाब असे त्रासही उद्भवतात. पावसाळ्यात दूषित पाण्यामुळे पाचनअग्नी बिघडते आणि त्यामुळे शरीरातील सर्व दोषांवर परिणाम होतो.  म्हणूनच या ऋतूमध्ये आपल्या आहाराची विशेष काळजी घेतली पाहिजे आणि अशा गोष्टींचे सेवन केले पाहिजे जे दोष खराब करणार नाहीत आणि पचनशक्ती वाढवतील. (How to get rid from cough and cold)

पावसाळ्यात दुषित पाण्यामुळे पचनक्रियेवर परीणाम होतो. यामुळे शरीरातील सर्वच दोष खराब होतात.  म्हणूनच व्यायाम आणि आहाराची काळजी घ्यायला हवी. ज्यामुळे पचनशक्ती खराब होते असे पदार्थ खाऊ नयेत. या हंगामात संसर्गजन्य रोग अधिक वेगाने पसरतात. जर तुम्हालाही सर्दी, खोकला किंवा ताप यासारख्या लक्षणांचा त्रास होत असेल, तर तुम्ही खाली नमूद केलेल्या आयुर्वेदिक उपायांनी या समस्येपासून आराम मिळवू शकता. (Best Natural Cough Remedies and Prevention Tips)

तांदळाचं पाणी

तांदळाच्या पाण्यात हळद, लसूण, सुकलेलं आलं, जीरं, काळी मिरी, ओवा आणि धणे घाला. हे पाणी प्यायल्यानं सर्दी, खोकल्याचा त्रास दूर होतो.

ताक

पावसाळ्याच्या दिवसात रोगप्रतिराकशक्ती वाढवण्यासाठी आणि फ्लूच्या लक्षणांशी लढण्यासाठी तुम्ही ताकाचे कमी प्रमाणात सेवन करू शकता. यातील सुकं आलं, काळी मिरी, ओवा आणि कढीपत्ता एकत्र करू शकता.

गरम पाण्याची वाफ घ्या

फ्लूची लक्षणे कमी करण्यासाठी गरम पाण्याची वाफ घ्या. गरम पाण्यात, तुळशीची पाने आणि हळद पावडर घालण्यास विसरू नका. ब्लॉक झालेले नाक उघडण्यासाठी आणि खोकला, ताप कमी करण्यासाठी  हा एक प्रभावी उपाय आहे. मोहरी, हळद, गिलॉय  यांसारख्या आयुर्वेदिक औषधी वनस्पतींमध्ये जंतुनाशक गुणधर्म असतात. पावसाळ्यात या औषधी वनस्पती आपल्या घरात असायलाच हव्यात

हळदीचं दूध

हळदीचं दूध सर्दी, खोकला आणि घसादुखीवर उत्तम पर्याय आहे. रात्री झोपताना हळदीचं दूध प्यायल्यास घश्याला आराम मिळतो. खालेल्या अन्नाचं व्यवस्थित पचन होतं. हळद दूधात घातल्यानं दुधाचे पोषण मुल्य वाढते. यामुळे रोगप्रतिकारकशक्तीही वाढते. 

Web Title: How to get rid from cough and cold : Best Foods to Ease Your Cough and Cold

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.