Lokmat Sakhi >Health > How to Get Rid of Mucus in Chest : छातीत साचलेला कफ बाहेर काढतील ४ उपाय, थंडीत जाणवणार नाही सर्दी, खोकला

How to Get Rid of Mucus in Chest : छातीत साचलेला कफ बाहेर काढतील ४ उपाय, थंडीत जाणवणार नाही सर्दी, खोकला

How to Get Rid of Mucus in Chest : सायनस, ऍलर्जी, सर्दी किंवा प्रदूषणाचा प्रभाव असल्यास अधिक कफ तयार होतो. छातीत साचलेला कफ बाहेर काढण्याचे उपाय पाहूया.

By ऑनलाइन लोकमत | Published: November 16, 2022 04:50 PM2022-11-16T16:50:14+5:302022-11-16T16:56:54+5:30

How to Get Rid of Mucus in Chest : सायनस, ऍलर्जी, सर्दी किंवा प्रदूषणाचा प्रभाव असल्यास अधिक कफ तयार होतो. छातीत साचलेला कफ बाहेर काढण्याचे उपाय पाहूया.

How to Get Rid of Mucus in Chest : How to remove cough mucus in chest lungs nose steam therapy oil in nostrils water | How to Get Rid of Mucus in Chest : छातीत साचलेला कफ बाहेर काढतील ४ उपाय, थंडीत जाणवणार नाही सर्दी, खोकला

How to Get Rid of Mucus in Chest : छातीत साचलेला कफ बाहेर काढतील ४ उपाय, थंडीत जाणवणार नाही सर्दी, खोकला

थंडीच्या दिवसात नाक ब्लॅाक होणं, नाक गळणं, छातीत कफ साचणं अशा समस्या उद्भवतात. हिवाळ्यात असा त्रास होण कॉमन असलं तरी वारंवार याच तक्रारी उद्भवल्यास दिवसभरातील काम करण्यात अजिबात उत्साह वाटत नाही. जेव्हा अशी समस्या उद्भवते तेव्हा नाक आणि छातीत कफ भरतो आणि नाक बंद होऊ लागते.  (How to Get Rid of Mucus in Chest) सायनस, ऍलर्जी, सर्दी किंवा प्रदूषणाचा प्रभाव असल्यास अधिक कफ तयार होतो. छातीत साचलेला कफ बाहेर काढण्याचे उपाय पाहूया. (How to remove cough mucus in chest lungs nose steam therapy oil in nostrils water workout)

वाफ घेणं

छातीतील कफ काढण्यासाठी तुम्ही प्रथम एका भांड्यात पाणी उकळा, आणि नंतर त्याच उकळत्या पाण्यात बाम टाका, नंतर टॉवेलने डोके झाकून घ्या आणि या पाण्याच्या वाफ घ्या, असे केल्याने तुम्हाला वेदनापासून आराम मिळेल. जर तुमच्याकडे स्टिमर असेल तर स्टिमरनंही तुम्ही वाफ घेऊ शकता.

तेलाचा वापर

जेव्हा छातीत कफ जास्त प्रमाणात जमा होतो आणि त्यामुळे श्वास घेण्यास त्रास होतो, तेव्हा तुम्ही काही नैसर्गिक तेलांचा वापर करून त्यातून सुटका मिळवू शकता कारण त्यात दाहक-विरोधी आणि अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म असतात. रात्री झोपण्यापूर्वी नाकात इसेंशियल तेलाचे 2-2 थेंब टाका, सकाळपर्यंत नाक स्वच्छ होईल.

भरपूर पाणी प्या

कफ जमा झाल्यास भरपूर पाणी प्या, यामुळे शरीर हायड्रेट राहण्यास मदत होईल, तर कफ कमकुवत होण्यास मदत होईल, उलट पाण्याची कमतरता असल्यास कफ अधिक कडक होतो, त्यामुळे समस्या वाढतील.

  थंडीत शिंगाडा खाल तर गॅस, एसिडिटीसह ७ आजारांपासून राहाल लांब; हे आहेत गुणकारी फायदे

व्यायाम करा

कफ कमी करण्यासाठी शारीरिक हालचाली खूप उपयुक्त ठरू शकतात. त्यामुळे शरीरात उष्णता तयार होते आणि कफ कमकुवत होऊ लागतो. म्हणूनच दररोज चालणे, सायकल चालवणे आणि धावणे फायदेशीर आहे.

Web Title: How to Get Rid of Mucus in Chest : How to remove cough mucus in chest lungs nose steam therapy oil in nostrils water

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.