Lokmat Sakhi >Health > सतत थकवा-हिमोग्लोबिन कमी झालंय? आजपासूनच ४ पदार्थ खा, रक्त भरपूर वाढेल-निरोगी राहाल

सतत थकवा-हिमोग्लोबिन कमी झालंय? आजपासूनच ४ पदार्थ खा, रक्त भरपूर वाढेल-निरोगी राहाल

How to Increase Blood Count : शरीरात रक्ताची कमतरता भासल्यास शरीराच्या कोणतंही काम करण्यात लक्ष लागत नाही आणि थकवा जाणवतो.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 20, 2023 03:12 PM2023-10-20T15:12:18+5:302023-10-20T15:37:33+5:30

How to Increase Blood Count : शरीरात रक्ताची कमतरता भासल्यास शरीराच्या कोणतंही काम करण्यात लक्ष लागत नाही आणि थकवा जाणवतो.

How to Increase Blood Count : These 4 natural juice to increase hemoglobin level | सतत थकवा-हिमोग्लोबिन कमी झालंय? आजपासूनच ४ पदार्थ खा, रक्त भरपूर वाढेल-निरोगी राहाल

सतत थकवा-हिमोग्लोबिन कमी झालंय? आजपासूनच ४ पदार्थ खा, रक्त भरपूर वाढेल-निरोगी राहाल

शरीरात रक्ताची कमतरता भासल्यास थकवा, कंटाळा आल्यासारखं वाटणं अशी लक्षणं जाणवतात. रक्ताच्या माध्यमातून शरीराच्या प्रत्येक कोपऱ्यात ऑक्सिजन आणि पोषक तत्व पोहोचतात. कार्बन डायऑक्साईडप्रमाणे इतर पदार्थही बाहेर निघतात. (Foods for iron) एका निरोगी व्यक्तीच्या शरीरात ५ ते ६ लिटर रक्त असायला हवं.  (foods for iron deficiency) शरीरात रक्ताची कमतरता भासल्यास कोणतंही काम करण्यात लक्ष लागत नाही आणि थकवा, अशक्तपणा, मूड स्विंग्स जाणवतात. या स्थितीला एनिमिया असं म्हणतात. रक्ताची कमतरता उद्भवल्यास या ज्यूसचे सेवन करायला हवे.(Rakt Vadhvanyasathi kay khave)

बीटाचा रस

बीटात आयर्नचे प्रमाण भरपूर असते. यात  मॅग्नेशियम, पोटॅशियम आणि व्हिटामीन सी सुद्ध असते. बीट खाल्याने रक्तातील लाल पेशी वाढण्यास मदत होते.  बीट, गाजर, काकडीचा तुकडा घालून तुम्ही याचा ज्यूस पिऊ शकता. 

दूध न पिता कॅल्शियम कसं मिळेल? दुप्पट कॅल्शियम असलेले ८ पदार्थ खा-२०६ हाडं होतील मजबूत

हिरव्या भाज्यांचा रस

हिरव्या भाज्यांमध्ये मोठ्या प्रमाणात आयर्न असते. याच्या सेवनाने शरीरातील रक्ताचे प्रमाण वाढते. ग्रीन ज्यूस म्हणजेच पालक,  संत्री, मोसंबी या फळांचाही यात समावेश आहे. ग्रीन ज्यूसमध्ये आयर्नबरोबर फॉलिक एसिड, व्हिटामीन सी, फॉलेट, कॉपर आणि व्हिटामीन ए असते ते रक्ताची कमतरता भरून काढते.

पालकाचा ज्यूस

पालक, काजू, रास्पबेरी या भाज्या शरीरातील रक्त वाढवण्यास मदत करतात. हा ज्यूस प्यायला खूपच चवदार लागतो.  पालकाचा ज्यूस बनवण्यासाठी सगळ्यात आधी १ वाटी ताजा पालक, २ कप स्ट्रोबेरी किंवा २ चमचे बदाम आणि १ कप प्रोटीन पावडर मिसळा यात कोकोनट किंवा बदामाचे दूध मिसळून सेवन करा.

साबुदाणे न भिजवता करा कुरकुरीत उपवासाची भजी; खमंग-कमी तेल पिणाऱ्या भजीची सोपी पद्धत

डाळिंबाचा रस

डाळींबाचा रस लाल असतो त्याचप्रमाणे डाळिंब खाल्ल्याने शरीराला अनेक फायदे मिळतात आणि शरीरातील रक्ताची कमतरता भरून निघते. हेल्थलाईनच्या रिपोर्टनुसार डाळिंबात भरपूर प्रमाणात व्हिटामीन सी असते.  ज्यामुळे रक्तात हिमोग्लोबीनची कमतरता भासत नाही. थकवा, कमकुवतपणा जाणवत नाही. याशिवाय तुम्ही मधल्यावेळेत भूक लागल्यानंतर गूळ चणे, गूळ शेंगदाणे आणि खजूर, गूळ आणि तीळ खाऊ शकता.

Web Title: How to Increase Blood Count : These 4 natural juice to increase hemoglobin level

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.