हाय कोलेस्टेरॉलची समस्या दिवसेंदिवस वाढत आहे. हा एक सायलेंट किलर आजार आहे. शरीरातील कोलेस्टेरॉलची पातळी जास्त झाल्याने हृदयाचे गंभीर आजार होऊन हृदय विकाराचा झटकासुद्धा येऊ शकतो. कोलेस्टेरॉल प्रमाणापेक्षा जास्त वाढलं तर हार्ट अटॅक किंवा स्ट्रोकचं कारण ठरते. (Natural Ways to Lower Your Cholesterol Levels) कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी घरातील काही पदार्थ उपयुक्त ठरू शकतात. यामुळे पोटाच्या समस्याही कमी होईल. डॉ. सरोज गौतम यांनी एका हिंदी वेबसाईटशी बोलताना याबाबत अधिक माहिती दिली आहे. (How to lower cholesterol)
डॉ. गौतम सांगतात की, हाय कोलेस्टेरॉलच्या रुग्णांमध्ये वाढ होत आहे. चुकीची लाईफस्टाईल, अन्हेल्दी खाण्यापिण्याच्या सवयी आणि एकाच ठिकाणी बसून राहण्याची सवय यामुळे कोलेस्टेरॉल वाढत आहे. कोलेस्टेरॉल कंट्रोल करण्यासाठी आयुर्वेदात आळशीच्या बीया आणि दालचिनी रामबाण उपाय मानले जातात. योग्य पद्धतीनं उपयोग केल्यास तुम्ही शरीर कायम निरोगी ठेवू शकता. (How to lower cholesterol naturally with food)
अळशीच्या बीया मिक्सरमध्ये घालून वाटा आणि त्याचे बारीक चुर्ण बनवा. हे चुर्ण एक चमचा सकाळी सकाळी रिकाम्या पोटी कोमट पाण्याबरोबर घ्या. असं केल्यास काही दिवसातच कोलेस्टेरॉल नियंत्रणात राहील. आळशीच्या बियांमध्ये फायबर्स असतात. यामुळे पचनाच्या समस्या दूर होतात आणि दीर्घकाळ भूक लागत नाही.
आयुर्वेदात अळशीच्या बियांव्यतिरिक्त दालचीनीसुद्धा कोलेस्टेरॉल कमी करण्यासााठी परिणामकारक मानली जाते. रोज सकाळ संध्याकाळ रिकाम्या पोटी चिमुटभर दालचिनी पावडर एक ग्लास कोमट पाण्यात मिसळून प्या. हा उपाय केल्यानं एका आठवड्यात तुमचे कोलेस्टेरॉल कमी होईल.
रोज सकाळी रिकाम्या पोटी आवळ्याच्या रसात एक चमचा एलोवेरा मिसळून याचे नियमित सेवन केल्यानं कोलेस्टेरॉल लेव्हल कमी करता येऊ शकतं. आवळ्यात व्हिटामीन सी आणि सायट्रिकक एसिडचे प्रमाण जास्त असते. ज्यामुळे कोलेस्टेरॉल कमी करण्याास मदत होते. याशिवाय मोहोरीच्या तेलात मोनोअनसॅच्युरेडेट फॅट्स आणि पॉली अन्सॅच्युरेडेट फॅटी एसिड्स जास्त प्रमाणात असतात. जे आरोग्याच्या दृष्टीने लाभदायक ठरते. तर तुम्हाला कोलेस्टेरॉलची समस्या असेल तर मोहोरीच्या तेलाचा आहारात समावेश करा.