Lokmat Sakhi >Health > खो - खो खोकल्याने हैराण झालात? ३ घरगुती काढा; सततचा खोकला होईल कमी - घसाही होईल साफ

खो - खो खोकल्याने हैराण झालात? ३ घरगुती काढा; सततचा खोकला होईल कमी - घसाही होईल साफ

How to Make Ayurvedic Kadha for Cough? Get Instant Relief : घसा व छातीतील जमा कफ बाहेर फेकून काढतील ३ घरगुती उपाय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 10, 2024 07:37 PM2024-10-10T19:37:15+5:302024-10-10T19:44:32+5:30

How to Make Ayurvedic Kadha for Cough? Get Instant Relief : घसा व छातीतील जमा कफ बाहेर फेकून काढतील ३ घरगुती उपाय

How to Make Ayurvedic Kadha for Cough? Get Instant Relief | खो - खो खोकल्याने हैराण झालात? ३ घरगुती काढा; सततचा खोकला होईल कमी - घसाही होईल साफ

खो - खो खोकल्याने हैराण झालात? ३ घरगुती काढा; सततचा खोकला होईल कमी - घसाही होईल साफ

आता काही दिवसांमध्ये हिवाळा सुरु होईल (Winter Season). थंडीच्या दिवसात सर्दी-खोकल्याचा त्रास हा हमखास होतो. खोकल्याचे देखील अनेक प्रकार आहेत. ज्यामध्ये कोरडा खोकला हा जास्त त्रासदायक ठरतो (Cough). खोकल्यावर उपाय म्हणून आपण अनेकदा घरगुती उपाय किंवा औषधे घेतो (Health Tips). ओला खोकला झाल्यावर फुफ्फुस आणि श्वसनमार्गामध्ये कफ साचतो. कोरडा आणि ओल्या खोकल्यापासून सुटका हवी असेल तर, काही घरगुती उपायांची मदत घ्या.

काही लोक सर्दी खोकला झाल्यावर औषधोपचार घेणं टाळतात. जर आपल्याल सर्दी खोकल्यापासून सुटका हवी असेल तर, आपण घरगुती उपाय करूनही खोकल्यापासून सुटका मिळवू शकता. यामुळे श्वसनमार्गामध्ये साचलेली घाण, धूळ - माती किंवा ऋतू बदलांमुळे होणारा खोकला दूर होईल(How to Make Ayurvedic Kadha for Cough? Get Instant Relief).

खोकल्यासाठी घरगुती उपाय

आले, दालचिनी आणि हळदीचा चहा

दाहक-विरोधी गुणांनी समृद्ध असलेला हा चहा प्यायल्याने घशाला आराम मिळतो. शिवाय खोकला कोणत्याही प्रकारचा असो, याचा त्रास कमी होतो. हा चहा तयार करण्यासाठी एका भांड्यात पाणी गरम करण्यासाठी ठेवा. पाण्याला उकळी फुटल्यानंतर त्यात आले, दालचिनी आणि हळद घाला आणि शिजवा. चवीसाठी आपण त्यात मधही घालू शकता. ५ मिनिटानंतर गॅस बंद करा. चहा गाळून आपण दिवसातून २ वेळा पिऊ शकता.

भाजलेले की भिजवलेले? चणे नेमके कसे - केव्हा खाणे योग्य? वजन कमी करायचा फायदा हवा तर..

तुळस, काळी मिरी आणि मध

तुळशीची पाने, काळी मिरी आणि मध एकत्र केल्याने एक शक्तिशाली काढा तयार होतो. या तिन्ही घटकांचे अँटी इन्फ्लेमेंटरी आणि अँटी बॅक्टेरियल गुणधर्म श्वसनमार्ग साफ करण्यास मदत करतात. यासाठी भांड्यात पाणी गरम करण्यासाठी ठेवा. त्यात तुळशीची पानं, काळी मिरी आणि मध घालून मिक्स करा. उकळी आल्यानंतर गॅस बंद करा. आणि चहा गाळून प्या.

दिवसभरात फक्त 'एवढी'च पावलं चाला, वजन कमी होणारच- हृदयही राहील निरोगी -दिसाल फिट

मिठाचे पाणी

घसा खवखवणे आणि खोकल्यापासून मुक्त होण्यासाठी कोमट मिठाच्या पाण्याने गुळण्या करा. एक ग्लास कोमट पाणी घ्या आणि त्यात थोडे मीठ घाला. हे पाणी तोंडात ठेवून गुळण्या करा. आणि थुंका. यामुळे घशाला आराम मिळतो आणि खोकला कमी होतो. ही प्रक्रिया दिवसातून २-३ वेळा करा. 

Web Title: How to Make Ayurvedic Kadha for Cough? Get Instant Relief

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.