Lokmat Sakhi >Health > गव्हाची पोळी पचत नाही? पोट डब्ब होते, कणिक भिजवताना मिसळा ‘ही’ एक गोष्ट

गव्हाची पोळी पचत नाही? पोट डब्ब होते, कणिक भिजवताना मिसळा ‘ही’ एक गोष्ट

How to make roti easily digestible : चपाती पचत नाही अशी समस्या असेल तर करुन पाहा हा खास उपाय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 22, 2023 01:50 PM2023-12-22T13:50:00+5:302023-12-22T13:51:32+5:30

How to make roti easily digestible : चपाती पचत नाही अशी समस्या असेल तर करुन पाहा हा खास उपाय

How to make roti easily digestible? | गव्हाची पोळी पचत नाही? पोट डब्ब होते, कणिक भिजवताना मिसळा ‘ही’ एक गोष्ट

गव्हाची पोळी पचत नाही? पोट डब्ब होते, कणिक भिजवताना मिसळा ‘ही’ एक गोष्ट

बिघडलेल्या जीवनशैलीमुळे बऱ्याचदा याचा नकारात्मक परिणाम पोटावर देखील दिसून येतो. योग्य आहाराचे सेवन न केल्यामुळे पोटदुखी, पोट फुग्ण्याची समस्या, पचनक्रियेत अडथला, यासह बद्धकोष्ठतेचा देखील त्रास होऊ शकतो. पोट साफ न झाल्यामुळे हा त्रास अनेकांना छळतो. जर या त्रासावर वेळीच उपचार नाही घेतले तर, मुळव्याधीची समस्या देखील निर्माण होऊ शकते. अशावेळी आपण खाण्यावर तर कंट्रोल ठेवतोच, पण काय खावे काय टाळावे? याची माहिती आपल्याला नसते.

गव्हाच्या पिठापासून तयार चपात्या लवकर पचत नाही. अनेकांना चपात्या खाल्ल्याने पोटात गॅसेसचा त्रास होतो. जर आपल्याला देखील चपात्या खाल्ल्याने पोटाचे विकार यासह  बद्धकोष्ठतेचा त्रास होत असेल तर, गव्हाच्या पिठापासून चपात्या तयार करताना त्यात एक गोष्ट मिक्स करा. यामुळे चपात्या खाल्ल्याने पचनाची समस्या टळेल, शिवाय बद्धकोष्ठतेचा त्रासही होणार नाही(How to make roti easily digestible).

हिवाळ्यात खायलाच हवा गुळाचा खडा, वजन कमी ते हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी होते मदत; सर्दी-खोकलाही राहतो दूर

गव्हाच्या पिठात मिसळा ओट्स

फिटनेस फ्रिक लोकं नाश्त्यामध्ये ओट्स खातात. ओट्स खाण्याचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत. यामध्ये फायबर, अँटिऑक्सिडंट्स आणि व्हिटॅमिन ई मुबलक प्रमाणात असते. सकाळी ओट्स खाल्ल्याने आपल्याला दिवसभर काम करण्याची उर्जा मिळते. नियमित ओट्स खाल्ल्याने वजन कमी होणे, पचनक्रिया सुधारणे, इम्युनिटी बुस्ट करणे, बॅड कोलेस्टेरॉल कमी करणे यासह पोटाचे विकार देखील दूर करते.

सूर्यफूल की शेंगदाणा तेल? उत्तम आरोग्यासाठी कोणते तेल बेस्ट आणि का? तज्ज्ञ सांगतात..

जर गव्हाच्या पिठापासून तयार चपात्या खाल्ल्याने पोटाला त्रास  होत असेल तर, त्यात ओट्स मिक्स करून खा. यामुळे ओट्स आणि गव्हातील गुणधर्म शरीराला मिळतील, शिवाय पोटाला त्रास देखील होणार नाही. गव्हाचे पीठ-ओट्सच्या चपाती करण्यासाठी आपल्याला फक्त गव्हाचे पीठ, ओट्स आणि पाण्याची गरज भासेल. फक्त कणिक मळताना त्यात ओट्सची पावडर घालून मिक्स करा. त्यानंतर या कणकेच्या चपात्या करून खा. 

Web Title: How to make roti easily digestible?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.