Lokmat Sakhi >Health > डायबिटिस असणाऱ्यांनी उन्हाळयात ५ गोष्टींची काळजी घ्या, शुगर वाढण्याचा - डिहायड्रेशनचा धोका टाळा...

डायबिटिस असणाऱ्यांनी उन्हाळयात ५ गोष्टींची काळजी घ्या, शुगर वाढण्याचा - डिहायड्रेशनचा धोका टाळा...

Tips To Manage Blood Sugar In Amid Heat Wave : वाढत्या उन्हाळ्यामध्ये मधुमेहींना आरोग्याचे व्यवस्थापन करणे हे अतिशय गरजेचे असते.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 29, 2023 04:12 PM2023-03-29T16:12:01+5:302023-03-29T16:30:31+5:30

Tips To Manage Blood Sugar In Amid Heat Wave : वाढत्या उन्हाळ्यामध्ये मधुमेहींना आरोग्याचे व्यवस्थापन करणे हे अतिशय गरजेचे असते.

How To Manage Your Diabetes In Extreme Summer Heat | डायबिटिस असणाऱ्यांनी उन्हाळयात ५ गोष्टींची काळजी घ्या, शुगर वाढण्याचा - डिहायड्रेशनचा धोका टाळा...

डायबिटिस असणाऱ्यांनी उन्हाळयात ५ गोष्टींची काळजी घ्या, शुगर वाढण्याचा - डिहायड्रेशनचा धोका टाळा...

बहुतेक लोकांचा न आवडणारा ऋतू म्हणजे उन्हाळा. उन्हाळ्यात वाढत्या उष्णतेमुळे आपल्या शरीराची लाही लाही होते. उन्हाळ्यांत उष्णतेमुळे शरीराला सर्वत्र घाम येतो, उच्च तापमानामुळे जीव नकोसा होतो. उन्हाळ्यात आपण सगळेच आपल्या स्वतःची खूप काळजी घेतो. उन्हाळयात घराबाहेर पडताना आपण उष्णतेच्या शरीरावर होणाऱ्या परिणामांबाबत खबरदारी घेतो. उन्हाळ्यात आपण सगळ्यांनीच काळजी घेणे गरजेचे असते परंतु उन्हाचा पारा जेव्हा चढतो, तेव्हा विशेषतः मधुमेहींनी जास्त काळजी घेण्याची गरज असते.

उन्हाळ्यातील अति उष्म्यामुळे रक्तातील साखरेच्या पातळीवर परिणाम होतो. त्यामुळे त्या व्यक्तीला खूप घाम येतो. त्या व्यक्तीच्या शरीरातील पाण्याची पातळी कमी होण्याची शक्यता असते. शरीरातील साखरेचे प्रमाण वाढू शकते. परिणामी सातत्याने लघवीला जाण्याची भावना निर्माण होते. त्यातून रक्तातील साखर अधिक वाढते. वाढत्या उन्हाळ्यामध्ये मधुमेहींना आरोग्याचे व्यवस्थापन करणे हे अतिशय गरजेचे असते. त्यामुळे ज्यांना मधुमेह आहे त्यांनी आवर्जून लक्षात ठेवाव्यात अशा काही गोष्टी. प्रीत फिटनेस क्लासचे संस्थापक व आहारतज्ज्ञ हरप्रीत यांनी डायबिटीस असणाऱ्या व्यक्तींनी उन्हाळ्यांत नेमकी कशी काळजी घ्यावी या संदर्भात ५ प्रमुख गोष्टी सांगितल्या आहेत(How To Manage Your Diabetes In Extreme Summer Heat).

उन्हाळ्याच्या दिवसांत मधुमेही व्यक्तींनी नेमकी कोणती काळजी घ्यावी ?

१. एक्सरसाइज किंवा इतर अ‍ॅक्टिव्हिटी करत रहा :- उन्हाळ्याच्या ऋतूंत मधुमेहावर नियंत्रण ठेवण्यासाठी थोडासा एक्सरसाइज किंवा फिजिकल अ‍ॅक्टिव्हिटी करत रहाणे ही मधुमेह असणाऱ्या व्यक्तींसाठी गुरुकिल्लीच आहे. मधुमेह असणाऱ्या व्यक्तींनी उन्हाळ्यात मधुमेहावर नियंत्रण ठेवण्यासाठी दिवसातून किमान ३० मिनिटे तरी चालण्याचा एक्सरसाइज केलाच पाहिजे. आपण सकाळी किंवा संध्याकाळी ३० मिनिटे चालण्याच्या एक्सरसाइज करु शकता. मधुमेह असणाऱ्या व्यक्तींनी आपल्या रक्तातील साखरेची पातळी उत्तम प्रकारे व्यवस्थापित करण्यासाठी खाल्ल्यानंतर पुढील १ ते ३ तास ही चालण्यासाठी सर्वोत्तम वेळ आहे. मधुमेहाचे व्यवस्थापन करण्यात व्यायामाची महत्त्वाची भूमिका असते. पण, उन्हामध्ये व्यायामाचा कोणताही प्रकार करणे चांगले नाही. सकाळी लवकर किंवा संध्याकाळी उन्हाचे तापमान कमी असते तेव्हा बाहेर पडावे. तसेच उन्हाची तीव्रता कमी असताना बाहेर पडणे हे मधुमेही व्यक्तींसाठी केव्हाही योग्य ठरेल. 

२. फायबरयुक्त अन्नपदार्थ खाण्यावर भर द्या :- मधुमेह असलेल्या लोकांसाठी अधिकाधिक फायबर असलेले अन्नपदार्थ खाणे महत्त्वपूर्ण ठरु शकते. मधुमेह असणाऱ्या व्यक्तींनी आपल्या रोजच्या आहारात फायबरयुक्त पदार्थांचा समावेश करणे हे त्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने फायदेशीर ठरु शकते. फायबर जास्त असलेल्या अन्नपदार्थांचे सेवन केल्यास पचनाची क्रिया मंदावते आणि रक्तातील साखर वाढण्यास प्रतिबंध केला जातो. फायबरयुक्त पदार्थांचे सेवन केल्यास असे पदार्थ वजन कमी करण्यास देखील मदत करतात. ज्यामुळे आपल्याला मधुमेहाचेदेखील योग्य प्रकारे व्यवस्थापन करता येते आणि त्याच वेळी रक्तदाब, हृदयरोग आणि काही प्रकारचे कर्करोगही टाळता येतात. फायबर समृध्द पदार्थांमध्ये ओट्स, ब्राऊन राइस, धान्यांपासून तयार केलेला ब्रेड आणि तृणधान्ये, फळे, बिया, नटस, झुचीनी, गाजर, टोमॅटो यांसारख्या भाज्यांचा समावेश होतो.

३. उन्हाळ्यांत गोड रस पिणे टाळा :- उन्हाळा हा एक असा ऋतू आहे की यात आपल्याला उष्णतेमुळे फार घाम येतो. या उन्हाळ्याच्या सिजनमध्ये वाढत्या उष्णतेपासून शरीराला गारवा मिळावा यासाठी आपण वेगवेगळ्या फळांचे ज्यूस, स्मूदी पिणे पसंत करतो. या ऋतूत गरम उन्हाच्या झळांपासून स्वतःला वाचविण्यासाठी आपण शीतपेय खूप आवडीने पितो. परंतु मधुमेह असणाऱ्या व्यक्तींनी या दिवसांत अशी गोड शीतपेये पिणे टाळले पाहिजे. या शीतपेयांमध्ये, किंवा काही फळांच्या ज्यूसमध्ये फायबरचे योग्य प्रमाण नसून या ज्यूसमध्ये साखरेचे प्रमाण जास्त असते. साखरेचे प्रमाण जास्त असल्यामुळे आपल्या शरीरातील ग्लुकोजची पातळी खूप लवकर वाढू शकते. जर आपल्याला उन्हाळ्यात फळांचा रस प्यावासा वाटत असेल तर तो जरूर प्यावा परंतु हा फळांचा रस ताज्या फळांचा वापर करुन घरीच बनविलेला असला पाहिजे, याची खात्री मधुमेह असणाऱ्या व्यक्तींनी केली पाहिजे. 

४. स्वतःला कायम हायड्रेटेड ठेवा :- उन्हाळ्यात डिहायड्रेशन पटकन होते. शरीरातील पाण्याचे प्रमाण पटकन कमी होते, तेव्हा रक्तातील साखर घट्ट होते. कारण मूत्रपिंडांमधून वाहणाऱ्या रक्ताचे प्रमाण कमी असते. रक्त कमी असल्याने मूत्रावाटे अतिरिक्त साखर काढून टाकण्यासाठी मूत्रपिंडे सक्षमपणे कार्य करू शकत नाहीत. मधुमेहींनी उष्ण हवामानात द्रवपदार्थ अधिक प्रमाणात घ्यावेत. दिवसभरात पाणीसुद्धा नियमितपणे प्यावे. मधुमेहींनी उन्हाळ्यांत कायम स्वतःला हायड्रेटेड ठेवण्याचा प्रयत्न करावा.  

५. रक्तातील साखरेच्या पातळीचे निरीक्षण करत राहा :- उन्हाळ्याच्या दिवसांत आपल्या रक्तातील साखरेच्या पातळीचे निरीक्षण करत रहाणे गरजेचे असते.  रक्तातील साखरेच्या पातळीचे निरीक्षण वारंवार करत राहिल्याने आपण टाईप १ आणि टाईप २ अशा दोन्ही प्रकारच्या मधुमेहांवर नियंत्रण मिळवू शकता. रक्तातील साखरेच्या पातळीचे निरीक्षण करत राहिल्याने आपले डायबिटीज वर, खाली का होत आहे याचा आपण अंदाज लावू शकतो. जर आपण इन्सुलिन घेत असाल तर,उष्ण तापमानात आपल्या शरीरात इन्सुलिन वापरण्याच्या यंत्रणेत बदल होतो. त्यामुळे मधुमेहींना रक्तातील साखरेच्या पातळीचे प्रमाण वारंवार तपासावे आणि इन्सुलिनचा डोस त्यानुसारच घ्यावा. तुमच्या रक्तातील साखरेची पातळी वारंवार तपासा. उष्ण तापमानामुळे रक्तातील साखरेची पातळी खूप खाली-वर होते. त्यामुळे नेहमीपेक्षा जास्त वेळा ही चाचणी करून घ्यावी. तसे केल्याने ही पातळी संतुलित ठेवण्यासाठी आपण योग्य प्रयत्न करु शकता.


 

Web Title: How To Manage Your Diabetes In Extreme Summer Heat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.