Lokmat Sakhi >Health > डाळी-गहू- तांदुळांत पोरकिडे होतात? ५ उपाय, वर्षानूवर्षे चांगले राहील धान्य, किडे होणार नाहीत

डाळी-गहू- तांदुळांत पोरकिडे होतात? ५ उपाय, वर्षानूवर्षे चांगले राहील धान्य, किडे होणार नाहीत

How To Protect Pulses And Grains : लवंगाचा वापर आजपर्यंत तुम्ही फक्त गरम मसाल्यांमध्ये केला असेल. लवंगातून किड्यांना पळवून लावण्यासाठी सुद्धा फायदेशीर ठरते.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 19, 2024 12:50 PM2024-04-19T12:50:04+5:302024-04-19T13:27:15+5:30

How To Protect Pulses And Grains : लवंगाचा वापर आजपर्यंत तुम्ही फक्त गरम मसाल्यांमध्ये केला असेल. लवंगातून किड्यांना पळवून लावण्यासाठी सुद्धा फायदेशीर ठरते.

How To Protect Pulses And Grains : 5 Home Remedies To protect Pulses And Grains From Wheat Weevil | डाळी-गहू- तांदुळांत पोरकिडे होतात? ५ उपाय, वर्षानूवर्षे चांगले राहील धान्य, किडे होणार नाहीत

डाळी-गहू- तांदुळांत पोरकिडे होतात? ५ उपाय, वर्षानूवर्षे चांगले राहील धान्य, किडे होणार नाहीत

किचनमध्ये कोणी खाण्यापिण्याचे  पदार्थ असेच ठेवले असतील तर त्याला किड लागणं खूपच  सामान्य आहे. स्वंयपाकघरात साठवून ठेवलेल्या धान्याला किड लागण्याचे प्रकार अनेक ठिकाणी उद्भवतात.  (5 Home Remedies To protect Pulses And Grains ) काहीजण डाळ, तांदूळाला किड लागू नये यासाठी ऊन्हात सुकवतात पण तरीही किडे दूर पळू शकत नाहीत. काही सोपे घरगुती उपाय करून तुम्ही किड्यांना दूर पळवू शकता. ( 5 Home Remedies To protect Pulses And Grains From Wheat Weevil)

१) कडुलिंबाचा वापर

कोणतीही डाळ किंवा तांदूळ स्टोअर करण्याआधी डबा व्यवस्थित पुसून घ्या. ज्या डब्यात मॉईश्चर येणार नाहीत अशाच डब्यात धान्य ठेवा. अन्यथा ओलाव्यामुले किड लागण्याची शक्यता असते. कडुलिंबात एंटी फंगल, एंटी बॅक्टेरिअल गुण असतात. ज्यामुळे बॅक्टेरियाज आणि किटाणूंचा विकास होत नाही. धान्याच्या डब्यात न विसरता कडुलिंबाची पानं ठेवा. 

२) लवंग

लवंगाचा वापर आजपर्यंत तुम्ही फक्त गरम मसाल्यांमध्ये केला असेल. लवंगातून किड्यांना पळवून लावण्यासाठी सुद्धा फायदेशीर ठरते. लवंगात एंटी फंगल, एंटी बॅक्टेरिअल गुण असतात. लवंग धान्यांच्या डब्यात घालून ठेवल्यानं किड्यांना, अळ्यांना दूर ठेवण्यास मदत  होते. 

३) मिठाचे तुकडे

ऐकायला खूप विचित्र वाटू शकते पण किटकांना दूर करण्यासाठी हा उत्तम उपाय आहे. यासाठी मिठाचे तुकडे एका कापडात बांधून गव्हाच्या किंवा डाळीच्या डब्यात ठेवा.  ज्यामुळे किड लागणार नाही.

४) लाल मिरचीचा वापर

अनेकदा तांदूळाला पण किडे लागतात. हे टाळण्यासाठी पिठात लाल मिरच्या घाला. यामुळे पिठाला किडे लागणार नाही ना अळ्या होणार.

५) तेजपत्ता

तमाल पत्र हा एक गरम मसाला आहे. जेवणाची चव वाढवण्यासाठी आणि चांगल्या सुगंधासाठी तमालपत्र ओळखले जाते.  ४ ते ५ तमालपत्र डाळी आणि धान्यांमध्ये ठेवल्याने  वर्षानुवर्ष किडे लागणार नाहीत. डाळी, गङू, ज्वारी एखाद्या एअरटाईट कंटेनरमध्ये  स्टोअर करा, डाळी, धान्य स्टोअर करण्याआधी व्यवस्थित धुवून घ्या. नियमित   डाळी आण इतर पदार्थ चेक करत राहा. याता  घाण दिसत असेल तर त्वरीत स्वच्छ करा. डाळी आणि धान्य सुक्या जागेवर स्टोअर करा. 

Web Title: How To Protect Pulses And Grains : 5 Home Remedies To protect Pulses And Grains From Wheat Weevil

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.