Lokmat Sakhi >Health > दातांचा पिवळेपणा, दातदुखी, तोंडाची दुर्गंधी होईल कमी, बघा तज्ज्ञांनी सांगितलेला घरगुती उपाय

दातांचा पिवळेपणा, दातदुखी, तोंडाची दुर्गंधी होईल कमी, बघा तज्ज्ञांनी सांगितलेला घरगुती उपाय

Home Remedies For Dental Health: दातांच्या अनेक समस्यांवर हा एकच सोपा उपाय प्रभावी ठरू शकतो. दररोज नियमितपणे केल्यास २ आठवड्यांतच चांगला फरक दिसून येईल. 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 1, 2022 02:45 PM2022-11-01T14:45:28+5:302022-11-01T14:46:06+5:30

Home Remedies For Dental Health: दातांच्या अनेक समस्यांवर हा एकच सोपा उपाय प्रभावी ठरू शकतो. दररोज नियमितपणे केल्यास २ आठवड्यांतच चांगला फरक दिसून येईल. 

How to reduce yellow stains, bad breadth and calculus on teeth | दातांचा पिवळेपणा, दातदुखी, तोंडाची दुर्गंधी होईल कमी, बघा तज्ज्ञांनी सांगितलेला घरगुती उपाय

दातांचा पिवळेपणा, दातदुखी, तोंडाची दुर्गंधी होईल कमी, बघा तज्ज्ञांनी सांगितलेला घरगुती उपाय

Highlightsहा उपाय २ आठवड्यांसाठी दररोज सकाळी नियमितपणे केल्यास वरील सगळे त्रास कमी होतील, असं दंतरोग तज्ज्ञांनी सांगितलं आहे. 

दातांची काळजी घेण्याकडे दुर्लक्ष झाल्यास दातांवर लगेचच पिवळेपणा (yellow stains on teeth) दिसू लागतो. शिवाय दोन दातांच्या मधल्या फटीमध्ये घाण जमा झाल्यास तिथेही काळपट- पिवळट डाग दिसू लागतात. हे डाग एकदा दातांवर चढले की मग लवकर ते निघतच नाहीत. शिवाय दात किडणे, दाढ दुखणे, हिरड्यांमध्ये वेदना, थंड खाल्ल्यास दातांना बसणारी ठणक असा त्रासही अनेक जणांना जाणवतो. हे सगळे त्रास कमी करण्यासाठी दंतरोग तज्ज्ञांनी एक सोपा उपाय सांगितला आहे. हा उपाय (Home Remedies For Dental Health) २ आठवड्यांसाठी दररोज सकाळी नियमितपणे केल्यास वरील सगळे त्रास कमी होतील, असं त्यांनी सांगितलं आहे. 

 

दातांचा पिवळेपणा घालविण्यासाठी सोपा उपाय
१. हा उपाय इन्स्टाग्रामच्या ronishamakeovers या पेजवर शेअर करण्यात आला आहे. रोनिशा या स्वत: डेंटीस्ट आहेत. 

२. हा उपाय करण्यासाठी आपल्याला व्हर्जिन कोकोनट ऑईल आणि लवंग पावडर या २ गोष्टी प्रामुख्याने लागणार आहेत.

३. सकाळी झोपेतून उठल्यानंतर ब्रश करण्यापुर्वी २ ते ३ टेबलस्पून व्हर्जिन कोकोनट ऑईल तोंडात घ्या आणि त्याने अर्धा मिनिट खळखळ गुळणा करा. 

खूप ताण येतो, स्ट्रेसमुळे जीव गुदमरतो? १२ सेकंदांचं बॉक्स ब्रिदिंग करा, करिना- आलियाच्या फिटनेस ट्रेनरचा खास सल्ला

४. त्यानंतर टुथब्रशला थोडे व्हर्जिन कोकोनट ऑईल लावा त्यावर लवंग पावडर टाका आणि त्याने एखाद्या मिनिटासाठी ब्रश करा. ब्रश करताना तो व्यवस्थित सगळ्या दातांवरून फिरवावा.

५. हा उपाय केल्यानंतर मग नेहमीप्रमाणे टुथपेस्ट घेऊन ब्रश करा.

६. २ आठवड्यांतच दातांच्या अनेक समस्या दूर होतील.

 

हा उपाय करण्याचे फायदे 
१. दातांचा पिवळेपणा कमी होतो.

२. दातांच्या फटीमध्ये असणारे काळपट- पिवळट डाग घालविण्यासाठी उपयुक्त

'ती' निवांत गाणी ऐकत पडली होती, तेवढ्यात एक पक्षी आला आणि.... बघा व्हायरल व्हिडिओ

३. हिरड्यांवरील सूज कमी होते.

४. दातदुखी- दाढीचे दुखणे कमी होते. 

५. तोंडाला दुर्गंधी येत असल्यास ती देखील कमी होते. 

 

Web Title: How to reduce yellow stains, bad breadth and calculus on teeth

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.