Lokmat Sakhi >Health > छातीत साचलेला कफ कमी करणारा 'हा' खास उपाय; खोकल्यावर मिळेल आराम- ढास लागणं होईल कमी

छातीत साचलेला कफ कमी करणारा 'हा' खास उपाय; खोकल्यावर मिळेल आराम- ढास लागणं होईल कमी

How To Remove Mucus From Throat Naturally : सतत शिंका येणं, घशात खवखव होणं, खोकला, छातीतध्ये कफ होणं यांसारख्या त्रासांमुळे फुफ्फुसांवर परिणाम होतो.

By ऑनलाइन लोकमत | Published: November 14, 2024 06:36 PM2024-11-14T18:36:43+5:302024-11-14T19:27:48+5:30

How To Remove Mucus From Throat Naturally : सतत शिंका येणं, घशात खवखव होणं, खोकला, छातीतध्ये कफ होणं यांसारख्या त्रासांमुळे फुफ्फुसांवर परिणाम होतो.

How To Remove Mucus From Throat Naturally 4 Natural Remedies For Mucus In Throat | छातीत साचलेला कफ कमी करणारा 'हा' खास उपाय; खोकल्यावर मिळेल आराम- ढास लागणं होईल कमी

छातीत साचलेला कफ कमी करणारा 'हा' खास उपाय; खोकल्यावर मिळेल आराम- ढास लागणं होईल कमी

हिवाळ्याच्या (Winter) वातावरणात तुमची इम्यून सिस्टिम कमकुवत होऊ लागते, ज्यामुळे शरीर आजारांच्या विळख्यात अडकते. हिवाळ्यात सर्दी, खोकला होणं खूपच सामान्य गोष्ट आहे. सतत शिंका येणं, घशात खवखव होणं, खोकला, छातीतध्ये कफ होणं यांसारख्या त्रासांमुळे फुफ्फुसांवर परिणाम होतो. फुफ्फुसं कमकुवत झाल्यास श्वास घ्यायला त्रास होणं यांसारख्या समस्या उद्भवू शकतात. (How To Remove Mucus From Throat Naturally 6 Natural Remedies For Mucus In Throat)

1) मिठाच्या पाण्यानं गुळण्या करा

नेचरमध्ये प्रकाशित झालेल्या संशोधनानुसार मिठाच्या पाण्याने गुळण्या केल्यास कफ पातळ होण्यास मदत होते आणि घसा साफ होतो. एक ग्लास गरम पाण्यात 2 ते 3 चमचे  मीठ घालून गुळण्या करा. ही पद्धत तुम्ही रिपीट करू शकता. दोन ते तीन तासांनी पुन्हा हा उपाय केल्यास फायदेशीर ठरेल. याशिवाय श्वसन मार्गातील संक्रमण रोखण्यासही मदत होईल.

2) पिंपळीचे पाणी

हे पाणी बनवण्यासाठी आलं, काळी मिरी, सैंधव मीठ आणि पिंपळी हे साहित्य तुम्हाला लागेल.  हे सर्व पदार्थ पाण्यात व्यवस्थित उकळवून घ्या नंतर या पाण्यानं गुळण्या करा. या उपायानं छातीत जमा झालेला कफ, खोकला यांपासून आराम मिळेल. आठवडाभर या पाण्यानं गुळण्या करा. 

3) आल्याचा चहा

आल्याचा चहा सर्दी, खोकला या दोन्ही समस्यांपासून आराम देतो. यातील प्राकृतिक एंटी इंफ्लेमेटरी आणि एंटी बॅक्टेरिअल गुण असतात. जे घश्यातील खवखव आणि खोकला बरा करण्यास मदत करतात. याशिवाय हा काढा घश्यातील सूज कमी करण्यासाठी आणि कफ बाहेर काढण्यासाठी फायदेशीर ठरते.  हे दोन्ही उपाय केल्यानं तुमचं बंद नाक उघडू शकते. जर तुम्हाला सर्दी, खोकल्याचा त्रास असेल तर तुम्ही हा उपाय करू शकता. 

4) पुदिन्याचा चहा प्या

पुदिन्याच्या चहात मेन्थॉल असते ज्यामुळे खोकला, कफ, वाहतं नाक, डोकेदुखी, सर्दी, फ्लू यांसारख्या लक्षणांपासून आराम मिळतो. या चहात एंटीबॅक्टेरिअल, एंटी व्हायरल आणि एंटी इंफ्लेमेटरी गुण असतात ज्यामुळे खोकल्याचा त्रास कमी होतो आणि तब्येतही चांगली राहते.

Web Title: How To Remove Mucus From Throat Naturally 4 Natural Remedies For Mucus In Throat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.