Lokmat Sakhi >Health > सकाळी उठल्यावर पोट साफ व्हायला त्रास होतो? तज्ज्ञ सांगतात, कारणं आणि उपाय..

सकाळी उठल्यावर पोट साफ व्हायला त्रास होतो? तज्ज्ञ सांगतात, कारणं आणि उपाय..

How To Resolve Constipation : प्रसिद्ध आहारतज्ज्ञ अंजली मुखर्जी सांगतात, वेळच्या वेळी पोट साफ होत नसेल तर..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2023 11:44 AM2023-03-24T11:44:05+5:302023-03-24T12:08:29+5:30

How To Resolve Constipation : प्रसिद्ध आहारतज्ज्ञ अंजली मुखर्जी सांगतात, वेळच्या वेळी पोट साफ होत नसेल तर..

How To Resolve Constipation : Having trouble clearing your stomach when you wake up in the morning? Experts say, causes and solutions... | सकाळी उठल्यावर पोट साफ व्हायला त्रास होतो? तज्ज्ञ सांगतात, कारणं आणि उपाय..

सकाळी उठल्यावर पोट साफ व्हायला त्रास होतो? तज्ज्ञ सांगतात, कारणं आणि उपाय..

पोट साफ होणं ही आपल्या दैनंदिन क्रियेतील एक अतिशय महत्त्वाची गोष्ट असते. सकाळी झोपेतून उठल्यावर पोट साफ व्हायलाच हवं. तर दिवसभर आपल्या शरीराचे सर्व कार्य सुरळीतपणे चालू शकते. मात्र वेळच्या वेळी पोट साफ झाले नाही तर आपलं सगळं रुटीन बिघडून जाते. पोट व्यवस्थित साफ झाले नाही तर आपल्याला अस्वस्थ वाटते. इतकेच नाही तर पोटात जळजळ होणे, गुडगुड होणे, पोट जड झाल्यासारखे वाटणे, अॅसिडीटी यांसारख्या तक्रारी निर्माण होतात. याचा आपल्या एकूण पचनशक्ती आणि आरोग्यावर परीणाम होतो. पोट साफ न होणे म्हणजेच बद्धकोष्ठता. बद्धकोष्ठता होण्याची कारणे आणि त्यावरील उपाय काय याबाबत प्रसिद्ध आहारतज्ज्ञ अंजली मुखर्जी यांनी अतिशय महत्त्वाची माहिती दिली आहे. इन्स्टाग्राम पोस्टच्या माध्यमातून त्या याविषयी काय सांगतात पाहूया (How To Resolve Constipation)..

कारणं 

१. आहारात फायबर कमी प्रमाणात घेणे 

२. कमी पाणी पिणे

(Image : Google)
(Image : Google)

३. दिनचर्येत बदल होणे

४. आहारात तेल आणि तूप कमी प्रमाणात घेणे

५. लोह, कॅल्शियम, अँटासिडस आणि ड्युरेटीक सप्लिमेंटस घेणे

६. संडासला लागली तरी बराच काळ दाबून ठेवणे.

नैसर्गिक उपाय

१. आहारात गहू, फळं, भाज्या यांचे प्रमाण वाढवून फायबरचा समावेश वाढवणे

२. जास्तीत जास्त पाणी पिणे

३. प्रोसेस्ड फूड कमीत कमी प्रमाणात घेणे

४. नियमित व्यायाम करणे

आहारात या गोष्टींचा आवर्जून समावेश करा

- गहू आणि त्यातील कोंडा पोट साफ होण्यासाठी अतिशय उत्तम असल्याने गव्हाच्या पीठाची पोळी खाणे किंवा गव्हाची बिस्कीटे खाणे हा उत्तम उपाय असू शकतो. 

(Image : Google)
(Image : Google)

- टोमॅटो आणि कोथिंबीर मिक्सरमध्ये बारीक करुन त्यात पाणी घाला. त्यात मीठ आणि तुमच्या आवडीनुसार चाट मसाला किंवा पाणी पुरी मसाला घालून हा ज्यूस प्या.

- पालेभाज्या, फळं यांमध्ये फायबर जास्त प्रमाणात असल्याने त्यांचा आहारात समावेश वाढवल्यास कॉन्स्टीपेशनचा त्रास दूर होण्यास मदत होईल. 

- मनुका खाणे हा कॉन्स्टीपेशन कमी करण्यासाठीचा उत्तम उपाय आहे. त्यामुळे आहारात मनुकांचा समावेश वाढवल्यास पोट साफ व्हायला मदत होईल. 

Web Title: How To Resolve Constipation : Having trouble clearing your stomach when you wake up in the morning? Experts say, causes and solutions...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.