हिवाळ्यात अनेकांना सर्दी, खोकला, डोळे चुरचुरण्याचा त्रास जाणवतो. बदलत्या ऋतूमध्ये संसर्ग होण्याचा धोका सर्वाधिक असतो, त्यामुळे सर्दी, खोकला आणि तापण येणं असे त्रास जाणवतात.. अशा परिस्थितीत काही लोकांच्या नाकातून पाणी वाहू लागते. सतत रूमाल खराब होतात, नाक लाल होऊन जळजळही होते. रोजच्या जीवनशैलीत काही बदल करून तुम्ही सर्दीच्या समस्येपासून आराम मिळवू शकता. (Cough cold seasonal change of weather home remedies steam therapy)
गरम पाणी प्या
जर तुम्हाला सर्दीचा त्रास जास्त जाणवत असेल तर रोज सकाळी न चुकता गरम पाणी प्या. त्यामुळे शरीर हायड्रेटेड राहण्यास मदत होईल. नाकातील कफ पातळ होईल आणि यामुळे गळणारं नाक आणि सर्दीची समस्या दूर होईल.
वाफ घ्या
स्टीम थेरपी हे एक जुने तंत्र आहे जे केवळ बंद केलेले नाक उघडत नाही तर नाक वाहण्याच्या तक्रारी देखील बरे करते. यासाठी एका मोठ्या भांड्यात पाणी उकळून त्यात बाम टाका. टॉवेलने डोके झाकून चेहरा वाफेच्या समोर ठेवा आणि श्वास वरच्या दिशेने घ्या.
गॅस, पोट फुगण्याचा त्रास अजिबात जाणवणार नाही; 4 गोल्डन रुल्स पाळा, १० आजार राहतील लांब
हर्बल टी
हर्बल चहा वाहत्या नाकासाठी रामबाण उपाय आहे, त्याचा तापमानवाढीवर परिणाम होतो. असा चहा थंडीविरूद्ध प्रभावीपणे कार्य करतो आणि तो पिल्याने रोग प्रतिकारशक्ती देखील वाढते. या चहामध्ये तुम्ही आले, दालचिनी, काळी मिरी, तुळस इत्यादी घालू शकता.
कॅन्सरचं कारण ठरतात रोजच्या खाण्यातले ६ पदार्थ; आतडे खराब होण्याआधी तब्येत सांभाळा
आल्याचा चहा
आले शरीरासाठी खूप फायदेशीर आहे आणि जर तुम्हाला सर्दीमुळे त्रास होत असेल तर यामुळे तुम्हाला खूप आराम मिळेल. एक कप गरम पाण्यात आल्याचे तुकडे घालून तुम्ही उकळू शकता.