Lokmat Sakhi >Health > मसाल्याच्या डब्यातील 'ही' पिवळी-सोनसळी पावडर फक्त पाण्यात मिसळून प्या; तब्येतीच्या तक्रारींवर खास उपाय

मसाल्याच्या डब्यातील 'ही' पिवळी-सोनसळी पावडर फक्त पाण्यात मिसळून प्या; तब्येतीच्या तक्रारींवर खास उपाय

How To Take Turmeric For Diabetes? : इतका सोपा उपाय तुम्ही कधी करुन पाहिला नसेल!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 15, 2024 05:34 PM2024-10-15T17:34:14+5:302024-10-15T17:35:14+5:30

How To Take Turmeric For Diabetes? : इतका सोपा उपाय तुम्ही कधी करुन पाहिला नसेल!

How To Take Turmeric For Diabetes? | मसाल्याच्या डब्यातील 'ही' पिवळी-सोनसळी पावडर फक्त पाण्यात मिसळून प्या; तब्येतीच्या तक्रारींवर खास उपाय

मसाल्याच्या डब्यातील 'ही' पिवळी-सोनसळी पावडर फक्त पाण्यात मिसळून प्या; तब्येतीच्या तक्रारींवर खास उपाय

हळदीचा (Turmeric Health Benefits) वापर प्रामुख्याने भारतीय घरांमध्ये होतो (Diabetes). याचे अनेक आरोग्यदायी फायदेही आहेत (Health Benefits). त्यात अनेक औषधी गुणधर्म असतात (Turmeric). ज्याचा फायदा निश्चितच आरोग्याला होतो. त्यात अँटिऑक्सिडंट्स, अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म असतात. हळदीतील गुणधर्मामुळे बॅड कोलेस्टेरॉल, अपचन, ब्लड शुगरची पातळी नियंत्रणात राहते.

मधुमेहग्रस्त रुग्णांसाठी हळदीचे पाणी अत्यंत फायदेशीर ठरते. सकाळी रिकाम्या पोटी हळदीचे पाणी प्यायल्याने रक्तातील साखर नियंत्रित राहते. याशिवाय शरीरातील सूज, अपचन, कोलेस्टेरॉल यांसारख्या समस्याही दुर होतात. हळदीचे पाणी पिण्याचे आरोग्यदायी फायदे किती?(How To Take Turmeric For Diabetes?).

हळदीचे पाणी पिण्याचे फायदे

- नॅशनल सेंटर फॉर बायोटेक्नोलॉजी इन्फोर्मेशनच्या रिपोर्टनुसार  हळदीतील सक्रिय घटक कर्क्युमिन डायबिटीसशी लढण्यास मदत करते. रोज चिमुटभर हळदीचा समावेश आहारात केल्यास शुगर लेव्हल नियंत्रणात राहू शकते.

- हळदीमध्ये अँटीऑक्सिडंट्स आणि दाहक-विरोधी गुणधर्म असतात, जे आरोग्यासाठी खूप फायदेशीर ठरू शकतात.

भाजलेले की भिजवलेले? चणे नेमके कसे - केव्हा खाणे योग्य? वजन कमी करायचा फायदा हवा तर..

- हळदीचे पाणी नियमित प्यायल्याने ब्लड शुगर नियंत्रित ठेवण्यास मदत होते. हळदीचे इन्शुलीनच्या संवेदनशीलतेवरही सकारात्मक प्रभाव असल्याचे आढळून आले आहे, ज्यामुळे ब्लड शुगर नियंत्रणात राहते.

- शरीरातील सूज कमी करण्यासाठी हळदीच्या पाण्याचे सेवन करावे. यातील दाहक विरोधी गुणधर्मामुळे जळजळ, हृदयरोग, अल्झायमरचा धोका कमी होतो.

- खरंतर, हळदीमध्ये कर्क्यूमिन नावाचे एक संयुग असते, ज्यामध्ये शक्तिशाली दाहक-विरोधी गुणधर्म असल्याचे आढळून आले आहे. हळदीचे पाणी नियमितपणे प्यायल्याने शरीरातील जळजळ कमी होण्यास मदत होते. ज्यामुळे जुनाट आजार हळूहळू बरे होतात.

जेवणानंतर 'ही' चूक केली तर पश्चाताप अटळ, वजन वाढते झरझर! ५ मिनिटं ‘एवढं’ करा..

- हळदीचा वापर शतकानुशतके केला जात आहे. त्यात भरपूर अँटीऑक्सिडंट्स असतात, जे शरीराला फ्री रॅडिकल्समुळे होणाऱ्या नुकसानापासून वाचवू शकतात. ज्यामुळे रोगप्रतिकारशक्ती मजबूत होऊ शकते.

- नियमित हळदीचे पाणी प्यायल्याने पचनसंस्था सुधारण्यास, पोट फुगणे, गॅसेसचा त्रास कमी करण्यास मदत करते. 

Web Title: How To Take Turmeric For Diabetes?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.