आहारात जास्त तळलेले, मैदायुक्त पदार्थ खाल्ल्यानं पोट खराब होऊ लागतं. खाण्यात फायबर्सची कमतरता गॅसेसचं प्रमुख कारण आहे. चुकीची लाईफस्टाईल गॅसेसचं गंभीर कारण बनू शकते यामुळे इतर समस्याही निर्माण होऊ शकतात. दीर्घकाळ अशा समस्या उद्भवणं पाईल्सचं कारण ठरू शकतं. या त्रासापासून बचावासाठी आहारात ताकाचा समावेश करायला हवा. साधं ताक पिण्याऐवजी तुम्ही जीरं किंवा ओवा घालून ताकाचे सेवन करू शकता ज्यामुळे गॅसेसची समस्या टाळता येईल. (Constipation Jeera Ajwin Best For Stomach Problem)
खाण्यापिण्यात निष्काळजीपणा केल्यास गॅसेसची समस्या उद्भवू शकते. जे लोक जास्त प्रमाणात जंक फूड किंवा प्रोसेस्ड फूड खातात त्यांना पोटदुखीच्या वेदना जाणवतात. अनेकदा असं पाहिलं जातं की बर्गर, पिज्जा हे पदार्थ खाल्ल्यानंतर गॅसेसचा त्रास होऊ लागतो. याउलट फायबर्सयुक्त पदार्थ आतडे निरोगी ठेवण्यास मदत करतात. गॅसेसची समस्या दूर करण्यासाठी आहारात भाज्या, फळांचा समावेश वाढवायला हवा.
नॅशनल लायब्रेरी ऑफ मेडिसिन्सच्या रिपोर्टनुसार जिऱ्याच्या सेवनानं पोटदुखी टाळण्यास मदत होते. ब्लॉटींग, पोट फुगणं असे त्रास टाळण्यासाठी तुम्ही जीऱ्याचे नियमित सेवन करू शकता. गॅसेसची समस्या दूर करण्यासाठी ताक पिण्याचा सल्ला दिला जातो. जीरं आणि ओवा मिसळून ताक प्यायल्यानं शरीराला एनर्जी मिळते. ताकासोबत ओवा मिसळून प्यायल्यानं पचनक्रिया चांगली राहते आणि गॅसेसच्या त्रासापासून आराम मिळतो. जीरं आणि ओव्याचं ताक प्यायल्यानं गॅस, पोटाच्या समस्या दूर होण्यासही मदत होते.
ओवा आणि जिऱ्याचं ताक कसं बनवाल?
यासाठी १ ग्लास प्लेन ताक फेटून पातळ करून घ्या. नंतर त्यात १ चमचा भाजलेलं जीरं पावडर आणि अर्धा चमचा भाजलेली ओवा पावडर घालून मिसळा. चवीसाठी तुम्ही यात काळं मीठ वापरू शकता. हे ताक सकाळी किंवा दुपारी जेवणासोबत पिऊ शकता.
गॅसेसचा त्रास असल्यास ताक पिणं फायदेशीर ठरतं. ताकात प्रोबायोटिक्स असतात ज्यामुळे पोटातील बॅक्टेरियाजचं संतुलन चांगलं राहतं. पोटाला गारवा मिळतो. आतडे निरोगी राहतात. याशिवाय जिऱ्यातील एंटी इंफ्लेमेटरी गुण गॅस, एसिडिटीच्या त्रासापासून सुटका मिळवून देतात. ज्यामुळे पचन एजाईम्स एक्टीव्ह होतात. ओव्याातील थायमॉल योगिक गुण गॅसचा त्रास दूर करतात.