खाल्ल्यानंतर पोट फुगणं, आंबट ढेकर येणं असे त्रास अनेकांना उद्भतात. भूक लागण्याआधीच सतत खात राहिल्यानं आंबट ढेकर येतात अनेकदा आंबट ढेकरांमुळे तोंडाची चव बिघडते आणि आंबट ढेकर येऊ लागतात तर कधी छातीत प्रचंड जळजळ होते. अनेकांना स्मोकिंग, दारू पिणं या कारणांमुळेही अपचनाचा त्रास होतो. या समस्येपासून सुटका मिळवण्यासाठी तुम्ही काही घरगुती उपाय करू शकता. (How To You Get Instant Relief From Sour Burps Acidity Home Remedies)
बडिशेप खा
पोटासाठी बडीशोप खाणं अनेकदृष्ट्या फायदेशीर ठरतं. बडीशेप खाल्ल्यानं गॅस, ॲसिडीटी, आंबट ढेकरांच्या त्रासापासून आराम मिळतो. बडीशेपेत पचन एंजाईम्सचे उत्पादन वाढवते. हे खाल्ल्यानं खाल्लेलं अन्न लवकर पचण्यास मदत होते. बडीशेप खाल्ल्यानं गॅस, ॲसिडीटी, ब्लॉटींग, आंबट ढेकरांच्या त्रासापासून आराम मिळतो. जेवणानंतर अर्धा चमचा बडीशेप खायलाच हवी.
पुदीन्याचा चहा
जर जेवल्यानंतर तुम्हाला गॅस, ॲसिडीटी समस्या जाणवत असेल किंवा आंबट ढेकर येत असतील तर तुम्ही पुदीन्याचा चहा पिऊ शकता. पुदीन्याच्या पानांमध्ये कुलिंग इफेक्ट असतो. ज्यामुळे छातीतली जळजळ कमी होते. आंबट ढेकर येत नाही आणि गॅसेसपासून आराम मिळतो. पुदिना वॉटर किंवा पुदिन्याचा चहा बनवून पिऊ शकता.
जिऱ्याचं पाणी
रेड क्लिफ लॅबच्या रिपोर्टनुसार जिऱ्याचं पाणी पचनक्रियेसाठी उत्तम मानले जाते. जेवल्यानंतर तुम्हाला आंबट ढेकर येत असतील तर तुम्ही जिऱ्याचं पाणी पिऊ शकता. ज्यामुळे पचनक्रिया चांगली राहते आणि गॅस, ॲसिडीटीची समस्या उद्भवत नाही. पोटातील ॲसिडीटी रिफ्लेक्स कमी होतात. तुम्ही १ ग्लास पाण्यात १ चमचा पावडर मिसळून पिऊ शकता. जिऱ्याचे पाणी प्यायल्यानं वजन कमी होण्यासही मदत होते.
आलं चावून खा
आलं पोटासाठी उत्तम मानलं जातं. आंबट ढेकर आल्यास तुम्ही आल्याचे सेवन करू शकता. आल्यात एंटी ऑक्सिडेंट्स आणि एँटीइँफ्लेमेटरी गुण असतात. जे पचनक्रिया चांगली ठेवतात. आल्याचा रस प्यायल्यानं गॅस, ॲसिडीटीच्या त्रासापासून आराम मिळतो.
लांबची नजर कमजोर झाली, धूसर दिसतं? डॉक्टर सांगतात खास उपाय-डोळ्यांची ‘अशी’ घ्या काळजी
हिंगाचे पाणी
आंबट ढेकरांपासून आराम मिळवण्यासाठी हिंगाचे पाणी पिऊ शकता. हिंगाचे पाणी प्यायल्यानं पोटदुखीच्या वेदना, गॅस, ॲसिडीटी आंबट ढेकरांच्या त्रासापासून आराम मिळतो. यासाठी तुम्ही १ ग्लास कोमट पाण्यात १ चिमुट हिंग मिसळून पिऊ शकता. ज्यामुळे काही वेळातच पोटाच्या त्रासावर आराम मिळेल.