दिवाळी या ५ दिवसांच्या सणानिमित्त विविध प्रकारचे फराळ, मिठाई बनवले जाते. दिवाळी हा सण खरं तर मिठाईपासून अधुरा आहे. नातेवाईक किंवा मित्र मंडळींच्या घरी असलेला पाहुणचार असो किंवा घरातील फराळ आणि मिठाई. याकारणांमुळे सर्वांचा डाएट ढिला पडतोच. अशा परिस्थितीत जास्त कॅलरी, सॅच्युरेटेड फॅट आणि रिफाइंड साखर असलेले पदार्थ आपले आरोग्य बिघडवतात. त्यामुळे असे पदार्थ खाल्ल्यानंतर त्यांना डिटॉक्स करणं देखील आवश्यक आहे. सण-उत्सवात अशा गोष्टी खाऊन तब्येत बिघडतेच, याला एक उपाय म्हणजे शरीर डिटॉक्सिफिकेशन करणे. याच्या उत्तम पद्धतींनी शरीराला आराम मिळू शकते.
सकाळी कोमट पाणी प्या -
तुमच्या दिवसाची सुरुवात लिंबूपाण्याने करा. एक ग्लास कोमट पाण्यात अर्धा चमचा लिंबाचा रस टाका. लिंबू पाणी शरीराला लवकर डिटॉक्स करते.
एकाच वेळी जास्त खाऊ नका -
जेवण कधी जेवायचे याचा एक प्लॅन बनवा. असा प्लॅन बनवा ज्यामध्ये थोडे थोडे करून अनेक वेळा तुम्हाला खाता येईल. परंतु, एकाच वेळी जास्त खाऊ नका. थोडे थोडे करून खाल्ल्याने तुम्हाला भूक कमी लागेल आणि तुमची जास्त खाण्याची सवय कमी होईल.
फायबरपासून नैसर्गिक डिटॉक्सिफिकेशन -
फायबर हे नैसर्गिक डिटॉक्सिफिकेशन एजंट मानले जाते. तुमच्या आहारात भरपूर फायबरचा समावेश करा. यासाठी भरपूर काकडी, गाजर, लेट्युस, स्प्राउट्स आणि हिरव्या पालेभाज्या खा. यामुळे तुमचे शरीर आतून मजबूत होईल.
शरीर हायड्रेटेड ठेवा -
दिवसभरात ८-९ ग्लास पाणी प्या, यामुळे तुमच्या शरीरातील सर्व विषारी पदार्थ बाहेर निघून जातील. पाणी प्यायल्याने तुम्हाला उर्जा जाणवेल. हायड्रेटेड राहिल्याने पचनक्रिया चांगली राहते आणि झोपही चांगली लागते.