कोरोनाचा प्रसार वाढल्यानं लोकांचे जीव वाचवण्यासाठी जगभरातील अनेक देशांमध्ये लॉकडाऊन लावण्यात आला. त्यामुळे लोकांना आपापल्या घरी बसण्याशिवाय कोणताही पर्याय उरला नव्हता. अशा स्थितीत जोडप्यांना जास्तीत वेळ एकत्र घालवावा लागला. त्यामुळे मुलं जन्माला येण्याचं प्रमाण वाढेल असा अंदाज वर्तवला जात होता. परंतु साथीच्या आजारात एका वर्षापेक्षा जास्त काळ झाल्यानंतर करण्यात आलेल्या अभ्यासात असे दिसून आले आहे की कोविडने खरोखरच जन्मदरात घट निर्माण झाली आहे. प्रजनन तज्ञ म्हणतात की अलीकडील काही महिन्यात एग्ज फ्रीझिंगचे प्रमाण वाढले आहे.
''आम्ही गेल्या वर्षात आमच्या उत्पन्नात चार पटींनी वाढ केली आणि क्लिनिकची संख्या तिप्पट केली. माहामारीच्या काळात फर्टिलिटी टिकवून ठेवण्यावर जास्त भर देण्यात आला असून महिला एग्स फ्रीझिंगकडे वळल्या आहेत.'' असे राष्ट्रीय एग्स फ्रिजिंग क्लिनिकचे संस्थापक डॉ. फहीमाह सासन यांनी सांगितले. गेल्या वर्षात न्यूयॉर्कमध्ये एग्स फ्रीझिंग करणार्यांची संख्या ३ पटीने वाढली आहे.
एग्स फ्रीझिंग सेवेची मागणी वाढत असताना इतर प्रजनन क्लिनिक्समध्ये दिसून येत आहे की भविष्यकाळात स्त्रिया ज्या बाळंतपणाचा विचार करीत आहेत ते यापेक्षा भिन्न आहे. एग्स फ्रीझिंगची मागणी वाढत असताना आता भविष्यकाळात स्त्रिया वेगळ्या प्रकारच्या बाळतंपणाचा स्वीकार करतील असं दिसून येत आहे.
काय आहे एग्स फ्रीझिंग?
एग्स फ्रीझिंगच्या प्रक्रियेमध्ये, निरोगी एग्स स्त्रियांच्या अंडाशयातून काढून प्रयोगशाळेत साठवली जातात. वैद्यकीय गोठवण्याला क्रायोप्रिझर्वेशन असे म्हणतात. एग्स फ्रिज झाल्यानंतर, जेव्हा एखाद्या स्त्रीला आई बनण्याची इच्छा असते, तेव्हा ती तिच्या निरोगी एग्ससह गर्भ धारणा करू शकते.
एग्स किती वेळ जतन करता येऊ शकतात?
एग्स लिक्विड नायट्रोजनचे फ्रिझरमध्ये १९६ डिग्री तापमानाला अनेक वर्ष गोठवता येऊ शकतो. लिक्विड नायट्रोजनचे कुठलेही दुष्परिणाम एग्सवर होत नाही. त्यामुळे जास्तवेळ एग्स गोठलेले राहू शकतात. गोठवल्यानंतर अनेक वर्षांनी एग्स पुन्हा ॲक्टिव्ह करता येतात. याही प्रक्रियेचे कुठलेही दुष्परिणाम नाहीत, बाळ अगदी सुदृढ जन्माला येऊ शकतं.
एग्स फ्रीझिंगसाठी किती खर्च येतो?
एग्स फ्रीझिंगसाठी वेगवेगळ्या क्लिनिक्समध्ये किमती वेगवेगळ्या असतात. म्हणून कोणत्याही एका क्लिनिकमध्ये जाण्याआधी इतर क्लिनिक्सच्या किंमतींची तुलना करायला हवी. एकूण किंमतीत कोणकोणत्या गोष्टी विचारात घेतल्या आहेत, हे तपासून पाहा. जवळपास दीड लाख रूपयांपर्यंत खर्च यासाठी येतो.
एग्स फ्रिजिंगमधले धोके काय आहेत?
अनेकदा थकवा, मळमळ, डोकेदुखी, पोटदुखी, स्तन दुखणं अशा समस्यांचा सामना करावा लागू शकतो. क्वचित केसेसमध्ये रक्ताच्या गाठी, पोट दुखी आणि उलट्या होऊन दवाखान्यात दाखल व्हावं लागतं. मात्र याचं प्रमाण अत्यल्प असतं. फ्रिज केलेला एग्स जाऊन फलित होतील आणि गर्भधारणा होईल याची काहीही खात्री देता येत नाही.
साठवणुकीच्या प्रक्रियेत सगळीच एग्स टिकाव धरू शकतात असं नाही. एकदा स्त्री बीजाची साठवणूक झाली की भविष्यात आपण आई होऊ शकतो ही खात्री मनाची होते आणि पुढे गर्भधारणा यशस्वी झाली नाही तर त्याचा मानसिक धक्का बसण्याची शक्यता असते.
वाढत्या वयात येते बाधा?
विशेषज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार वयाच्या २० व्या वर्षाच्या सुरूवातीला एग्स फ्रिजिंग केल्यास चांगल्या दर्जाचे एग्स मिळतील. पण वाढत्या वयात एग्स खराब होण्याचा धोका असू शकतो. म्हणून २५ ते ३० वयात एग्स फ्रिज करणं सगळ्यात उत्तम ठरेल.